
Price: ₹330
किशोरवयीन मुले आणि त्यांच्या पालकांसाठीचे मासिक
‘वयम्’ दिवाळी अंकामध्ये विविध विषयांवर आधारित साहित्य असते. त्यात असतात माहितीपर लेख, भावूक, विज्ञान, गणिती, विनोदी आणि रंजक कथा. त्याबरोबरीने असतात मुलाखती, लेख, खेळ असे बरेच काही. किशोरवयीन मुले आणि त्यांच्या पालकांना आवडेल असा साहित्याचा फराळ ‘वयम्’ दिवाळी अंकात असतो. ज्याचा आनंद घेत तुम्ही तुमची दिवाळीची सुट्टी मजेत घालवू शकता. नामवंत लेखकांनी लिहिलेले दर्जेदार साहित्य, कविता, भन्नाट कोडी, Hide & Seek आणि भरपूर ॲक्टिव्हीटीज असलेले हे मासिक आहे. ‘वयम्’ दिवाळी विशेष अंक किशोरवयीन दोस्तांना भेट म्हणूनही नक्कीच देता येईल. हा अंक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचा जोड-अंक असतो. या महिन्यामध्ये मुलांना दिवाळीची सुट्टी असते. म्हणून हा जोड-अंक प्रकाशित केला जातो.
वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ‘वयम्’ मासिक प्रसिद्ध होत आहे.
१ अंक (११६ पाने)
आकर्षक मांडणी, पूर्ण रंगीत छपाई असलेला देखणा व वाचनीय अंक
नामवंत लेखकांनी लिहिलेले दर्जेदार साहित्य
‘वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे.
भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष आणि सल्लागार, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा सन्मानांनी गौरवले गेलेले अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अनिल काकोडकर. विज्ञान आणि समाजाची नाळ जोडण्यासाठी झटणाऱ्या डॉ. काकोडकर यांना मुलांच्या शिक्षणात विशेष रुची आहे. ‘वयम्’च्या सल्लागार मंडळात त्यांचा समावेश असणे, ही गौरवाची बाब आहे.
डॉ. उदय निरगुडकर हे अभ्यासू पत्रकार, मुलाखतकार आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रात व टीव्ही मिडियात यशस्वी कारकीर्द गाजवणारे उदय निरगुडकर समाजातील असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्तींचा शोध घेत असतात आणि त्यांना समाजासमोर आणत असतात.
राज्यसभेतील खासदार, ज्येष्ठ पत्रकार आणि व्याख्याते कुमार केतकर यांना आजच्या मुलांच्या बौद्धिक, वैचारिक व सामाजिक विकासात विलक्षण रस आहे. ‘वयम्’च्या सुरुवातीपासून प्रत्येक टप्प्यावर त्यांचे मोलाचे पाठबळ मिळत आहे.
अत्यंत लोकप्रिय बाल-कुमार साहित्यिक राजीव तांबे गेली अनेक वर्षे मुलांसाठी झोकून देऊन काम करत आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवले गेलेले राजीव तांबे मुलांच्या साहित्यात सतत वेगवेगळे लेखन-प्रयोग करत असतात. त्यांचा कल्पक व सक्रीय सहभाग ‘वयम्’ला समृद्ध करणारा आहे.
प्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ, लेखक, वक्ते व मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे Institute For Psychological Health (IPH) चे कार्यकारी विश्वस्त आहेत. 'बहुरंगी बहर' हा प्रकल्प त्यांच्या संकल्पनेतून सुरू झाला आहे. बहुविध बुद्धिमत्ता असलेल्या मुलांचा शोध आणि विकास याबद्दल असलेल्या असोशीतून ते 'वयम्' मासिकाशी घट्ट जोडले गेले आहेत.