(मिनूच्या आवाजात)
अनेक अक्षर एकत्र आली की शब्द तयार होतो हे तर तुला माहित आहेच.म्हणजे बघ हं! अ.....ने....क
अशी तीन अक्षरं एकत्र आली आणि 'अनेक' हा शब्द तयार झाला .मग असे किती अक्षरी शब्द असू शकतात?
अगदी एक अक्षरी सुध्दा असतात बरं का! तू,मी,ती,ही,हा.....असे बरेच!
पण आज आपण शोधायचे आहेत दोन अक्षरी शब्द!त्यात अजून एक गंमत आहे . तुला सूर्य काढता येतो का?म्हणजे येतच असणार. तर.....त्या सूर्यात लिही 'रा' आणि त्याच्या प्रत्येक किरणावर लिहा असं एक अक्षर की जे लिहीलं की दोन अक्षरी शब्द तयार होईल.म्हणजे किरणावर 'जा' लिहा की तयार झाला राजा! राजा आला ,आता लिहा 'णी' !बघ बरं 'राणी' पण आली.
आता त्या मध्यभागी असलेल्या 'रा' ला काय काय जोडता येतंय याचा विचार कर बरं!
मला तर बुवा रान,राठ, राग......सुचलं!अशी भरपूर अक्षरं जोड आणि किरणं काढा. आता सांगा बरं, तुझ्या सूर्याला किरणं किती?
हा खेळ आई-बाबा मित्रमैत्रीणी कोणाही बरोबर आणि कुठेही खेळता येईल ना?