Multi Magazine Display Multi Magazine Display

Multi Magazine Display Multi Magazine Display

Multi Magazine Display Multi Magazine Display

'वयम्' का वाचावे ?

बहुतेक मराठी पालकांना वाटतं की हल्ली मुलं वाचत नाहीत- निदान मराठीत काही वाचत नाहीत. अनेकांना वाटतं की टीव्ही, क्रिकेट, मोबाईल, व्हॉटस अॅप यांतच त्यांचा वेळ जातो. तुम्हालाही असंच वाटतंय? पण असं का होत असेल?

आम्हाला याबाबतअसं वाटतं कि, एवढी ११ कोटी लोकांची मराठी भाषा- गोड आणि प्रभावी, मग असं का? एक कारण म्हणजे आपणच आपल्या भाषेला कमी लेखतो. इंग्रजी ही जागतिक भाषा, ती आलीच पाहिजे, अगदी उत्तम आली पाहिजे, पण भाषातज्ज्ञ सांगतात की जर मातृभाषा चांगली येत नसेल तर इंग्रजीतही आपली प्रतिभा फुलणार नाही. म्हणून मातृभाषेत वाचण्याची आवड लहानपणीच लागायला हवी.

कार्यक्रम आणि स्पर्धा

आमच्या विषयी थोडक्यात

बहुतेक मराठी पालकांना वाटतं की हल्ली मुलं वाचत नाहीत- निदान मराठीत काही वाचत नाहीत. अनेकांना वाटतं की टीव्ही, क्रिकेट, मोबाईल, व्हॉटस अॅप यांतच त्यांचा वेळ जातो. तुम्हालाही असंच वाटतंय? पण असं का होत असेल?
आम्हाला याबाबतअसं वाटतं कि, एवढी ११ कोटी लोकांची मराठी भाषा- गोड आणि प्रभावी, मग असं का? एक कारण म्हणजे आपणच आपल्या भाषेला कमी लेखतो. इंग्रजी ही जागतिक भाषा, ती आलीच पाहिजे, अगदी उत्तम आली पाहिजे, पण भाषातज्ज्ञ सांगतात की जर मातृभाषा चांगली येत नसेल तर इंग्रजीतही आपली प्रतिभा फुलणार नाही. म्हणून मातृभाषेत वाचण्याची आवड लहानपणीच लागायला हवी.
शालेय वयातील विद्यार्थ्यांना ताज्या घडामोडी, दैनंदिन विज्ञान, ललित साहित्य, कलाकृती, प्रयोग, कोडी, उपयुक्त वेबसाईट, इत्यादी मजकूर वाचायला मिळावा आणि त्यांनी विचारप्रवण व्हावे, म्हणून `वयम्’ मासिक प्रसिद्ध हे मासिक सुरू केले आहे. मुख्यत्वे शाळा व वाचनालयांत आमचे मासिक वितरीत होते. तसेच वाचनप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक आवर्जून ‘वयम्’चे वर्गणीदार होतात.

‘वयम्’चे बोधवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’!

विविध विषयांतील तज्ज्ञ ‘वयम्’मध्ये लिहितात. प्रत्येक महिन्याला एका ताज्या विषयाला बहुअंगाने भिडणारे लेखही यांत असतात. ‘वयम्’मधील बहुतांश मजकूर मराठीत असतो आणि या मराठी मासिकांत एक-दोन लेख/गोष्टी इंग्रजीत असतात. दर्जेदार कथा, उद्योग-भेट, ताज्या विषयांवरचे लेख, सृजनात्मक Activities, कोडी असे बरेच काही साहित्य `वयम्’ मध्ये प्रसिद्ध केले जाते. दर्जेदार साहित्य, आकर्षक चित्रे, सुंदर छपाई यामुळे `वयम्’ मासिक मुलांना आवडू लागले आहे. पहिल्या चारही वर्षी ‘वयम्’दिवाळी अंकाला विविध पुरस्कार मिळाले आहेत, ज्यात महाराष्ट्र साहित्य परिषद (म.सा.प.), कोकण मराठी साहित्य संघ (को.म.सा.प.), कल्याण सार्वजनिक वाचनालय, मराठी वृत्तपत्र लेखक संघ, साप्ताहिक उल्हास प्रभात, दिन्मार्क पब्लिकेशन या संस्थांच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

 • वाचक वर्ग

  1,00,000
 • वितरण

  30,000
 • शाळा

  25+

सल्लागार मंडळ

 • डॉ. अनिल काकोडकर

  हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी ते इ.स. १९९६ ते २०००च्या दरम्यान, होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते. वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन या सल्लागार मंडळातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

 • कुमार केतकर

  हेे राज्यसभेतील खासदार, पत्रकार, लेखक आणि व्याख्याते आहेत.अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे त्यांनी भूषविली आहेत. वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला आहे.

 • डाॅ.आनंद नाडकर्णी

  हे एक मराठी लेखक, नाटककार व मनोविकारतज्ज्ञ आहेत. वयम् आणि Institute For Psychological Health(IPH) चे कार्यकारी विश्वस्त डाॅ.आनंद नाडकर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने 'बहुरंगी बहर' ही स्पर्धा इयत्ता सातवी ते नववीच्या मुलांसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येते.

 • अच्युत गोडबोले

  हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळात आणि बहुरंगी बहर यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

 • डॉ. उदय निरगुडकर

  डॉ. उदय निरगुडकर हे अनुभवी पत्रकार, न्यूज १८ लोकमत चे ग्रुप एडिटर आहेत. वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

 • राजीव तांबे

  हे एक मराठी बालकथालेखक आहेत. त्यांची २०१३ सालापर्यंत एकूण ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाङ्‌मयाव्यतिरिक्त त्यांनी एकपात्रिका, एकांकिका, कथा, कविता, कादंबरी, गणित कथा, नाटक, पालकत्वाविषयी लेखन, विज्ञान प्रयोग कथा, शिक्षण विषयक लेखन, इत्यादी लेखनप्रकार हाताळले आहेत. वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

 • श्रीकांत वाड

  श्रीकांत वाड हे प्रसिद्ध माजी बॅडमिंटनपटू आहेत. प्रसिद्ध बॅडमिंटनपटू, 'वयम्' या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी मासिकाच्या सल्लागार मंडळातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

 • अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

  मृणाल देव-कुलकर्णी ह्या ख्यातनाम भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका, लेखिका आहेत. मराठी व हिंदी चित्रपट, नाटक आणि दूरदर्शनच्या जगतात त्या एक हरहुन्नरी, प्रतिभासंपन्न अशा मनस्वी कलावंत म्हणून ओळखल्या जातात. त्या विख्यात साहित्यिक गो.नी. दांडेकरांच्या नात आहेत. मृणाल कुलकर्णी ह्या वयम् च्या ब्रँड ऍम्बॅसॅडर देखील आहेत.

‘वयम्’ च्या सल्लागार मंडळात आहेत -
डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, डॉ.आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे आणि अभिनेती मृणाल कुलकर्णी. शिवाय, डॉ. बाळ फोंडके, भारत सासणे, सुबोध जावडेकर, मुकुंद टाकसाळे, प्रवीण दवणे, दासू वैद्य, डॉ. शरद काळे, डॉ. नंदिनी देशमुख, श्रीकांत बोजेवार, समीर कर्वे, श्रीराम शिधये, शमसुद्दिन अत्तार असे अनेक नामवंत लेखक ‘वयम्’च्या यादीत आहेत.

प्रतिक्रिया

पालकांचा अभिप्राय