Menu
image
image

GOSHTINCHI GOSHTA

By: Wayam Magazine
4.3 image
00:00:00 --:--:--

 (एकाच आवाजात रेकॉर्ड व्हावी.)

लहानपण समृद्ध करणारी एक गोष्ट म्हणजे ‘गोष्ट’! तुम्ही सुध्दा गोष्टी ऐकत, वाचत मोठे होताय.  माझ्या लहानपणी घरात टीव्ही, टेपरेकॉर्डर, कॉम्प्युटर ही साधनं नव्हती.

 त्यामुळे घरात आवडतं मनोरंजन काय? तर गोष्टी ऐकणं आणि वाचणं. माझी आई आणि आजी दोघीही मला खूप गोष्टी सांगायच्या. इसापनीतीमधील गोष्टी, अकबर-बिरबलाच्या गोष्टी,(घोड्याच्या टापांचा आवाज/तुतारी) शिवाजी महाराजांच्या गोष्टी अशा कितीतरी गोष्टी मी त्यांच्याकडून ऐकल्या आहेत. विशेषतः माझी आजी अगदी रंगवून रंगवून गोष्ट सांगायची. अगदी तालात! हावभाव करत. माझ्याशी गप्पा मारत. तेव्हा आजच्यासारखी रंगीत चित्रांची गोष्टीची पुस्तकं क्वचितच मिळत. पण माझ्या आजीचं गोष्ट सांगणं इतकं चित्रमय असे की, तिच्या वर्णनावरून रंगीत चित्र डोळ्यांसमोर उभं राहायचं. चांदोबाच्या अंगरख्याची गोष्ट सांगताना मला जणू त्या चांदोबाच्या गोल गरगरीत चेह-यावर भावना उमटलेल्या भासायच्या. आजच्या तुमच्या भाषेत सांगायचं तर, चंद्राच्या चेहे-यावर इमोजी उमटलाय असं मला जाणवायचं. हिरकणीची गोष्ट ऐकून रायगडचा तो कडा माझ्या मनावर इतका ठसला होता की, पुढे पाचवीत असताना जेव्हा मी पहिल्यांदा रायगडावर गेले आणि हिरकणी बुरुज पहिला, तेव्हा तो मला एकदम ओळखीचा वाटला होता.  

मला वाचता यायला लागल्यापासून मी झपाटून गोष्टी वाचू लागले. अगदी जादूचा अंगरखा, सूर्यावर स्वारी, टारझन, गोट्या, चिंगी, फास्टर फेणे... अगदी त्या त्या मुखपृष्ठासह आठवतात ही गोष्टींची पुस्तकं. तेव्हा गोष्टी वाचण्याचा नाद जो लागला तो लागला. अगदी आजही मी गोष्टी वाचते. 

मी आई झाल्यावर माझ्या लेकीला गोष्टी सांगू लागले. त्यात ती इतकी रमायची की, टीव्हीवरच्या कार्टूनपेक्षा तिला हा गोष्टीवेल्हाळ ‘स्टोरीटाईम’ जास्त आवडायचा. कधी मी सांगायचे, ती ऐकायची. कधी ती त्यात भर घालायची आणि मग छोट्या गोष्टी लांबलचक व्हायच्या. कधी कधी माझा एखादा अनुभव, आजूबाजूला घडलेल्या घटना याही गोष्टीरूप होऊन आमच्यात यायच्या.(Pleasant tune)अधूनमधून आम्ही ‘छान छान गोष्टी’च्या कॅसेट ऐकायचो. करुणा देव, भक्ती बर्वे यांच्या आवाजातील या गोष्टी फार मजेदार होत्या. म्हातारीची बोरं खाऊन जाणा-या कोल्ह्याच्या गोष्टीच्या शेवटी असलेले “या या कोल्होबा बोरं पिकली.. नाही, नाही म्हातारे, टेरी भाजली”, हे वाक्य तर आम्ही पुन्हा पुन्हा रिवाइंड करून ऐकायचो आणि खो खो हसायचो.माझ्या लेकीच्या प्राथमिक शाळेत वाचनाचा तास होता. आणि तिथेही तिला तिच्या ताईंकडून जी. ए. कुलकर्णी यांची ‘बखर बिम्मची’ आणि ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’, दिलीप प्रभावळकर यांचा ‘बोक्या सातबंडे’, अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळायच्या.  

गोष्टी ऐकणे आणि वाचणे ही किती समृद्ध करणारी सवय आहे! काही गोष्टी आपल्याला शहाणं, समजूतदार करतात. काही गोष्टी व्यवहारातील चतुराईच्या युक्त्या सांगतात. काही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या संवेदनांची डूब देतात. काही कथा आपल्याला कल्पनाविश्वात फिरवून आणतात. काही गोष्टी आपल्याला प्रेरणा देतात. काही गोष्टी आपल्याला नवनवे शब्द, नवी बोलीभाषा शिकवतात, तर काही गोष्टी नव्या संस्कृतीची ओळख करून देतात. अशाने आपली भाषा अधिक संपन्न होते, नवे संदर्भ माहीत होतात. काही गोष्टी आणि त्यातली व्यक्तिमत्त्वं आपल्या आयुष्यावर प्रभाव टाकतात. कुणाला प्रकाश नारायण संत यांच्या ‘लंपनच्या गोष्टी’ वाचून आपणही लंपनसारखं व्हावं असं वाटतं, तर कुणाला समशेर कुलूपघरेसारखं धाडसी व्हावंसं वाटतं! 

गोष्टी वाचल्याने आपली समजशक्ती वाढते. भरपूर गोष्टी वाचणा-या मुलांना अभ्यास करणं सोपं जातं. नवीन विषय शिकणं अवघड होत नाही, असंही निरीक्षण अभ्यासकांनी नोंदवलं आहे. मुळात, गोष्टी वाचणा-या मुलांना खूप मज्जा येते. मोठे झाल्यावर बालपणी वाचलेल्या गोष्टी आठवतात, त्यामुळे मोठेपणीसुद्धा ते वाचण्याची मज्जा लुटत राहतात. काही मुलं  वाचता वाचता छान लिहू लागतात, वेगवेगळ्या माध्यामांतून व्यक्त करू लागतात. आपापल्या जीवनात, क्षेत्रात जे जे करायचं, ते प्रभावीपणे करू शकतात.

खूप गोष्टी वाचा, ऐका, पाहा. कारण पुस्तकांच्या जोडीला आता तुम्हांला गोष्टी वाचून दाखवणारी अॅप, ऑडिओ बुक,पॉडकास्ट आहेत, वेबसाईट आहेत. 

(वयम् शीर्षकगीताची ट्यून)

वयम् सुध्दा आता अॅपद्वारे  कथांचा,लेखांचा आणि अनेक गमतीजमतींचा खजिना तुमच्यासाठी घेऊन येत आहे.

 तो खजिना नीट कान देऊन ऐका बरं!   याचबरोबरच खूप गोष्टी वाचा सुध्दा! 


मिनू- खरंच मित्रांनो, शुभदा चौकर यांनी सांगितलेलं मला तर अगदीच पटलंय!मी सांगणार आई-बाबांना हे अॅप घ्यायला!आणि तुम्ही?

Play Next Story
image
Meenu
Category: All
image
kalpak
Category: All
image
Joke
Category: All
image
Shabdranjan
Category: All
image
Bottle Tenis
Category: All
image
Kaalu
Category: All
image
manglavar swari
Category: All
image
parcel
Category: All
image
perfect gift
Category: All
image
towel dance
Category: All
image
papad chat
Category: All
image
paper weight
Category: All
image
kajvyacha kandil
Category: All
image
paus kavita
Category: All
image
vinod
Category: All
image
rutu kavita
Category: All
image
shevatcha pan
Category: All
image
vinod002
Category: All
image
vinod003
Category: All
image
vinod004
Category: All
My Cart
Empty Cart

Loading...