Menu

श्रीनिवास रामानुजन

image By Wayam Magazine 14 November 2022


By Kanchan Joshi, Wayam MAgazine,  On 22nd December 2020, Children Magazine

गणितज्ज्ञ रामानुजन यांची आज जयंती आहे. यशाची बीजं बरेचदा बालपणातच दिसतात. रामानुजन शाळेत असतानाची गोष्ट! एके दिवशी शाळेतल्या गणिताच्या शिक्षकांना शिकवण्याचा अतिशय कंटाळा आला होता. विद्यार्थ्यांना अत्यंत अवघड काम द्यावं आणि आपण आराम करावा असा ‍विचार त्यांनी केला. १ ते १०० पर्यंतच्या आकड्यांच्या बेरजा मुलांना करायला लावून हे महाशय स्वस्थ बसले होते . पण त्या दिवशी आराम त्यांच्या नशिबातच नसावा! काही मिनिटांतच एक विद्यार्थी गुरुजींच्या जवळ येऊन म्हणाला, “गुरुजी, झालं माझं!” आता आश्चर्यचकित व्हायची वेळ गुरुजींची होती.

काही दिवसांनी याच विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांना ‍विचारलं की, कोणत्याही आकड्याला त्याच आकड्याने भागलं तर उत्तर एक येतं असं आपण म्हणता, मग शून्याला शून्याने भागलं तर? उत्तर एक यायला हवं! शिक्षकांना उत्तरच सुचेना!

‘टाइम’ या जगप्रसिध्द साप्ताहिकाने गेल्या १०० वर्षांतील थोर तत्त्वचिंतकांची एक सूची (१९९९) प्रसिध्द केली. त्यात यादीतील भारतीय व्यक्ती होती गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन् ! अवघं ३२ वर्षाचं आयुष्य लाभलेला हा गणितज्ञ भारताच्या सुपुत्रांपैकी एक आहे.

© कांचन प्रशांत जोशी
My Cart
Empty Cart

Loading...