
‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे ‘वयम्’चे ब्रीदवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. मुख्यत्वे शाळा व वाचनालयांत आमचे मासिक वितरीत होते. तसेच वाचनप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक आवर्जून ‘वयम्’चे वर्गणीदार होतात...
Read moreLorem ipsum dolor, sit amet consectetur adipisicing elit. Iusto sit consequuntur adipisci molestias nisi magni, non nostrum blanditiis dolorum vel quia voluptate velit eum, pariatur suscipit quis consectetur nihil dolorem?
कोकणातील नांदिवडेसारख्या छोट्याशा निसर्गरम्य खेडेगांवात जन्मलेले श्रीकांत यांचं प्राथमिक शिक्षण नजीकच्या मालगुंडमधे झालं आणि घरच्या गरिबीमुळे व त्यांची तल्लख बुध्दी पाहून पुढील शिक्षणासाठी त्यांच्या मामाने त्यांना आपल्या पुण्यातील घरी नेलं. तिथे इंटर सायन्स उत्तीर्ण करून मोठ्या कष्टांनी डीईआरई ही पदविका मिळवली. आपल्या विषयामधे पारंगत आणि अंगहुशारीच्या बळावर नोकरीच्या काळातच त्यांनी तंत्रकुशलता प्राप्त केली. गॅस क्रोमॅटोग्राफसारख्या महत्वाच्या व आयात पर्यायी यंत्राची निर्मिती आरेखनापासून उत्पादनापर्यंत करून त्यांनी मालकाचीच नाही तर या क्षेत्रातील अनेकांची प्रशस्ती मिळवली.
प्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ, लेखक, वक्ते व मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे Institute For Psychological Health (IPH) चे कार्यकारी विश्वस्त आहेत. ‘बहुरंगी बहर’ हा प्रकल्प त्यांच्या संकल्पनेतून सुरू झाला आहे. बहुविध बुद्धिमत्ता असलेल्या मुलांचा शोध आणि विकास याबद्दल असलेल्या असोशीतून ते ‘वयम्’ मासिकाशी घट्ट जोडले गेले आहेत.
भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि सल्लागार, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा सन्मानांनी गौरवले गेलेले अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अनिल काकोडकर. विज्ञान आणि समाजाची नाळ जोडण्यासाठी झटणाऱ्या डॉ. काकोडकर यांना मुलांच्या शिक्षणात विशेष रुची आहे. ‘वयम्’च्या सल्लागार मंडळात त्यांचा समावेश असणे, ही गौरवाची बाब आहे.
डॉ. उदय निरगुडकर हे अभ्यासू पत्रकार, मुलाखतकार आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात व टीव्ही मिडियात यशस्वी कारकीर्द गाजवणारे उदय निरगुडकर समाजातील असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तींचा शोध घेत असतात आणि त्यांना समाजासमोर आणत असतात.
राज्यसभेतील खासदार, ज्येष्ठ पत्रकार आणि व्याख्याते कुमार केतकर यांना आजच्या मुलांच्या बौद्धिक, वैचारिक व सामाजिक विकासात विलक्षण रस आहे. ‘वयम्’च्या सुरुवातीपासून प्रत्येक टप्प्यावर त्यांचे मोलाचे पाठबळ मिळत आहे.
अत्यंत लोकप्रिय बाल-कुमार साहित्यिक राजीव तांबे गेली अनेक वर्षे मुलांसाठी झोकून देऊन काम करत आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवले गेलेले राजीव तांबे मुलांच्या साहित्यात सतत वेगवेगळे लेखन-प्रयोग करत असतात. त्यांचा कल्पक व सक्रीय सहभाग ‘वयम्’ला समृद्ध करणारा आहे.