
Severity: Warning
Message: fopen(/var/cpanel/php/sessions/ea-php81/ci_session41dd88806b5333b7b1d008f8fd47c83881b65750): Failed to open stream: No space left on device
Filename: drivers/Session_files_driver.php
Line Number: 177
Backtrace:
File: /home/wayam/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct
File: /home/wayam/public_html/index.php
Line: 317
Function: require_once
Severity: Warning
Message: session_start(): Failed to read session data: user (path: /var/cpanel/php/sessions/ea-php81)
Filename: Session/Session.php
Line Number: 137
Backtrace:
File: /home/wayam/public_html/application/controllers/Blog.php
Line: 7
Function: __construct
File: /home/wayam/public_html/index.php
Line: 317
Function: require_once
मातृदेवो भव = मातृदेवः + भव। याचा अर्थ `आईला देवासमान मानणारा हो’ – Let you be one, who reveres mother as God.
मातेचा महिमा सांगणारी आणखीही वचने आहेत. उदाहरणार्थ, ‘न मातुः परं दैवतम् – आईसारखे श्रेष्ठ दैवत नाही.’ मराठीतही कवी यशवंत यांनी म्हटले आहे- ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’. कवी माधव ज्यूलियन यांनी ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधु आई’ असे तिचे वर्णन केले आहे. खरोखरच आपल्या प्रत्येकाच्या मनात आईसाठी एक खास स्थान असते.
आई ही कुटुंबाचा आधार म्हणून महत्त्वाची आहेच, पण मानवी संस्कृतीत `आई’ ही एक मोठी संकल्पना आहे. आपण भूमीला भूमाता म्हणतो, नद्यांनाही गंगामैया, यमुनामैया म्हणतो. आपल्या देशाला मातृभूमी म्हणतो.
‘मातृदेवो भव’ या वचनाची आठवण करून देणारा दिवस आहे या महिन्याचा दुसरा रविवार! गेली काही वर्षे अनेक देशांत मे महिन्यातील दुसरा रविवार हा ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. याचे मूळ आहे अमेरिकेतील एका मायलेकीच्या जोडीच्या अथक प्रयत्नांमध्ये! ही जोडी म्हणजे ॲन मारिया रीव्ज जार्विस आणि तिची मुलगी ॲना जार्विस!
या दोघींची कहाणीही मोठी सुरस आहे. अमेरिकेत व्हर्जिनिया प्रांतात सन १८३२ मध्ये जन्मलेल्या ॲन मारियाने प्राथमिक शाळेत २५ वर्षे शिक्षिकेचे काम केले. ती सामाजिक, शैक्षणिक विषयांवर उत्तम भाषणेही करी. स्त्रियांची माता ही भूमिका तिला फार महत्त्वाची वाटे. माता मानवतेची अतुलनीय सेवा करतात, म्हणून त्यांना गौरविले गेले पाहिजे, असे तिला वाटे.
अमेरिकेतील युद्धाच्या वेळी तिने सैनिकांच्या मातांच्या सभा घेतल्या आणि जखमी सैनिकांच्या शुश्रूषेसाठी स्त्रियांची संघटना उभारली. या युद्धानंतर तिने ‘मदर्स क्लब्ज’ सुरू करून समाजात आरोग्यविषयक जाणीवजागृती निर्माण करण्याचे काम सुरू केले.
आईचे एक भाषण लहानग्या ॲनाने ऐकले होते. त्या भाषणाच्या शेवटी ॲनाच्या आईने अशी इच्छा व्यक्त केली होती की, कधीतरी कोणीतरी मातांचा सन्मान एक खास दिवस ठरवून करावा. आईची ही इच्छा लेक कधीच विसरली नाही. ९ मे १९०५ रोजी आईचा मृत्यू झाल्यावर ॲनाने ‘मदर्स डे क्लब’च्या कार्याचा आढावा घेतला. आई जिथे कार्य करीत होती त्या चर्चला पत्र लिहून ‘मदर्स डे’साठी सहकार्य करण्याची विनंती केली. चर्चने तिच्या विनंतीला मान देऊन १९०८ मध्ये मे महिन्यात ‘मदर्स डे’ साजरा केला.
हा दिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा व्हावा यासाठी अनेक समविचारी लोकांच्या मदतीने ॲनाने प्रयत्न केले. शेकडो पत्रे लिहिली, भाषणे केली. राजकारणी लोकांना, उद्योजकांना आवाहन केले. या प्रयत्नांना यश आले आणि मग अमेरिकेच्या अनेक प्रांतांमध्ये ‘मदर्स डे’ साजरा होऊ लागला. अखेर १९१४ साली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मे महिन्याचा दुसरा रविवार ‘नॅशनल मदर्स डे’ म्हणून जाहीर केला.
हल्ली अनेक सण, उत्सव व्यापारी स्वरूपात सेलिब्रेट होत असतात. ‘मदर्स डे’चे सेलिब्रेशनही जगातल्या अनेक देशांमध्ये होते. इंटरनेट व इतर सर्व प्रसारमाध्यमांमधून विविध उत्पादनांच्या जाहिरातींचा मारा होतो. कपडे, दागिने, फुले, केक्स, भेटवस्तू अफाट खपतात. पण या ‘मदर्स डे’चा मूळ उद्देश मातृत्वाचा गौरव हा आहे. म्हणून खरी गरज आहे ती आईच्या सेवेचा सन्मान करण्याची! तिच्या सेवेला गृहीत न धरता तिच्याबद्दल कृतज्ञ राहण्याची!
आपल्याकडेही पूर्वीपासून श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला मातृदिन साजरा करण्याची प्रथा आहे. या दिवशी माता आपल्या मुलांना आरोग्य आणि कल्याण लाभावे म्हणून पूजा, प्रार्थना करतात. असा दिवस साजरा करताना आपण अनाथ, निराधार मुलांची, तसेच गरीब मातांचीही आठवण ठेवायला हवी. सुस्थितीतील मातांनी गरजू मुलांसाठी जमेल तेवढे कार्य केले तर ‘मातृदेवो भव’ या उपदेशाला खरा अर्थ प्राप्त होईल.
-मेधा लिमये
***