Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 10

image By Wayam Magazine 14 November 2022

 On 15th May 2020, Children Magazine

विस्मृतीतील कलांची ओढ !

मोकळा वेळ ही पर्वणी वाटलीये मुलांना. शाळा, होमवर्क, ट्यूशन क्लास यांनी गच्च झालेल्या दिवसांत मुलांना छंद जोपासायला वेळच मिळत नाही. भरतकाम, शिवणकाम, बागकाम या कला तर फार मागे पडतात. करोनाच्या सुट्टीत काही मुले या विस्मृतीतील कलांकडे वळली. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमामुळे ही मुले लिहिती झाली. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.

आज वाचा भाग- 10.

1. शिवणकाम, बागकाम शिकलो

मी कडावल गावात राहतो. आमचं मेडिकल स्टोअर्स व किराणा दुकान आहे. मास्क व सॅनिटायझरसाठी लोकांची गर्दी होऊ लागली. त्याचा तुटवडा होता. मास्क कमी असल्यामुळे ती रात्रीच्या वेळी मास्क शिवायची. मी तिच्याकडून शिवणकाम शिकून घेतले आणि सुती कापडाचे दुहेरी थर असलेले १०० मास्क बनवले. शिवाय मी जनजागृतीसाठी विविध बोर्ड बनवले आणि आमच्या दुकानात लावले. माझे हस्ताक्षर खूप खराब आहे, पण मी माझा मित्र जयवर्धन केणी याला कॅलिग्राफी करताना बघितलं होतं. त्याचा थोडाफार उपयोग मला हे बोर्ड बनवताना झाला. घरी वापरण्यासाठी कोरफड व स्पिरीट यापासून सॅनिटायझर बनवला आहे. तसेच मी जादूचे प्रयोगही शिकत आहे.

आईला व आजीला स्वयंपाक करण्यात मदत करतो. बटाट्याचे अप्पे, फणसाचे वडे, केक असे पदार्थ बनवले. मला शाकाहारी पदार्थ आवडत नाहीत, नॉनव्हेज आवडते. पण करोनाच्या भीतीमुळे मी आता रोज भाज्या खातो, तसेच दुधात हळद घालून गरम गरम दूध पितो.

सकाळच्या सत्रात मी आमच्या बागेमध्ये झाडे लावणे, झाडांना पाणी घालणे, पाण्यासाठी पाट खणणे अशी विविध कामे करत असतो. नारळाच्या झाडांसाठी अळी केली; आणि हो, मी नारळाच्या झावळ्यांची चटई बनवायला शिकलो. ते काम मी माझ्या बहिणी युगा व ओवी यांनाही शिकवले. दुपारच्या वेळेत मी आई, बाबा, आजी, काकी, काका यांच्यासोबत विविध गोष्टींवर मुक्तपणे चर्चा करत असतो.

एकदा मी सकाळी लवकर उठून दुर्बिणीतून शनी व गुरू या दोन ग्रहांचे निरीक्षण केले. आमच्या युरेका क्लबच्या सर्व मुलांना हे फोटो पाठवले.

संध्याकाळी आम्ही सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक-विद्यार्थी कॉन्फरन्स कॉलवर एकत्र येऊन प्रार्थना व काही गोष्टींवर चर्चा करतो आणि कोडी सोडवतो.

-निहार अमोल मुंज,
आठवी
भडगाव हायस्कूल, युरेका सायन्स क्लब सदस्य

२. जनजागृतीसाठी अ‍ॅनिमेशन फिल्म

सध्या मी टीव्हीवरील बातम्या नित्यनियमाने आई-बाबांबरोबर पाहत आहे. त्यावर आम्ही सर्वजण चर्चासुद्धा करीत असतो. रामायण व महाभारत या मालिका न चुकता पाहतो. रामायणातील हनुमानाच्या विविध लीला मला फारच आवडल्या. शिवाय मी माझ्या ताईच्या मदतीने एक नवीन गोष्ट शिकलो; ती म्हणजे जनजागृतीसाठी अ‍ॅनिमेशन फिल्म तयार करणे. करोनाविषयी Go Corona, त्यानंतर The World Health Day-The War Against Corona तसेच Better safe than sorry या अ‍ॅनिमेशन फिल्म मी तयार केल्या. या फिल्मना मी स्वतःचा आवाजही दिला आहे. हे व्हिडिओज यू-ट्यूबवर वेदांत फाटक या नावाने अपलोड केले आहेत.

-वेदांत जगदीशचंद्र फाटक,
सातवी
नंदादीप विद्यालय, गोरेगाव

३. गच्चीत तंबू-निवास!

संचारबंदी जाहीर होण्याआधी माझी एक बहीण आमच्याकडे मुंबईहून आली होती, ती इथेच अडकली. आता आम्ही तिघी जणी होतो. एके दिवशी आम्ही मिळून सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवला. एकदा मी, बाबा, सोहा आणि सियाने मिळून गच्चीत तंबू बांधला आणि रात्री त्यातच झोपलो. सुट्टी असली तरी शाळेतून रोजचा अभ्यास मात्र येत होता. असा online अभ्यास पहिल्यांदाच केला. सुरुवातीला आम्ही खूप टीव्ही बघायचो, मग माझ्या आईने 1 ते 6 या वेळात टीव्ही न बघण्याचा नियम केला. त्यानंतर मी रोज यादी करून काय काय करायचं ते ठरवायला लागले. पाचवी व सहावीत आम्हांला शाळेत भरतकाम होतं, पण आता अभ्यास वाढल्यामुळे ते बंद झालं होतं. मग आजीकडून रुमाल घेऊन रुमाल भरले. आई आणि बाबा रोज रात्री आमच्याबरोबर पत्ते खेळतात. या सुट्टीत मी पुस्तकंही वाचते आणि वेगवेगळ्या विषयांवर लिहितेही आहे. कधी कधी झोक्यावर बसून शाळेची, वयम् - IPH च्या ‘बहुरंगी बहर’ शिबिराची आठवणही काढतेय.

-आभा गोकर्ण – आठवी,
आनंद निकेतन, नाशिक

४. व्यायामाचा क्लास घेतला

अचानक मिळालेल्या सुट्टीत मी रोज लवकर उठून घराचा केर काढू लागले. घर पुसून घ्यायला लागले. आईने मला जाणवून दिलं की, तू बॅडमिंटनपटू आहेस, तुला फिट राहण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग मी रोज गच्चीवर जाऊन व्यायाम करू लागले. आमच्या कोचसरांनी आम्हांला व्यायामाचा व्हिडिओ पाठवला होता. त्यात एक गंमत झाली की, जेव्हा मी व्यायाम करायचे तेव्हा नेमकी आमच्या बिल्डिंगमधली एक लहान मुलगी, तिची आई आणि आजी अशा तिघी गच्चीत यायच्या. त्या सुद्धा माझ्याबरोबर मी करीन ते व्यायाम करू लागल्या. बघता बघता मी अचानकपणे व्यायामाचा क्लास घ्यायला लागले. आईने गेल्या वर्षी माझ्यासाठी काही इंग्रजी पुस्तकं आणली होती आणि मी त्यांच्याकडे वर्षभरात ढुंकूनही पाहिलं नव्हतं. आता चक्क मी दोन दिवसाला एक अख्खं पुस्तक वाचून पूर्ण करू लागले. त्यातले न कळलेल्या शब्दांचे अर्थ शोधून ते वापरात आणू लागल. हीच आयडिया आईने माझ्या एका मैत्रिणीलाही सांगितली. मग आम्ही दोघी रोज त्या नवीन शब्दांबद्दल चर्चा करू लागलो. त्यामुळे आम्हा दोघींनाही मजा यायला लागली.

-स्वानंदी दाते, सातवी
अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, गोरेगाव, मुंबई.

५. कित्ती या वर्कशीट्स?

यंदा शाळेतील माझी पहिलीच परीक्षा होणार होती. कारण आमच्या शाळेत तिसरीपर्यंत परीक्षा नसते. म्हणून मी Excited होतो. पण परीक्षाच रद्द झाल्या. जाम मूड-ऑफ झाला. आमच्या टीचरने आम्हांला खूप ऑनलाइन वर्कशीट्स पाठवल्या. त्या पूर्ण करून टीचरला पाठवायच्या. मी सुरुवातीला खूप वर्कशीट्स सोडवल्या, पण नंतर कंटाळा यायला लागला. आपल्या पंतप्रधानांनी सांगितले होते, त्याप्रमाणे डॉक्टर व पोलीस यांचे कौतुक करण्यासाठी टाळ्या वाजवल्या. खूप छान वाटले. मी इंग्लिश मिडियममध्ये शिकतो. पण मला मराठीत लिहायला आवडते. मराठीत मोठा निबंध मी पहिल्यांदाच लिहितो आहे. आम्हांला सुट्टी हवी असते ती खेळण्यासाठी, घरी बसण्यासाठी नाही. गो करोना गो !

-स्वरम जोशी, चौथी
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन इंटरनॅशनल विद्यालय, बोरीवली. मुंबई.

6. Online learning for the first time!

Due to lockdown, I was unable to purchase the books of Std.X. Initially I was little bit afraid of Online Learning Apps as I was habitual with my teachers'''''''''''''''''''''''''''''''' teaching. After 3-4days, I became used to it. I even cooked food for my family under supervision of my mother. And guess what, my parents loved the items prepared by me. I was attending my music classes online using Zoom cloud meeting. Then, my school also came up with online classes where I was able to see my teachers and my friends. So, I was feeling as if I was at school. I participated in story and poem reading competition where I had to record an audio and send through WhatsApp and also music competition where I had to shoot the video of my singing and share through WhatsApp. I started writing a story daily. My mother was giving me a topic for that, which helped me in improving my writing.

-Yash Pravinkumar Dabade, Std.X,
Pune


मे २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...