Menu

हसरी दुनिया

image By Wayam Magazine 03 May 2024

Sense of Humour is sense of Proportion! असं म्हटलं जातं. हे सेन्स ऑफ प्रपोर्शन म्हणजे, तारतम्याची जाणीव! आपल्या आसपास अशी माणसं असतात, काही हसणारी तर काही कायम गंभीर चेहरा करून वावरणारी.. तर अशा ‘सिरियस’ माणसाकडे तुम्ही पाहिले, तर कळेल की या माणसांना भोवताली काय गमती-जमती चाललेल्या आहेत, याचा पत्ता नसतो. ‘मधुमती’ या जुन्या सिनेमातल्या एका गाण्याच्या ओळी आहेत -

रुत मतवाली झूमे डाली डाली,

जाने जग सारा-जाने ना माली...

म्हणजे बागेत सगळीकडे बहार आलेली आहे, पक्षी बागडत आहेत, फुलं डोलत आहेत आणि हा माळी- त्याला खबर नाही कारण तो खाली पाहून फक्त कामच करीत बसलेला आहे. झाडांची मशागत करण्याच्या कामात तो इतका गुंतलाय की, त्याला गंमत कळतच नाहीये!

न हसणारा (सेन्स ऑफ ह्यूमर नसलेला) माणूस या माळ्यासारखा असतो. माळी कामाचा असतो, प्रामाणिकही असतो, पण परिसराचे भान असायला हवे ना!

त्याच्या उलट असतो हसणारा माणूस!

हास्यचित्रे (कार्टून्स) आपण पाहतो आणि पटकन आपली कळी खुलते ना! आपल्या ‘वयम्’ अंकात नियमित येणारे अदिती पाध्ये-देसाई यांचे मिनूचे हास्यचित्र तुम्हांला आवडते ना! शिवाय चिंटूची हास्यचित्रे तुम्ही आवडीने वाचता.

दिल्लीहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘इंडिया टुडे’ या नियतकालिकाचे पूर्वी एक  मुलांसाठीचे मासिक होते- टारगेट (Target) नावाचे. Rosalind Wilson या ब्रिटिश शिक्षणतज्ज्ञाने हे ‘टार्गेट’ मासिक सुरू केले होते. १९८५ ते १९९५ या दशकात हे  मासिक लोकप्रिय झाले होते. त्यात अजित निनान यांची हास्यचित्रं फार लोकप्रिय झाली होती. आज ते देशातले महत्त्वाचे राजकीय व्यंगचित्रकार आहेत.

अजित निनान यांच्या या सदरातील निवडक हास्यचित्रांचा संग्रह ‘Ajit’s Funny World!’ या नावाने १९८७ मध्ये प्रकाशित झाला होता. तो माझ्याकडे आहे. आंध्र प्रदेशात जन्मलेले अजित निनान यांचे शिक्षण आधी हैद्राबादला, त्यानंतर चेन्नईला झाले. त्यांच्या या हास्यचित्र संग्रहाच्या मलपृष्ठावर (ब्लर्ब) नमूद केले आहे- If these illustrations don’t make you laugh- go, see a Doctor!

तेव्हा, हास्यचित्रांच्या मजेदार दुनियेतल्या काही हास्यचित्रांची आपण मजा घेऊ या!

-मधुकर धर्मापुरीकर

***

My Cart
Empty Cart

Loading...