Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 4

image By Wayam Magazine 14 November 2022

On 22nd April 2020, Children Magazine

वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, ही अनुभव-मालिका?

आज वाचा भाग- 4.

1. नवे खेळ, नवी निरीक्षणे

कालच आम्ही एक भिंत रंगवली. शिवाय आम्ही एक संवादशिडी बनवली आहे. हा खेळ सापशिडीसारखा आहे, पण वेगळा! प्रत्येक घरात वेगळे पर्याय आहेत. एका घरात टाळ्या वाजवा, दुसऱ्यात- आजी आजोबांचे संपूर्ण नाव सांगा, राष्ट्रीय फूल सांगा, इत्यादी. खूप मजा येते हा नवीन खेळ खेळायला.
भाजी चिरणे, फोडणी देणे, कपबशी विसळणे, कपड्यांच्या घड्या करणे, लादी पुसणे अशी कामे करतेय. आई रोज घरात किती काम करत असते, हे आता कळतंय... यापुढे नेहमीच आईला मदत करेन.
शिवाय आम्ही घरच्या घरी सॅनिटायझर बनवलंय. ते वापरून आम्ही रोजच्या रोज सर्व दारे, हॅन्डल्स, नळ वगैरे पुसून घेतो.

तसेच आम्ही fb live वरचे काही चांगले कार्यक्रम पाहतो. पुलंची नाटके तसेच हृषिकेश मुखर्जी यांचे सिनेमे बघतो. सगळे मिळून एकत्रित वाचन करतो. ‘वयम्’ मासिकाने आधीचे अंकही ऑनलाइन उपलब्ध करून पर्वणीच दिलीय आम्हांला!

मी सध्या कथ्थकचा सरावही करतेय. रोज शुद्धलेखन आणि अक्षर वळणदार कसे काढावे ह्याचा सराव करतेय. छोटे छोटे विज्ञान प्रयोग करून पाहतेय.

आमच्या आजूबाजूला झाडे आहेत, त्यावर नाचण, बुलबुल, वटवट्या, चिमण्या जवळून बघता येतात. गेल्या आठवड्यात आमच्या बेडरूमच्या खिडकीच्यावर खारूताईने पिल्लांना जन्म दिला. त्यांना बघण्यात वेळ मस्त जातोय. अधूनमधून शाळा आणि मित्रमैत्रिणींची आठवण येतेय. माझ्या कवितेने शेवट करते-

आता नो हस्तांदोलन ओन्ली नमस्कार
सर्वांनी मानले आपल्या संस्कृतीचे आभार
भारतीय आपण सारे आहोत लढवय्ये
करूया करोनाला हद्दपार...

-जान्हवी ओम दांडेकर,
पाचवी
सरस्वती शाळा (ठाणे पश्चिम)

२. Unexpected Vacation, New Experiences!

The Covid–19 pandemic has made me wash my hands 30 seconds per hour! My family has become hygiene freak.

Luckily, I am not completely wrapped in boredom. My school wanted to keep us in touch with studies and the answer was Google Classroom. We have daily meet with teachers and we see each other face to face, just like school!! My Kathak teacher too has arranged online classes. We send a practice video each day.

These two activities have taught me the importance of digital world and I enjoy this new experience of online learning. It’s exciting to watch my dad work online from home. I have developed keen interest about the Solar System and the Universe. Every day I read a topic from ‘The Children’s Encyclopedia of The Universe’ and explore the night sky with “Star Walk 2” app. It was fun to organise my home library. I am also enjoying my all-time hobby of quilling.

I do feel scared after listening to news about patients. I question my parents about when things would get back to normal? Mom explains me that this worse time will soon pass. It is inspiring to see doctors, nurses, police officers, BMC workers striving hard with positive strength.

Every cloud has a silver lining!! This lockdown has given our planet Earth pollution free time to revamp and heal the Ozone layer. All birds now fly by the height of 5th floor. Car honks are replaced by sweet chirping of birds.

Hope is always stronger than fear. The heartening sound of claps for doctors and the warm glow of Diyas has united everyone and filled the air with hope that we will fight back together as citizens of Mother Earth!

-Ojal Khanvilkar,
6th,
Mainadevi Bajaj International School, Malad, Mumbai

३. शांततेतील नव्या जाणिवा

दहावीचा पोर्शन वेळेतच पूर्ण करण्यासाठी आमच्या शाळेने लॉकडाऊन होण्याआधीच Virtual (Online) Classroom चा पर्याय निवडला. ऑनलाइन लेक्चर, दहावीची आगळीवेगळी सुरुवात! त्यासाठी Zoom Meeting, Google Hangout Meet अशा Appsचा उपयोग करायला मी शिकले. मग या technologyच्या जगात माझा हार्मोनियमचा आणि चायनीजचा क्लासही मागे राहिला नाही.

सुरुवातीला सगळेच घरी असल्याने खूप छान वाटत होते. घर आवरणे, नवीन पदार्थ शिकणे, मेंदी काढणे, मी बनवलेला केक कापून आईचा वाढदिवस साजरा करणे अशा गमतीजमती चालू होत्या. पत्ते, कॅरम, सापशिडी अशा अनेक खेळांना बर्‍याच दिवसांनी हवा लागली. बाल्कनीतून दिसणारा निवांत NH 48 पाहून भारी वाटलं. प्रथमच घरबसल्या विविध पक्ष्यांचं कूजन अनुभवता आलं.

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आम्ही तिघांनीच घरी गायन-वादनाची मैफल रंगवली. रामनवमीच्या दिवशी आजोळचा रामजन्म सोहळाही ऑनलाइन अनुभवला आणि संध्याकाळी लावलेल्या दिव्यांची तेवणारी ज्योत मनात सकारात्मकता निर्माण करून गेली.

आता मात्र शाळेची, मैत्रिणींची ओढ लागली आहे. घरी बसूनही अभ्यास होतोय, परंतु Screen Time वाढल्याने डोळे आणि डोकं दुखायलाही सुरुवात झाली आहे.

एरव्ही आवाजातील शांतता शोधणारे आपण आता शांततेतील आवाज ओळखायला शिकतो आहे!

-सई वैभव जोशी,
दहावी,
ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे

४. रोज काहीतरी नवं

सुरुवातीला टी.व्ही.वरच्या बातम्या पाहून एक उदासीनता जाणवू लागली होती. मग आम्ही चौघांनी मिळून ठरवलं की, एकावेळी अर्ध्या तासापेक्षा जास्त बातम्या बघायच्या नाहीत.

आम्ही ठरवलं की, रोज काहीतरी नवं करायचं. मी रोज एक चित्र काढायचं, असं ठरवलं. बहिणीबरोबर नाच बसवण्याचा प्रयत्न केला. लेखन केलं, कविता केल्या, वाचन करत आहे, ऑनलाईन स्पॅनिश भाषा शिकले, चांगले चित्रपट पाहिले. मी आणि बाबांनी मिळून शब्दकोडं तयार करण्याचं ठरवलं आणि ती कोडी सगळ्यांनी मिळून सोडवली.

या सगळ्यात अजून एका क्षेत्रात मी घुसले ते म्हणजे ‘स्वयंपाकघर’. मी अनेक पदार्थ बनवले आणि मग आम्ही ठरवलं, रात्रीचा स्वयंपाक मी करणार!

आमच्या गच्चीवरच्या बागेत बागकाम केलं. जुन्या कापडापासून पाय-पुसणे, मास्क शिवले. ही मोठ्ठी सुट्टी मला ख़ूप काही शिकवत आहे. या सुट्टीमुळे माझ्यातील ‘मी’ मला नव्यानेच कळाले.

-अनुष्का कशाळकर,
दहावी
आनंदनिकेतन, नाशिक.

5. माझी सुट्टी

१४ तारखेला शाळेत सरांनी सांगितले की, उद्यापासून शाळेत यायचे नाही. मला समजलेच नाही की, ते का येऊ नका म्हणत आहेत. ते करोनाविषयी बोलले, पण मला काही त्या वेळी नीट समजले नाही. नंतर सर म्हणाले, आता थोडे दिवस शाळा बंद असतील, पण सुट्टी संपल्यावर परिक्षा नक्की होईल. त्यामुळे तुम्ही घरी रोज अभ्यास करायचा. मी समजलो, शाळा सुरु होतील तेव्हा परीक्षा घेतील. मी बाबांबरोबर रात्री जेवताना बातम्या बघत होतो. त्यात करोनाची बातमी मी पहिल्यांदाच ऐकली. त्याबाबत मी बाबांना विचारले, बाबांनी मला त्या विषयी नीट समजावून सांगितले. मी त्यांना म्हणालो, बाहेर खेळायला नाही जाता येणार, पण मला शेजारच्या घरी खेळायला जाता येईल ना? तर आई- बाबा दोघेही म्हणाले, “नाही, कोणाहीकडे जाता येणार नाही, आजपासून सर्व खेळ घरीच खेळायचे. मित्रानांही घरी बोलवायचे नाही.” मी म्हणालो, “१४ एप्रिलपर्यंतच ना? मग आम्ही खेळू.” आई म्हणाली, “पुढे तारीख वाढेल की काय अजून तरी माहीत नाही. पण आता घराबाहेर पडायचे नाही.” मी एकटा कसा खेळू? असे मी म्हणालो आणि मला सुचले की, आत्याचा मुलगा पाच वर्षांचा आहे तर शिव दोन वर्षांचा आहे. त्याच्याशी खेळणे म्हणजे संकटच आहे. कोणताही खेळ ते जास्त वेळ खेळत नाहीत. मग मला वाटले, जर मित्राकडे जाताच येत नसेल तर या दोघांच्या बरोबर खेळायला पाहिजे असे म्हणून मी त्यांच्याबरोबर खेळतो, त्यांना पुस्तक वाचून दाखवतो. दोघेही माझ्यापाठोपाठ गोष्ट म्हणतात. त्यामुळे त्यांना न वाचताही गोष्टी यायला लागल्या आहेत. थोडासा अभ्यास करतो. कार्टून बघतो. त्यामुळे माझा वेळ चांगला जात आहे. या सुट्टीत मी यूट्यूब बघत कागद-काम छान करत आहो. सारखे ऐकायचे, बघायचे आणि कागद-काम करायचे. त्यातून बघून मी हलणारा पंखा, पक्षी, फुलपाखरू आणि बेडूक या वस्तू तयार केल्या आहेत. आईला मदत करताना भाकरीचे पीठ कसे भिजवायचे, भाकरी कशी थापायची आणि भाजायची कशी, हे पण शिकलो. थोडा वेळ लक्ष दिले नाही की, भाकरी जळून जाते हेही लक्षात आले. मला वाटायला लागले आहे की, १४ एप्रिलनंतर सुद्धा बंदच राहील. उन्हाळा सुरू झाला आहे, तरी सर्वांना गरम पाणी प्यावे लागते. थंड पाणी कोणीही पीत नाही. सकाळी मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या लागते. हे सर्व किती दिवस चालू राहील, काहीही माहीत नाही.

-विराज विशे,
पाचवी,
( जि. पालघर)


एप्रिल २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...