Menu

‘चांद्रयान-३’चा अभिमान

image By Wayam Magazine 23 August 2024

‘चांद्रयान-३’चा अभिमान 

‘चांद्रयान-३’ हा आज आपल्या अभिमानाचा विषय आहे. ‘चांद्रयान-३’ या मोहिमेतून आपण काय साध्य केले आहे ते आपल्याला समजावून सांगत आहेत,  पद्मश्री (१९९८),  पद्मविभूषण (१९९९), पद्मभूषण (२००९) अशा तीन पद्म सन्मानांचे मानकरी असलेले नामवंत शास्त्रज्ञ आणि आपल्या मासिकाचे सल्लागार डॉ. अनिल काकोडकर! 

 ‘चांद्रयान-३’च्या चंद्रावरील सफल अवतरणाने आपण सर्व भारतीय एक वेगळाच अभिमान अनुभवत आहोत. भारतीय अंतराळ वैज्ञानिकांनी चंद्रावरील ही स्वारी फत्ते करून दाखवली. आतापर्यंत चंद्राच्या ज्या भागात कोणीही पोहोचलेलं नाही, अशा ठिकाणी भारत पोहोचला. इतर देशांच्या तुलनेत भारताने अत्यंत कमी खर्चात हे साध्य केले आहे, हे या मोहिमेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य! बॉलिवूड किंवा हॉलिवूडच्या एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीतसुद्धा या मोहिमेपेक्षा अधिक खर्च होत असतो. ‘चांद्रयान-३’ बद्दल बरीच माहिती इंटरनेट किंवा अन्य माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. 

अशा प्रकारच्या वैज्ञानिक मोहिमा आपण का आखतो व त्यातून काय साध्य करतो, हेही या निमित्ताने समजून घेऊ या. आपल्या सभोवतालचे जग जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला असते. त्यासाठी मानवनेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे. गिर्यारोहण, आकाशात किंवा अवकाशात उंच भरारी, समुद्रतळाचे दर्शन आणि अशा नवख्या परिस्थितीचा अभ्यास, एकट्या-दुकट्याने छोट्या होड्यांतून केलेला लांब पल्ल्याचा प्रवास, अंटार्क्टिकावर बऱ्याच राष्ट्रांनी उभारलेली संशोधन केंद्रे व तेथे जाण्या-येण्यासाठी केलेल्या व्यवस्था अशा अनेक गोष्टी आपण मधूनमधून ऐकत असतो. नील आर्मस्ट्राँगने १९६९ मध्ये चंद्रावर पाऊल ठेवल्याच्या गोष्टी आपण कुतूहलाने व कौतुकाने ऐकतो, वाचतो. अशा धाडसीप्रयत्नांत साहसाचा भाग तर महत्त्वाचाच, पण सहजासहजी अनुभवता न येणाऱ्या गोष्टी अनुभवणे, त्यांचा अभ्यास करणे व त्या अनुषंगाने मानवी ज्ञानात भर टाकण्याचा प्रयत्न करणे अधिक महत्त्वाचे व गरजेचे आहे, असे मी मानतो.  

तसे पाहिले तर आकाशात आपल्याला दिसणारे असंख्यतारे व त्यांचं परिभ्रमण याबद्दल सर्वांनाच मोठे कुतूहल असते. या विश्वाचीनिर्मिती कशी झाली असावी याबद्दल आपण निरीक्षणाद्वारे व सखोल अभ्यासाद्वारे अंदाजबांधतो. अधिक निरीक्षण आणि अभ्यासातून त्यांची सत्य-असत्यता सिद्ध करतो. हा प्रवास सतत चालू आहे. या क्षेत्रातीलआपल्या ज्ञानात खूप भर पडली आहे, मात्र अजून बऱ्याचगोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, हेही तितकेच खरे. 

चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह. तारे, ग्रह आणि उपग्रह यांच्या निर्मितीचाअभ्यास करण्याच्या अनुषंगाने चंद्राच्या अभ्यासातून आपण बरेच काही शिकलो आहोत. तेथे प्रत्यक्ष जाऊन त्याची खातरजमाकरून घेणे आणि त्यातील बारकावे समजून घेणे, हे चंद्रावरील सर्वच स्वाऱ्यांचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असणे स्वाभाविकच आहे. पृथ्वीप्रमाणे चंद्रावरही सर्वठिकाणी सारखी परिस्थिती नसते. ‘चांद्रयान-३’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरपहिल्यांदाच उतरले आहे, त्यामुळे त्या परिसरातील मोलाची माहिती सर्वप्रथम भारताने मिळवणे, हे या मोहिमेचे महत्त्वाचे यश म्हणायला हवे.

चंद्रावर दीर्घकाळ मानवी वास्तव्याच्या दृष्टीने पाण्याची उपलब्धता ही एकमहत्त्वाची गोष्ट. त्याअनुषंगाने भारताने आपल्या आधीच्या मोहिमेद्वारे सर्वप्रथम दक्षिण ध्रुव परिसरात पाणी असल्याचा शोध लावला होता. ‘चांद्रयान-३’ याबाबतीत अधिक प्रगती करू शकेल. मानवी प्रगतीस चालना देण्यासाठी लागणारी साधनसामग्री आपण वेगवेगळ्याखनिजांपासून प्राप्त करत असतो. चंद्रावर पृथ्वीपेक्षा वेगळ्या, पण खूप महत्त्वाची साधनसामग्री असण्याची शक्यताआहे. ऊर्जा-निर्मितीसाठी चंद्रावर हीलियम-३ आहे. इतरही अनेक गोष्टींसाठी चंद्र हा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. या साधनसामग्रींचा अचूक अंदाज व ती सामग्री पृथ्वीवर आणण्यासाठीलागणारे तंत्रज्ञान या सर्वांचा अभ्यास करणे आणि तंत्रज्ञानविकासासाठी लागणारी प्राथमिक माहिती गोळा करणे, ही देखील या मोहिमेची वैशिष्ट्येआहेत.  

आज आपण चंद्रावरयान उतरवले. उद्या मानवाला तिथे उतरवण्याचाही विचार करता येईल. मानवाचे चंद्रावरील वास्तव्य किंवा चंद्रावरून अंतराळात दूरवर मोहिमा आखणे अशा गोष्टी शक्यहोतील का, याचा वेधघेणेही आवश्यक आहे. ‘चांद्रयान-३’ यादृष्टीने महत्त्वाची पहिली पायरी ठरावे. मानवाला पृथ्वीवर उपलब्धसाधन सामग्रींची टंचाई लवकरच जाणवू लागण्याची शक्यता आहे. अग्रेसर देशांच्या चंद्रावरील मोहिमांच्या चढाओढींमागे हेही एक मोठे कारण आहे. भारतासारख्या, जगाच्या एकूण लोकसंख्येच्या एक षष्ठांश असा सर्वांत मोठा भाग असलेल्यादेशाला या स्पर्धेत मागे राहून कसे चालेल? आपले अंतराळ शास्त्रज्ञ यास्पर्धेत अग्रेसर राहून फार मोठी कामगिरी बजावत आहेत. त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच. आपण त्यांना धन्यवाद देऊया! 

-डॉ. अनिल काकोडकर

***


चांद्रयान-३ ची कमाल! 

१४ जुलै २०२३ रोजी चंद्राकडे झेपावलेले ‘चांद्रयान-३’ २३ ऑगस्टला चंद्रभूमीवर उतरले. या मोहिमेची महती समजावून सांगणारा हा लेख- 

‘चांद्रयान-३’च्या यशाने भारताची मान अधिकच उंच झाली आहे. या झळाळत्या यशानंतर इस्रोने सूर्याचा अभ्यासकरण्यासाठी ‘आदित्य-एल१’ हे यान अवकाशात पाठवलं आहे.  दरम्यान,  चांद्रयान-३ मोहिमेसाठी इस्रोने (भारतीय अवकाश संशोधन संस्था) ठरवलेली तीनही उद्दिष्टं पूर्ण झाली आहेत.ही तीन उद्दिष्टं म्हणजे - 

१.चंद्राच्या भूमीवर आपला विक्रम लँडर अलगद उतरवणं; 

२.चंद्रावर प्रज्ञान रोव्हर ही गाडी चालवणं; 

३.चंद्रावर वैज्ञानिक प्रयोग करणं; त्यामुळे ही मोहीम यशस्वी झाली, असं अभिमानाने म्हणता येतं. 

एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे १४ दिवस, काम केल्यानंतर प्रज्ञान रोव्हरला 'निद्रिस्त' करण्यात आलं. त्यानंतर विक्रम लँडरचं इंजिन १२ दिवसांनीपुन्हा सुरू करण्यात आलं. ते सुरू केल्यानंतर लँडर हे चंद्राच्या जमिनीपासून ४०सेंमी वर उचलण्यात आलं. इतकंच नाही, तर त्याने त्या उंचीवर राहून एक छोटाप्रवास केला. म्हणजे ते जिथे उतरलं होतं, त्या जागेपासून ते ३० ते ४० सेंमी दूर गेलं आणिपुन्हा एकदा अलगद चंद्राच्या भूमीवर उतरलं. चंद्राच्या भूमीवर विसावलेल्या विक्रमलँडरने हवेत मारलेली ही उडीच होती. ती मारण्यापूर्वीत्याचे रॅम्प आणि उपकरणं बंद करण्यात आली होती. नवीन जागेवर विक्रम लँडरउतरल्यानंतर ती पुन्हा एकदा चालू करण्यात आली. त्या उपकरणांनी आपलं कामही सुरू केलंआणि घेतलेल्या नोंदी पृथ्वीकडे पाठवून दिल्या.

इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की विक्रमलँडरने चंद्राच्या भूमीवरून हवेत उडी घेणं आणि आपल्याजागेपासून काही अंतरावर जाऊन पुन्हा अलवारपणे चंद्राच्या जमिनीवर उतरणंहा एक अतिशय महत्त्वाचा प्रयोग होता. असा प्रयोग यापूर्वी, म्हणजे १७ नोव्हेंबर १९६७ रोजी, अमेरिकेने केला होता. सन १९६६ ते१९६८ या काळात अमेरिकेने ‘स्वर्हेअर’ नावाची मोहीम आखली होती. या मोहिमेमध्ये एकंदर सात यानं चंद्रावर पाठविण्यात आली. ती सर्वच मानवविरहित होती. या यानांपैकी पाच यानं चंद्राच्या भूमीवर अलगद उतरली होती. नासाच्या 'अपोलो' मोहिमेची ही पूर्वतयारीच होती!त्या दिवशी अमेरिकेच्या चंद्रावर उतरलेल्या 'सर्व्हेयर-६' या यानाने हवेत झेप घेऊन ते थोड्या दूरवरच्या अंतरावर जाऊन उतरलं होतं. 

त्यानंतर ५६ वर्षांनी तोच प्रयोग इस्रोने केला. तो करण्यामागे मोठा हेतू होता. तो असा की, या पुढच्या काळात माणसाला चंद्रावर घेऊन जायचं आहे. तिथे काही काळ राहून त्यांना परत आणायचं आहे. काही यानं चंद्रावर पाठवून तिथली माती, दगड यांचे नमुने गोळा करायचे आहेत आणि त्यांच्यावर सखोल संशोधन करण्यासाठी ते परत पृथ्वीवर आणायचे आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे दूरवरच्या अवकाश प्रवासासाठी चंद्र हा एक थांबा म्हणून उपयोगात आणायचा आहे. त्यासाठी तिथे अवकाशतळ (SpaceStation) उभारायचा आहे. या सर्व गोष्टींसाठी विक्रम लँडरने चंद्राच्या भूमीवरून घेतलेली 'उडी' महत्त्वाची आहे.याचं कारण ही उडी म्हणजे एक महत्त्वाची चाचणीच होती. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मोहीम चंद्रावरच्या एकदिवसाची (पृथ्वीवरील १४ दिवस!) आहे, असं जाहीर झालं होतं. पण आता लँडरला निद्रिस्त करण्यात आलं आहे. पण त्यामध्ये थोडी ऊर्जा शिल्लक आहे. चंद्रावरच्या रात्रीत तिथलं तापमान उणे १२० अंशपर्यंत जातं. अशा अतिथंड तापमानात लँडर आणि त्यावरील उपकरणं या ऊर्जेमुळं तग धरू शकणार आहेत आणि या भागात पुन्हा एकदा सूर्याची किरणं पसरली कीआपलं काम सुरू करतील, अशी अपेक्षा इस्रोमधील संशोधकांना वाटत आहे. त्यांची आशा खरी ठरली, तर विक्रमलँडर चंद्राच्या भूमीवर आणखी काही काळ काम करू शकणार आहे. मोहिमेचा कालावधी वाढवण्याबाबत सुद्धा इस्रोने अवघ्या जगाला आणखीन एकमोठा धक्का दिला आहे. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारत आता कुठं आहे, हेच यावरून स्पष्ट झालं आहे. 

या मोहिमेमध्ये विक्रम लँडर आणि त्यावरील प्रज्ञान रोव्हरयांनीही मोलाची कामं केली आहेत. लँडरवरील ‘चास्ते’ (चंद्राजसरफेस थर्मोफिजिकल एक्सपरिमेंन्ट) या उपकरणाने चंद्राच्या दक्षिणध्रुवावरील मातीचे तापमान काय आहे, याचा शोध घेतला. हे उपकरण उभ्या स्थितीत, सरळच्या सरळ, १० सेंमी खोलवर जाऊ शकतं. या उपकरणावर एकंदर १० तापमापकसेन्सर आहेत. त्यांच्या मदतीने चंद्राच्या मातीच्या विविधस्तरांवर किती तापमान आहे, हे आपल्याला समजूशकतं. या उपकरणाने आपलं काम चोख केलं. चंद्राच्या भूमीपासून एकसेंमी उंचीवर तापमान ५६ अंश सेल्शियस आहे, तर चंद्राच्या मातीत आठ सेंमी खोलवर तापमान आहे,  -१० (Minus10) अंश सेल्शियस! चंद्राच्या पृष्ठभागाचं तापमान ५० अंश सेल्शियस, तर पृष्ठभागापासून सात सेंमीवर तापमान शून्य अंशसेल्शियस! चंद्राच्या पृष्ठभागावरील जमिनीत गंधक, अ‍ॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्लोरियम, टिटॅनियम, मँगनिज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याचंही आढळून आलं आहे.चंद्रावरच्या मातीत गंधक असल्याचं आढळणं, हे फार महत्त्वाचं आहे. याचं कारण त्यामुळे चंद्र हा कसकसा उत्क्रांत होत गेला, यावर प्रकाश पडू शकतो. दुसरं असं की, साधारणपणे गंधक हा ज्वालामुखीतून बाहेर पडतो. चंद्राच्या मातीमध्ये गंधक असणं यावरूनचंद्राच्या भूतकाळातील संभाव्य घडामोडींवर प्रकाश पडू शकतो. शिवाय चंद्रामध्ये कायकाय दडलं आहे, याचाही अंदाज बांधतायेतो. चंद्राच्या भूमीवर रोव्हर गाडी १०० मीटर फिरली. ती फिरताना चंद्राच्याभूमीवरील कंपनांची नोंद 'इल्सा' या उपकरणाने केलीच, पण चंद्राच्या भूमीत निसर्गतःच काही हालचाली होतअसल्याचंही या उपकरणाने आपल्या लक्षात आणून दिलं. चांद्रयान-३ नंतर भारत लवकरच, म्हणजे सन २०२४-२५ मध्ये, चंद्रावर पुन्हा एकदा जाणार आहे. पण ती मोहीम जपानच्यासहकार्याने होणार आहे. ‘ल्युपेक्स’असं त्या मोहिमेचंनाव आहे. आता आपलं सगळ्यांचं लक्ष ‘गगनयान’ या मोहिमेकडे लागलं आहे. भारतीयअवकाशवीरांना अवकाशात घेऊन जाऊन परत आणणारी ही मोहीम म्हणजे भारतीय अवकाशवीरांनाचंद्रावर नेण्याची पूर्वतयारी आहे. ती यशस्वी होईल, यात शंकाच नाही. 

-  श्रीराम शिधये

***

My Cart
Empty Cart

Loading...