Menu

पुरस्कार

images
उत्कृष्ट दिवाळी अंक २०२३- ‘वयम्’

महाराष्ट्राची आद्य साहित्य संस्था ‘महाराष्ट्र साहित्य परिषद’, पुणे आणि ‘पुण्यभूषण फाउंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी अंक स्पर्धेतील यावर्षीचा ‘पुण्यभूषण उत्कृष्ट दिवाळी अंक’ पुरस्कार ‘वयम्’च्या दिवाळी अंकाला, सोमवार, २६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात प्रदान करण्यात आला. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर आणि ख्यातनाम अभिनेते, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे हा भाग्ययोग होता. व्यासपीठावर म.सा.प.चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सचिव सुनिताराजे पवार, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, अंतिम फेरीतील परीक्षक संजय भास्कर जोशी हे मान्यवर उपस्थित होते. १५,००० रुपये आणि सन्मानपत्र असा हा पुरस्कार 'वयम्'च्या संपादक शुभदा चौकर यांनी स्वीकारला. 'वयम्' मासिकाने बालकुमार साहित्यात उत्तम दर्जाचा नवा मापदंड निर्माण केला आहे, असा गौरव सर्व परीक्षकांच्या वतीने संजय भास्कर जोशी यांनी केला. 'वयम्'चे प्रकाशक श्रीकांत बापट, सर्व साहित्यिक, चित्रकार, सजावटकार आणि 'वयम्' टीमसाठी हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळणे ही खूप आनंदाची आणि जबाबदारी वाढवणारी गोष्ट आहे.

images
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२२- उत्कृष्ट बाल दिवाळी अंक 'वयम्'

मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत 'वयम्' दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार नामवंत लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना 'वयम्' मासिकाच्या संपादक शुभदा चौकर आणि वरिष्ठ उपसंपादक क्रांती गोडबोले-पाटील. यावेळी व्यासपीठावर माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, आमदार प्रशांत ठाकूर, पत्रकार संघांचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, राही भिडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

images
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे -उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक २०१३

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ला ‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते, म.सा.प.च्या अध्यक्षा माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

images
राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक स्पर्धा २०१४-सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक

साप्ताहिक उल्हास प्रभात आणि आरोग्य होमिओपॅथिक फार्मसी आयोजित राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक स्पर्धा २०१४ चा ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ पुरस्कार ‘वयम्’ला प्राप्त झाला.

images
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार

को.म.सा.प कल्याण व समर्थ अॅडव्हटाय्रझर्स यांच्या तर्फे 'वयम्' दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला.

images
१६ राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत -सर्वोत्कृष्ट बाल दिवाळी अंक

श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या १६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बाल दिवाळी अंक म्हणून पुरस्कार मिळाला.

images
छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक- उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक २०१६

पुण्याच्या दिनमार्क पब्लिकेशन्सने प्रथमच घेतलेल्या ‘छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक’ स्पर्धेत 'वयम्' दिवाळी अंकाला कै. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक ‘वयम्’ २०१६- प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

images
३९ राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत २०१६-साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट बालवाङ्मय

मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई यांच्या वतीने आयोजित ३९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘वयम्’च्या २०१६च्या दिवाळी अंकास 'साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट बालवाङ्मय’ पुरस्कार मिळाला.

My Cart
Empty Cart

Loading...