दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘वयम्’ मासिकातर्फे ‘सुट्टी अनुभव स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. उन्हाळी सुट्टीत मुलांनी कोणते वेगळे अनुभव घेतले, ते कमाल २५० शब्दांत लिहून पाठवायचे होते. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातून सुमारे २०० जणांचे अनुभव-लेखन आमच्याकडे आले. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ लेखिका अलकनंदा पाध्ये यांनी केले. त्यातून ‘उत्तम १०’ विजेते निवडले. आपल्या प्रथेप्रमाणे आपण पहिला, दुसरा क्रमांक काढत नाही, म्हणून ‘उत्तम १०’. या सर्व विजेत्यांचे अनुभव आपल्या वेबसाइटवर वाचायला मिळतील आणि काही अनुभव-लेख मासिकात प्रसिद्ध करू. सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागींचे आभार. या स्पर्धेचे परीक्षण करताना परीक्षकांना जाणवलेल्या काही गोष्टी-
>> कोणी परदेशी दौरा करून आले, कुणी आजोळच्या गावी. मुले जिथे जातात तिथे त्यांच्या परीने मजा लुटतात.
>> काही मुलांकडे सुट्टीचे प्लॅनिंग करण्याची क्षमता आलेली आहे. तसे स्वातंत्र्य त्यांना मिळते आहे.
>> सुट्टी अनुभवांत वैविध्य होते. कोणी छंदवर्ग लावून एखादे कौशल्य शिकले. कोणी नवीन अनुभव घेतले. सुट्टी म्हणजे नवीन काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ.. हेही अनेक मुलांच्या अनुभवातून जाणवले.
>> हे अनुभव बारकाव्याने मांडण्याचा अनेक मुलांनी छान प्रयत्न केला.
>> मात्र हे परीक्षण करताना प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली की, इ-मेलवरून आलेल्या अनेक प्रवेशिकांवर मुलांनी त्यांचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता ही माहिती लिहिलेलीच नव्हती.
>> काहींचे अनुभव तर शब्दमर्यादेपेक्षा अधिक होते, त्यामुळे ते बाद करावे लागले.
अनुभव स्पर्धा २०२३ निकाल- निवडक १०
१) अनिरुद्ध बागरी, पाचवी, ए. एम. नाईक स्कूल, पवई
२) नचिकेत जोशी, पाचवी, जिंदाल विद्यामंदिर, रत्नागिरी
३) प्रियांश पांढरकर, सातवी, आनंद निकेतन, नाशिक
४) ईशान लिमये, सहावी, घरची शाळा, पुणे
५) राधा कुलकर्णी, पाचवी, आनंद निकेतन, नाशिक
६) अनाहिता सिंग, आठवी, ए. एम. नाईक स्कूल, पवई
७) शिविन कुमार, चौथी, ए. एम. नाईक स्कूल, पवई
८) ऋजुता कुलकर्णी, नववी, संजय घोडावत स्कूल, सांगली
९) युवराज वर्तक, पाचवी, ए. एम. नाईक स्कूल, पवई
१०) प्रत्युष आयचित, सातवी