
गोष्टी लिहिणाऱ्यांसाठी स्पर्धा
तुम्हांला मुलांसाठी गोष्टी लिहायला आवडतात का?
‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक कै. बाळकृष्ण लक्ष्मण शुक्ल यांचा स्मृतीदिन १४ फेब्रुवारीला आहे. त्यांच्या स्मरणार्थ ‘कुमार-किशोर कथा स्पर्धा’ आयोजित करण्यात येत आहे. ही मराठी कथास्पर्धा ‘वयम्’ मासिक, शुक्ल परिवार, SWS Financial Solutions Pvt Ltd व अल्पारंभ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
कथालेखन स्पर्धेचे नियम आणि अटी-
गोष्ट मराठीत असावी.
कथालेखक कोणत्याही वयाचा चालेल.
कथा ८ ते १६ वयोगटातील वाचकांसाठी असावी.
कथा पूर्वप्रकाशित नसावी. (फेसबुक, ब्लॉग इत्यादी कोणत्याही समाजमाध्यमांवर देखील प्रकाशित झालेली नसावी.)
कथेची शब्दमर्यादा ६०० ते ९०० शब्द असावी. कथेचा प्रकार (विनोदी, चातुर्य कथा, विज्ञान कथा इत्यादी) कोणताही असला तरी चालेल.
कथा टंकित (टाइप) करून pdf आणि word स्वरूपात ahamawamwayam@gmail.com यावर पाठवावी किंवा कागदाच्या एका बाजूवर लिहून संपादकीय विभाग- ‘वयम्’ मासिक, न्यू वंदना सोसायटी, ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे- ४००६०२ या पत्त्यावर पाठवावी. दूरध्वनी : ०२२-६९०८६२७३.
कथेबरोबर लेखकांनी स्वतःची थोडक्यात माहिती पाठवावी. (नाव, वय, पूर्ण पत्ता, व्यवसाय, फोन नंबर, इमेल)
कथा पाठवायची अंतिम तारीख- २० मार्च २०२५
पहिल्या पाच उत्तम कथांना रु. २०००/- रोख रकमेचे पुरस्कार आणि रु. १०००/- रोख रकमेचे पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील.
आश्रम शाळेतील शिक्षकांच्या उत्तम तीन कथांना प्रत्येकी १५००/- रुपये रोख रकमेची बक्षिसे दिली जातील.
***