Menu

कार्बन-ठसे कमी करा!

image By Wayam Magazine 15 September 2023


मित्रांनो, काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. पहिलीत शिकणाऱ्या माझ्या मुलीने एकदा शाळेतून आल्यावर मला प्रश्न विचारला, "आई तुला pollution म्हणजे काय ते माहिती आहे का?" तिला तिच्या शाळेत प्रदूषणाबद्दल बरेच काही सांगितले होते. मग आम्ही पुढे बरेच दिवस प्रदूषणाबद्दल अनेक गोष्टी बोलयचो. प्रदूषण कशा कशामुळे होते,प्रदूषण कमी व्हावे म्हणून काय करता येईल. तेव्हा एक गोष्ट आमच्या लक्षात आली ती म्हणजे प्रदूषण करणाऱ्या व्यक्तीला,देशाला प्रदूषण करतात म्हणून काही शिक्षेसारखी गोष्ट केली आणि प्रदूषण टाळणाऱ्या किंवा प्रदूषण कमी करणाऱ्या माणसाला प्रोत्साहन दिले तर त्याचा उपयोग होईल का?

आज मी तुम्हाला "कार्बन क्रेडीट" या एका वेगळ्याच विषयाबद्दल सांगणार आहे ज्याचा प्रदूषण या विषयाशी जवळचा संबंध आहे. आपल्या सर्वांच्या घरात वेग वेगळ्या प्रकारची यंत्र असतत. फ्रीज, गीझर, मायक्रोवेव, टेलीविजन, वॉशिंग मशीन,मिक्सर कितीतरी यंत्र ज्याच्या वापरासाठी कुठची तरी उर्जा किंवा energy म्हणजेच कुठचे तरी इंधन (fuel) वापरावे लागते, आणि जेव्हा आपण इंधन वापरतो तेव्हा त्याचा पर्यावरणाशी संबंध येतोच. आपण जी इंधन वापरतो त्या इंधनाच्या वापरातून कार्बन डाय ओकसीड आणि तत्सम वायू हवेत सोडले जातात. आपण बस,कार अशा वाहनातून प्रवास करतो त्या वाहनांमध्ये वापरले जाणारे पेट्रोल किंवा डीझेल सुद्धा असे वायू हवेत पसरवतत. जी इंधने "Fossil Fuels " प्रकारातली असतात ती जाळल्यामुळे carbon dioxide , methane , nitrous oxide , hydroflurocarbons असे वायू हवेत मिसळतात, ह्याच वायुना "Greenhouse Gases" म्हणतात. fossil fuels म्हणजे जीवाश्म इंधने. उदाहरणार्थ कोळसा, नैसर्गिक वायू, तेल ह्या इंधनांचे महत्व हे आहे कि वर्षानुवर्षे नैसर्गिक प्रक्रियेतून ही  इंधने तयार होतत. हि इंधने तयार होण्यासाठी अनेक वर्षांची नैसर्गिक प्रक्रिया कारणीभूत असते आणि ज्या वेगाने आणि ज्या प्रमाणात आपण ती वापरत आहोत त्या वेगाने ती निसर्गात तयार होवू शकत नाहीत. 

कार्बन क्रेडीट या संकल्पनेचा उगम आहे "क्योटो प्रोटोकोल" मध्ये. आता तुम्ही म्हणाल हे नवीन काय? क्योटो प्रोटोकोल? जगातल्या अनेक महत्वाच्या देशांची जपानमधल्या क्योतो ह्या ठिकाणी एक मीटिंग झाली होती त्यात जगभरातले प्रतिनिधी जमले होते. प्रदूषण कमी करण्यासाठी काय काय उपाय  करता येतील याचा विचार तेथे  केला गेला आणि काही उपाय ठरवले गेले. ह्यात एक गोष्ट अशी ठरली कि जगभरातल्या देशांना किती प्रमाणात Greenhouse Gases वातावरणात सोडता येतील याचा quota ठरवून दिला गेला. सगळ्या देशांची प्रगती सारख्या प्रमाणात नसते. त्यामुळे सगळ्या देशांना सारखेच नियम लावता येणार नव्हते. म्हणून प्रत्येक देशाचा कोटा वेगळा. Greenhouse gases चे वातावरणातले प्रमाण कमी करण्याबद्दल जागृती करण्याच्या उद्देशाने कार्बन क्रेडीट हि संकल्पना उदयाला आली. 

 ‘कार्बन क्रेडीट’च्या दोन मुख्य बाजू आहेत. एक म्हणजे कार्बन क्रेडीट निर्माण करने. ते कसे होणार? एखाद्या माणसाने किंवा कारखान्याने असे काही तंत्रज्ञान वापरले कि ज्यामुळे Greenhouse Gas Emission कमी होते तर त्याने कार्बन क्रेडीट निर्माण केले असे म्हटले जाते. दुसरी बाजू आहे कार्बन क्रेडीट विकत घेण्याची. एखाद्या उद्योगधंद्याला आपले तंत्रज्ञान सहज बदलता येत नाही. त्यांच्या तंत्रज्ञानामुळे Greenhouse Gases Emission कमी होत नाही तेव्हा ती कंपनी कार्बन क्रेडीट विकत घेते, म्हणजेच Greenhouse Gases Emission ची परवानगी घेते. 

मित्रांनो, कार्बन क्रेडीट संकल्पेनेमागाचा उद्देश काय आहे? Greenhouse Gases Emission कमी करने. एक व्यक्ती किंवा एक कंपनी Greenhouse gases emission कमी करून कार्बन क्रेडिट्स निर्माण करते, त्यासाठी तिने  कोणत्या तरी  नवीन तंत्राचा वापर केला असणार. म्हणून तिला काहीतरी प्रोत्साहन मिळाले पाहिजे की नाही? तर हे प्रोत्साहन कसे मिळते? तर जी कंपनी प्रदूषण करत असते ती कंपनी हि कार्बन क्रेडिट्स विकत घेते. म्हणजेच जो प्रदूषण घडवतो आहे त्याला त्याची किंमत मोजावी लगते. "Polluter Pays " असे हे तत्व आहे. जो प्रदूषण वाढवतो त्याने त्याची किंमत मोजलीच पहिजे.. कळले का आता?  

वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर कार्बन क्रेडीट म्हणजे काही ठराविक प्रमाणात कार्बन बाहेर फेकण्याची परवानगी आणि जर त्या प्रमाणात कार्बन फेकला नाही  तर उरलेली कार्बन सोडण्याची परवानगी दुसऱ्याला विकत घेता येते. 

तात्पर्य काय तर कार्बन सोडण्याचे प्रमाण कमी करणे सोपे नाही म्हणून जो ते कमी करेल त्याला कार्बन क्रेडिट्स विकून काही फायदा मिळेल. आणि जो कार्बन सोडणे कमी करत नाही त्याला किंमत मोजून म्हणजेच कार्बन क्रेडिट्स विकत घेऊन प्रदूषण करण्याची किंमत मोजावी लगेल.

मी तुम्हाला एक छानसे उदाहरण सांगते. म्हणजे हा कठीण विषय तुम्हाला सहजपणे समजेल. दिल्ली शहरामधल्या मेट्रो रेल बद्दल तुम्ही ऐकले असेल. ही  मेट्रो रेल चालवणारी जी कंपनी आहे तिचे नाव आहे "दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ". या कंपनीने कार्बन क्रेडिट्स निर्माण केली आहेत. त्यांनी ही क्रेडिट्स कशी निर्माण केली? त्यांनी अशी ब्रेकिंग पद्धत वापरली की ज्यामुळे विजेचा वापर ३०% ने कमी झाला. अशा पद्धतीने कार्बन क्रेडिट्स मिळवणारी ही  जगातली पहिली रेल्वे कंपनी आहे. 

कयोटो प्रोटोकॉल चा एक भाग म्हणून "Clean development mechanism " आले. आता हे नवीन काय? तर तुम्हाला माहीतच आहे कि जगातल्या सगळ्या देशांची प्रगती काही सारख्या प्रमाणात झालेली नाही. अमेरिकेसारखे देश अतिप्रगत आहेत तर आफ्रिका खंडामधाल्या अनेक देशांना अजून बरीच प्रगती करायची आहे. त्यामुळे किती प्रमाणात प्रदूषण  येईल याचे निकष सगळ्या देशांना सारख्या प्रमाणात लावून चालणार नहित. "Clean development mechanism "मध्ये कमी प्रदूषण करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. उदाहरणार्थ जपान सारखा अति प्रगत देश भारतासारख्या देशाला कमी प्रदूषण करणारे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी किंवा वापरण्यासाठी आर्थिक मदत करू शकतो. म्हणजेच भारतातली एखादी कंपनी असे स्वच्छ तंत्रज्ञान वापरून आणि प्रदूषण कमी करून कार्बन क्रेडिट्स मिळवू शकते आणि ती क्रेडिट्स दुसऱ्या कंपनीला विकू शकते. 

म्हणजे मित्रहो तुम्हाला एक गोष्ट कळली का कि ह्या कार्बन क्रेडिट्स ची खरेदी- विक्री होत असते. खरेदी-विक्री होते म्हणजे त्यांच्या किमती मध्ये चढ-उतार होत असतात. 

मित्रहो, तुम्ही जरी लहान असलात तरी प्रदूषण घडवण्यात सर्वांचा असतो तसा तुमचाही छोटा वाटा आहेच. तेव्हा आवश्यकता नसेल तेव्हा विजेवर चालणारी उपकरणे बंद करण्यापासून ते प्लास्टिकचा कमीत कमी वापर करण्यापर्यंत अनेक प्रयत्न तुम्हालाही करता येतिल. तुमच्या पैकी काहीजण मोठे होवून एखादे तंत्रज्ञान वापरून कंपनी किंवा ऑफिस चालवाल, तेव्हा प्रदूषण रोकाणारे तंत्रज्ञान वापरा आणि कार्बन क्रेडिट्स मिळावा!

कार्बन फुट प्रिंट्स म्हणजे काय?

मुलांनो, तुम्हाला ठसा हा शब्द माहित आहे न? ठसा म्हणजे कुठच्याही गोष्टीची खूण किंवा परिणाम . ठसा कधी प्रत्यक्ष दिसणारा असतो किंवा कधी तो दिसत नसतो पण जाणवतो. उदाहरणार्थ वाघाच्या पाऊलखुणा दिसतात पण एखाद्या माणसाच्या विचारांचा देशावरचा ठसा दिसतो का? नाही! कार्बन फुट प्रिंट्स म्हणजे एखाद्या व्यक्तीने, कंपनीने, देशाने वातावरणात सोडलेल्या कार्बन डायऑकसाईडचे प्रमाण. हा कार्बन डाय ओक्सैड प्रत्येक वेळेला प्रत्यक्ष दिसला नाही तरी तो वातावरणात मिसळतो आणि प्रदूषण घडवतो. म्हणजेच त्याच्या पाऊलखुणा राहतातच. आपण मोटारकारने कुठे जातो तेव्हा पेट्रोल जळते, आपण घरातले दिवे लावतो तेव्हा वीज वापरली जाते या प्रत्येक गोष्टीतून थोड्या फार प्रमाणात कार्बन किंवा Greenhouse Gases वातावरणात मिसळत राहतात. हेच आपले कार्बन फूट प्रिंट्स! आपल्यामुळे प्रदूषण होत राहते आणि म्हणूनच आपण आपले आणि आपल्या आजूबाजूच्या सर्वांचे कार्बन फुट प्रिंट्स कमी करण्याचा नेहेमीच प्रयत्न केला पाहिजे.

- सुप्रिया देवस्थळी-कोलते

***

My Cart
Empty Cart

Loading...