Menu

‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 13

image By Wayam Magazine 16 November 2022

 On 27th May 2020, Children Magazine

बेगमीचा काळ !

करोना सुट्टीच्या काळात बच्चे कंपनी पापड, शेवया असे बेगमीचे पदार्थही बनवू लागली. मुळात बेगमी म्हणजे काय, ती का करायची, हे या काळाने शिकवले त्यांना! आणि घरच्यांशी मनसोक्त गप्पा मारण्यातून त्यांना कितीतरी नव्या जाणिवा झाल्या... हीही बेगमीच, त्यांना पुढच्या आयुष्यात पुरेल अशी!!

…‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात एव्हाना शेकडो मुले लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.

आज वाचा भाग- 13.

1. गरमागरम सामोश्यांची गम्मत!

माझी ताई माझ्यासाठी स्कुबी बनवायची. हे स्कुबी बनवणं मला खूप कठीण वाटायचं. ही गुंतागुंतीची कला आहे, असं वाटायचं. पण आता वेळ होता तर मी स्कुबी बनवण्याची कला शिकून घेतली. एक स्कुबी बनवायला किमान तीन दिवस लागले. पण आता ते सुंदर स्कुबी घरात लटकवताना खूप आनंद होतो.

टीव्हीवर सामोश्यांची जाहिरात लागते-
घाला पिठामध्ये तेल... मग कोन बनवा रे..
हळद, मिरची, मीठ मिसळून.. गरम तेलात तळा रे...
खरंच मी ते खूप मनावर घेतलं आणि तशीच्या तशी रेसिपी केली. त्या सामोश्यामध्ये मीठ खूप घातलं, त्यामुळे सामोसा खूप खारट लागला. आई मला खूप हसली. मला रडायलाच आलं. मग आईने मला मीठ, तिखट प्रमाणात घालायला शिकवलं. तेल गरम झाल्यावर मी सामोसा तेलात टाकला, तर तेल माझ्या तोंडावर उडालं. माझ्या चेहऱ्यावर दोन-तीन फोड आले, पण मी बनवलेला सामोसा खूप स्वादिष्ट होता.

गच्चीवर कपडे सुकत घालताना मी बाकी सगळ्या कपड्यांची घडी घालायचे, पण साडी तिथेच ठेवायचे. आई मला म्हणाली की, मी तुला साडीची घडी घालयला शिकवते. आता मला साडीची घडी घालता येते.

या सुट्टीत मी शेडिंग शिकले. चित्र कलर करताना शेडिंग खूप महत्त्वाचं असतं, हे मला बर्वे टीचरने शाळेत शिकवलं होतं. मी यूट्यूबचे व्हिडिओ बघून शेडिंग केलं. हे सर्व अनुभव मला खूप उत्साह आणि आनंद देऊन गेले.

-वैष्णवी डांगे, इयत्ता सहावी
कुमुद विद्यामंदिर, मुंबई

२. वाढदिवसाचे पैसे मुख्यमंत्री-निधीत

आमच्या गॅलरीत मम्मीने तुळस, सदाफुली, मोगरा, शेवंती, मनीप्लांट, गुलाब अशी फुलझाडं लावली आहेत. मम्मीबरोबर मी फुलझाडांना पाणी घालू लागले. त्यांच्यावर मायेने हात फिरवू लागले आणि फुलझाडांशी माझी मैत्री झाली. फुलझाडांना आम्ही खुंट्या लावल्या... आधार देण्यासाठी. कधी गोष्टींची पुस्तकं वाचली, कधी चित्रं काढली.

मम्मी-पप्पांना त्यांच्या बालपणीच्या गोष्टी सांगण्याचा आग्रह करून आम्ही त्यांच्या बालपणीच्या गोष्टी जाणून घेतल्या. त्या ऐकल्यावर आम्ही किती नशिबवान आहोत हे कळलं! कधी मम्मीला स्वयंपाकघरात मदत केली. भांडी धुवायला मदत करू लागले. चहा-कॉफी कशी करायची हेही शिकले.

या काळात माझ्या लहान भावाचा वाढदिवस होता. या वाढदिवसाला जे काही पैसे खर्च करणार होतो ते पैसे आम्ही करोना मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निधीत जमा केले. आम्ही घरी सुरक्षित आहोत, पण आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारी पोलिस यंत्रणा, सरकारी कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस या सर्वांविषयी आदर वाढला. अचानक संचारबंदी झाल्यामुळे मधल्यामध्ये अडकलेले कामगार, शेतमजूर यांच्याविषयी वाचून, पाहून फारच दया वाटली. शेवटी शाळेत शिकलेले गाणे आठवले- हम होंगे कामयाब एक दिन....

-दीक्षा लोहार, इयत्ता पाचवी
बदलापूर पूर्व.

३. काही पदार्थ फसले, काही हसले!

या काळात मला खरा आंनद दिला तो माझ्या स्वयंपाकघरातील अनेकविध प्रयोगांनी! साऊथ इंडियन, इटालियन, चायनीज, महाराष्ट्रीयन अनेक पदार्थांचे फ्यूजन असे अनेक प्रयोग करताना वेळ कसा जातो, हे कळतच नाही. या प्रयोगात काही पदार्थ फसले, तर काही हसले. यात वेळेचं नियोजन, स्वच्छता, जबाबदारी आणि आईचे कष्ट या सगळ्यांची जाणीव झाली. मी माझ्या काही रेसिपीज यूट्यूबवर पण शेअर केल्या. ऑनलाइन असणार्‍या एका Recipe competition मध्येही मी भाग घेतला.

माझ्या आवडीच्या आणखी एका गोष्टीला भरपूर वेळ देता आला, ते म्हणजे वाचन. यावेळी मी बाबासाहेब पुरंदरे यांचं ''''महाराज'''', किरण पुरंदरे यांचं ''''सखा नागझिरा'''', ''''पक्षी आपले सख्खे शेजारी'''' ही पुस्तकं वाचून झाली. या पुस्तकामुळे मला माझ्या बाल्कनीत येणार्‍या सूर्यपक्षी, वल्गूली, मुनिया या वेगळ्या पक्ष्यांची ओळख झाली. या शिवाय नेहमी येणारे चिमणी, कावळा, वेडा राघू, पोपट, भारद्वाज, कोकीळ, कबूतर, पारवा यांचे आवाज, त्यांच्या येण्या-जाण्याच्या वेळा, यांचे खूप छान निरीक्षण करता आले.

बाहेर न जाताही कमीत कमी गरजांमध्येही आपण आपल्या कुटुंबासोबत छान राहू शकतो, हा अजून एक खूप छान अनुभव मला सध्या मिळत आहे.

-ओजस स्वाती शितल चौगुले, इयत्ता सातवी
आनंदनिकेतन, नाशिक

४. घरातल्यांशी संवाद

या सुट्टीत मी सांडगे घालणं, पापड लाटणं या गोष्टी शिकले. ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ वाचण्यास सुरुवात केली आणि मला शिवछत्रपतींच्या काळातच गेल्यासारखे वाटलं.

या सुट्टीचा फायदा म्हणजे कुटुंबीयांसोबत मिळून-मिसळून राहता आले. इतर वेळी सर्वजण आपापल्या कामात मग्न असतात. एकाच घरी राहून नीट एकमेकांशी संवादही व्हायचा नाही, पण या सुट्टीमुळे एकमेकांविषयी बऱ्याच गोष्टी जाणून घेता आल्या.

-तनुष्का पाटील, इयत्ता चौथी
कौतुक विद्यालय

5. संस्कृत वाचायला शिकलो

आमच्या शाळेच्या सरांनी आम्हां मुलांचा व्हॉट्सअप ग्रुप केला आणि त्याद्वारे आमच्या ऑनलाइन परीक्षा घेतल्या. कोडी सोडवली. हस्ताक्षर स्पर्धेमध्ये भाग घेतला. चित्रकला स्पर्धेत भाग घेतला. कागदकाम केले. आम्ही सुट्टीत संगणकावर रामायण-महाभारताच्या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्याही!

शिवाय संस्कृत वाचायला शिकलो. भगवद्गीतेमधील श्लोक पाठ केले. त्यातील संस्कृतही आम्हांला कळलं.

-दिग्विजय सुरवसे, इयत्ता चौथी
इंद्रजीत सुरवसे, इयत्ता सातवी
राजीव प्राथमिक शाळा, बाळे सोलापूर

6. Stitching is fun!

I didn’t know that we can stitch at home. But Aai told me that, we can stitch by hand. I learnt Running Stitch and Locking Stitch. First I stitched my tore T-shirt. Then I made 3 Godhadis and dresses for my Dolls out of old leg-ins. I also learnt to fix the button to the shirt.

I also made Gavhale (hand rolled shevaya) for kheer. Sometimes I pin a chapati and make tea in the presence of Aai or Appa. I also did fabric painting on my shirt and coloured Mango seeds.

I am exploring Photoshop software with Appa. Sometimes I try to write stories also. I enjoyed watching Ramayana and Moghali on TV. Now I am watching Shree Krishna and some movies… Tata.. Take care!

-Sharanya Thippanakaje
Age- 8 years, Thane

7. Fought with the Boredom

Before the lockdown I didn''''t like to go out for petty things such as groceries but now I realised that going out of the house is also a great freedom. These days the feeling which I have undergone the most is boredom but I have definitely done some activities to ward off the lockdown blues. I tried my hand at Rangoli. I made it inside my home and surprisingly it yielded good results.

I completed reading two books – ‘A Pocketful of Stars’ by Aisha Bush and ‘A Brief History of Time’ by Stephen Hawking. I enjoyed reading them a lot. My class teacher and my friend were very happy to see the quilling art greeting cards which I made for them. I got to know that apart from studies I am good at artistic stuff too. This can''''t be neglected that I also learnt how to clean the house and do some cooking as well.

In these holidays, I realised that how a virus invisible to the naked eye can stop the world. But maybe it was the need of the hour for the environment to restore itself and for humans to take a break for themselves, for their family, for their own good.

Lastly, I pray to God that this suffering ends soon.

-Anushka N. Chandurkar, 8th Std.
D.A.V. International School, Ahmedabad


मे २०२० ‘वयम्’

My Cart
Empty Cart

Loading...