Menu
image
image

Meenu

By: Wayam Magazine
4.3 image
00:00:00 --:--:--
  1. 1- SHABDAKHEL 001
(मिनूच्या आवाजात)
अनेक अक्षर एकत्र आली की शब्द तयार होतो हे तर तुला माहित आहेच.म्हणजे बघ हं! अ.....ने....क
अशी तीन अक्षरं एकत्र आली आणि 'अनेक' हा शब्द तयार झाला .मग असे किती अक्षरी शब्द असू शकतात?
अगदी एक अक्षरी सुध्दा असतात बरं का! तू,मी,ती,ही,हा.....असे बरेच!
पण आज आपण शोधायचे आहेत दोन अक्षरी शब्द!त्यात अजून एक गंमत आहे . तुला सूर्य काढता येतो का?म्हणजे येतच असणार. तर.....त्या सूर्यात लिही 'रा' आणि त्याच्या प्रत्येक किरणावर लिहा असं एक अक्षर की जे लिहीलं की दोन अक्षरी शब्द तयार होईल.म्हणजे किरणावर 'जा' लिहा की तयार झाला राजा! राजा आला ,आता लिही 'णी' !बघ बरं 'राणी' पण आली.
आता त्या मध्यभागी असलेल्या 'रा' ला काय काय जोडता येतंय याचा विचार कर बरं!
मला तर बुवा रान,राठ, राग......सुचलं!अशी  भरपूर अक्षरं जोड आणि किरणं काढा. आता सांगा बरं, तुझ्या सूर्याला किरणं किती? 
हा खेळ आई-बाबा मित्रमैत्रीणी कोणाही बरोबर आणि कुठेही खेळता येईल ना?

2- revised reading कक S1-001
मिनू- सुट्टीत जिथे ट्रिपला जाशील, तिथे कुठे नदीच्या काठी सपाट-गोल आकाराचा एखादा दगड मिळाला, तर नक्की घेऊन ये! स्वरुपा वक्नाली आपल्याला त्याचा पेपरवेट कसा बनवायचा ते सांगतायत! ते ही अगदी कमी साहित्यात! 

3- GOSHTINCHI GOSHTA 001
मिनू- खरंच मित्रांनो, शुभदा चौकर यांनी सांगितलेलं मला तर अगदीच पटलंय!मी सांगणार आई-बाबांना हे अॅप घ्यायला!आणि तुम्ही?

4- कविता recording
मिनू- जशी चालीत गाता येणारी कविता असते ना?तशीच एखादी चमकदार कल्पना गुंफलेली कविताही असते. प्रशांत पोळ यांची काजव्यांचा कंदील अशीच एक कविता! ऐकू या?

5- Gumbow revised
मिनू-जंबो जंगलातली गोष्ट जरा वेगळी आहे बरं!फक्त इंग्लिश भाषेत म्हणून नव्हे हं!ती सावध ऐका कारण गोष्टीत एक प्रश्न गुंफला जाईल. 
मी सांगेन उत्तर पण तू ही जरा डोकं चालव!काय?प्रदीप देशपांडे यांनी लिहिलेली Jumbo Jungle Story ऐकू या .….
मिनू- समजलंय का उत्तर?बघ बरं, हेच आहे का?
मिनू- आवडली का गोष्ट?आणि गोष्टीतलं गणित?गंमत आहे ना?

6- मिनू- बिचारा गट्टूरमल!तुमच्या आजूबाजूचे गट्टूरमल आठवले ना? मी नाही होऊ देणार माझा गट्टूरमल! ज्येष्ठ साहित्यिक मुकुंद टाकसाळेंचं पटलंय मला! आलेच माझं दप्तर आवरुन…

7- revised प गि गोष्ट
मिनू- सांताक्लाॅजकडे तुम्ही कधी काही मागितल्य? ज्योने सुध्दा मागितलं होतं.आणि मग काय घडलं ते ऐकू या? सुचिता देशपांडे यांनी लिहिलेली 
ही गोष्ट Elizabeth Cody Kimmel या नामवंत लेखिकेच्या My Penguin Osbert या कथेवर आधारीत आहे. 
हाय दोस्तांनो, कसे आहात? मी मिनू! मी सहावीत आहे. माझं सगळीकडे बारीक लक्ष असतं हं. "इस नजर से कुछ नही बचता!" मला कोणीही फसवू वगैरे शकत नाही, बरं का!  उगीच कोणी फुशारक्या मारल्या की त्याची खोड जिरवायला मला खूप आवडतं. एकदा माझा मित्र बंडू, त्याच्यात शक्तीची फुशारकी मारत होता. ते ही  ठीक आहे पण तो  सोनूला आणि मला हसला. तेवढ्यात सुमा आजी बाजारातून जड पिशव्या घेऊन येताना दिसली. आम्ही लगेच जाहीरच करून टाकलं, "बंडू मदत करेल!” असं.(जिन्यात धाडकन पडल्याचा आवाज) सगळ्या पिशव्या उचलून नेताना बंडू पडला आणि त्याची फजिती झाली. मग आम्ही खूप हसलो. फिट्टमफाट!
बाबा म्हणतो, "तू लहान आहेस, मोठेपणचा आव आणू नकोस." मला माहितीये, मी कधी कधी लहान आणि कधीकधी मोठी असते! I know, how to take benefit of this!! 
मला गप्पा मारायलाही खूप आवडतं. मी अगदी कोणाशीही गप्पा मारू शकते. पानाफुलांशी, उंदरामांजराशी! खरंच! यावरून एकदा मी जाम घोळ घातला होता. आई-बाबांनी खूप खटपटी लटपटी करून घरात शिरलेल्या उंदीर पिंजऱ्यात अडकवला. मी खेळून आले. पालथी पडून त्या उंदराशी गप्पा मारत होते. पण तो उंदीर काहीच प्रतिसाद देईना. मला वाटलं, तो कंटाळला असेल. याला थोडा वेळ बाहेर काढावं आणि खेळून परत ठेवावं. पण मी पिंजरा उघडला (खटका उघ3डल्याचा आवाज)आणि पुढे काय झालं, हे काय सांगायला  हवंय?
आई म्हणते, मी स्वप्नाळू आहे. खरं आहे! माझ्या मनात मज्जा करण्याचे अनेक प्लॅनस् सुरू असतात. 
मला वाचायलाही खूप आवडतं. वयम् मासिक तर माझं एकदम फेव्हरेट! त्यातल्या गमतीगमती मी नेहमी सर्वांना सांगत असते. 
मग करणार ना, माझ्याशी दोस्ती? 

Play Next Story
image
kalpak
Category: All
image
Joke
Category: All
image
Shabdranjan
Category: All
image
Bottle Tenis
Category: All
image
Kaalu
Category: All
image
manglavar swari
Category: All
image
parcel
Category: All
image
perfect gift
Category: All
image
towel dance
Category: All
image
papad chat
Category: All
image
paper weight
Category: All
image
kajvyacha kandil
Category: All
image
paus kavita
Category: All
image
vinod
Category: All
image
rutu kavita
Category: All
image
shevatcha pan
Category: All
image
vinod002
Category: All
image
vinod003
Category: All
image
vinod004
Category: All
My Cart
Empty Cart

Loading...