मिनू- जशी चालीत गाता येणारी कविता असते ना?तशीच एखादी चमकदार कल्पना गुंफलेली कविताही असते.प्रशांत पोळ यांची काजव्यांचा कंदील अशीच एक कविता! ऐकू या?
(एक निवेदक)
चार कुडाच्या भिंती
कवाडे करकर करती (झापांचा आवाज)
चिमूचे घर
दूर माळावरती.
(वा-याचा आवाज)
हस्तकलेत चिमूने
तयार केला कंदील
रोषणाईशिवाय त्याला
सौंदर्य कसं येईल?
अचानक झाला विद्युतबिघाड
काळाकुट्ट अंधार सभोवार
(रातकीड्यांचा आवाज)
झाडीतील काजवे आले घरात
पटकन् शिरले कंदिलात. (आनंदी ट्यून)
चिमुकला कंदील
हळुवार उजळला
चिमूचा चेहरा
खुदकन् हसला
माळरानावर एकच
काजव्यांचा कंदील
अशी गंमत सारी
चिमूच सांगील!