'श्रावणातील निसर्ग' फोटो स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन!
१९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित 'वयम्'ने 'श्रावणातील निसर्ग' फोटो स्पर्धा घेतली होती. त्या फोटो स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. यात मुलांनी त्यांच्या आजूबाजूच्या निसर्गाचे फोटो काढून आमच्याकडे पाठवले. श्रावणातील निसर्गाचं मनमोहक रूप मुलांनी छान टिपलंय. काही मुलांचे फोटो छान होते, परंतु कॅप्शन न दिल्याने त्यांचे फोटो स्पर्धेसाठी आम्ही घेऊ शकलो नाही. मुलांची निरीक्षण क्षमता आणि फोटो टिपण्याचं कौशल्य उत्तम आहे.
या स्पर्धेतून आम्ही ८ विजेते आणि २ उत्तेजनार्थ निवडले आहेत. त्यांचे फोटो पुढील काही अंकांतून प्रसिद्ध होतील.
विजेते-
१) अनाहत प्रदीप पाटील, सहावी, अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, गोरेगाव-मुंबई
२) साहिल अम्रितकर, सहावी, न्यू इरा इंग्लिश स्कूल, नाशिक
३) राधिका देसाई, आठवी, चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली (पूर्व)
४) दुर्वा विशे, सातवी, जिल्हा परिषद शाळा सोनावळे, ता. मुरबाड, जि. ठाणे
५) ईश्वरी विशे, सातवी, जिल्हा परिषद शाळा सोनावळे, ता. मुरबाड, जि. ठाणे
६) मयुर भोईर, सातवी, जिल्हा परिषद शाळा सोनावळे, ता. मुरबाड, जि. ठाणे
७) तेजस्वी ओक, चौथी, पार्ले टिळक विद्यालय, विलेपार्ले-मुंबई
८) आर्यन गवांदे, आठवी, आनंद निकेतन, नाशिक
उत्तेजनार्थ-
१) सोनाक्षी शेलवले, सातवी, जिल्हा परिषद शाळा सोनावळे, ता. मुरबाड, जि. ठाणे
२) मनवा सावंत, चौथी, एज्युस्मार्ट डिजिटल स्कूल, वाडा, ठाणे
सर्व विजेत्यांचे फोटो एकाहून एक सरस आहेत. परंतु एकाच अंकात सर्व फोटो प्रसिद्ध केले तर खूप जागा व्यापेल, म्हणून प्रत्येक अंकात काही फोटोंचा आस्वाद घेऊ या.