Menu

७वी ते ९वीतील मुलांचे व्यक्तिमत्त्व जोखणारी एक अनोखी स्पर्धा

'बहुरंगी बहर'चे उद्दिष्ट

‘वयम्’ मासिक आणि Institute Psychological Health (IPH) यांच्या संयुक्त विद्यमाने ७वी ते ९वीच्या मुलांसाठी ‘बहुरंगी बहर’ ही व्यक्तित्व स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. बहुअंगाने बहरत असलेल्या, सत्वशील आणि योग्य दिशेने विकसित होत असलेल्या किशोरवयीन मुलांचा शोध घेणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्ट आहे.

मुलांनी या स्पर्धेत का भाग घ्यावा?

स्पर्धेत कोण सहभागी होऊ शकेल?

कोणत्याही बोर्डाच्या आणि माध्यमाच्या शाळेत जाणारे महाराष्ट्रभरातील इयत्ता ७वी ते ९वीतील विद्यार्थी स्पर्धेसाठी अर्ज करू शकतात. शाळेमार्फत किंवा व्यक्तिगत दोन्ही मार्गांनी अर्ज भरता येईल. जी मुले फक्त अभ्यासात हुशार नव्हे, तर अनेक अंगांनी बहरत आहेत, त्यांची मूल्यबैठक चांगली आहे, विचार करणारी आहेत, अशा मुलांना एक व्यासपीठ मिळेल. साचेबंद परीक्षांमध्ये अशी मुले अनेकदा चमक असूनही चमकत नाहीत.
अशा मुलांचा शोध घेतला की या मुलांना उमेद येईल. त्यांच्या वयोगटातील मुलांसमोर त्यांच्याच वयाची काही रोल मॉडेल राहतील.

पालकांचा अभिप्राय

विद्यार्थ्यांचा अभिप्राय

स्पर्धेचे स्वरूप

सतत विचारले जाणारे प्रश्न

‘बहुरंगी बहर’ म्हणजे बहुअंगाने बहरणाऱ्या मुलांचा शोध. बाकी बऱ्याच स्पर्धेमध्ये फक्त एका विशिष्ट कलेकडे भर दिला जातो. पण सगळ्या बाजूने छान बहरत आहेत, फुलत आहेत अशी मुलं ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये दडलेली आहेत. अशा मुलांच्या शोधासाठीच ‘बहुरंगी बहर’ प्रकल्प काढण्यात आला आहे.

'बहुरंगी बहर' ची प्रश्नावली डाऊनलोड करण्यासाठी REGISTER NOW या बटणावर क्लिक करा व विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि बहुरंगी बहर स्पर्धेचे प्रवेश शुल्क भरा. प्रवेश शुल्क भरल्यास पुढील पानावर तुम्हाला प्रश्नावली डाऊनलोड करता येईल.

बहुरंगी बुद्धीमत्ता असलेल्या मुलांची दखल घेतली गेली पाहिजे आणि नवीन येणाऱ्या पिढीला त्यांच्या उमलत्या वयात योग्य मार्गदर्शन मिळाले पाहिजे या उद्देशाने ‘बहुरंगी बहर’ स्पर्धा आयोजित केली जाते.

बहुरंगी बुद्धीमत्ता म्हणजेच ‘Thoughts of multiple intelligence’! तबल्याच्या लयतालाचे गणित सहज आत्मसात करणारी व्यक्ती पुस्तकी गणितात कच्ची ठरते... एखाद्या क्रीडाप्रकारामध्ये अप्रतिम कौशल्य दाखवणारी व्यक्ती डबल ग्रॅज्युएट असायलाच हवी असे नाही... कुठल्याही बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण न घेता कर्तृत्ववान उद्योजक बनता येते. म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये बुद्धीचे एकापेक्षा जास्त Flavors आहेत आणि त्या व्यक्तीचे आयुष्य सर्वांगाने फुलून येते तो / ती जगण्याचा आनंद तर लुटतेच, पण समाजालाही योगदान देऊ शकते.

स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मुलांचा आत्मविश्वास वाढतोच त्याचबरोबर त्यांची चहू बाजूने विचार करण्याची क्षमताही वाढते.

हो, या स्पर्धेमुळे मुलांची शैक्षणिक, सामाजिक, आणि मानसिक जडण-घडण केली जाते. तसेच ‘बहुरंगी बहर’च्या विजेत्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल.

एक असं हक्काचं व्यासपीठ जिथे मुलांना त्यांची मतं मोकळेपणाने मांडता येतात. ज्यात मुलं विचार काय करतात, त्यांची निर्णयक्षमता कशी आहे. त्या मुलांची एखाद्या संकल्पनेविषयी मतं काय आहेत आणि ती कशी मांडतात असे स्वतःची ओळख करून देणारे प्रश्न या प्रश्नावलीमध्ये विचारले जातात.

त्यात बेस्ट मुले निवडली जातील. या फेरीसाठी काही मान्यवर परीक्षक असतील.उत्तरपत्रिका कुरियर किंवा पोस्टाने पाठवत असल्यास ‘वयम्’ कार्यालयात पाठवावी. पत्ता- ‘बहुरंगी बहर’ ‘वयम्’ मासिक, न्यू वंदना को.ऑप.हा.सो., ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे (प.)- ४००६०२, दूरध्वनी : ०२२-२५९८६२७३/ ६९०८६२७३. किंवा उत्तरपत्रिका इमेलने पाठवणार असल्यास सर्व पानांची एकत्र एकच (Combined) PDF फाईल करून पाठवा. एकेका पानाचा फोटो काढून पाठवू नका. फोटो स्वरूपातील पानं स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाहीत. इमेलने पाठवण्यासाठी- baharbahurangi@gmail.com

या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या अंतरंगात डोकवाल.स्वतःला नीट ओळखाल.तुमची मते मोकळेपणाने मांडण्याची अनोखी संधी मिळेल.अनेक तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल.मनात दाटलेले अनेक प्रश्न, शंका दूर होतील.तुमचा बहुअंगांनी विकास होईल आणि तुमच्यातील क्षमता तुम्हांला समजतील.

My Cart
Empty Cart

Loading...