Menu

मातृभाषा का महत्त्वाची?

image By Wayam Magazine 15 February 2023

मातृभाषा ही आपली पहिली भाषा असते. मातृभाषा म्हणजेच आपलं आपल्या भावनांशी नातं; म्हणूनच मातृभाषेशी असलेलं नातं आपण जपायला हवं. आपण कोणत्याही भाषेत शिकत असलो, तरी मातृभाषेतून बोलणं, वाचणं, लिहिणं करत राहावं. आपलं आपल्या मातृभाषेशी फार सखोल नातं असतं; ते तोडू नये. २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, त्यानिमित्त

Emotional thinking is our true first language.- फ्रॅंक निनिवगी

किती खरं आहे हे वाक्य. फ्रॅंक यांनी भावनाया विषयावर खूप अभ्यास केला आहे. ते म्हणतात, भावनिकदृष्ट्या आपण जे विचार करतो, तीच आपली पहिली भाषा असते.  

म्हणूनच मातृभाषा ही आपली पहिली भाषा असते. मातृभाषा म्हणजे नक्की काय? आपण आईच्या पोटात असतो तेव्हापासून आई जी भाषा बोलत असते, ती आपण ऐकतो. तीच आपली मातृभाषा. आईचा आवाज बाळाला स्पष्ट ऐकू येत असतो आणि इतरांचे आवाज जरा लांबून बोलल्यासारखे, अस्पष्ट ऐकू येत असतात. त्यामुळे आईचा आवाज बाळ मस्तपैकी ऐकत असते. मातृभाषेची सुरुवात होते ती अशी, जन्माच्या आधीपासूनच! मातृभाषेचं अनौपचारिक आणि सहज शिक्षण असं सुरू होतं

बाळ जन्माला आल्यावर त्याला इतरांचे आवाजही स्पष्टपणे ऐकू येतात. घरात बोलली जाणारी भाषा ते बाळ अगदी सहजपणे शिकतं. जी मुलं नॉर्मल असतात, म्हणजे ज्यांच्या मेंदूत कोणतीही गुंतागुंतीची समस्या नसते, ती मुलं जन्मल्यापासून ते पहिल्या दोन वर्षांत, घरात बोलली जाणारी किमान एक भाषा पूर्णपणे बोलायला शिकतात. अगदी त्यातलं व्याकरण, विशिष्ट उच्चार शिकतात. उदा. जपानी भाषेत आणि मध्ये फरक केला जात नाही. त्यामुळे मोठं झाल्यावरही जपानी लोकांना आणि या दोन उच्चारांतला फरक कळत नाही. आणि कळला तरी कसा उच्चारायचा आणि नेमका कसा उच्चारायचा, हे त्यांना पटकन जमत नाही. बराच सराव करावा लागतो

अरबी लोक चं उच्चारण विशिष्ट करतात. तिथल्या बाळांना लहानपणापासून अगदी सहजपणे ते करता येतं. पण इतरांना मात्र खूप प्रयत्नांनी जमतं. बंगाली भाषेतले आणि चे उच्चारही असेच. आणि आपल्या सर्वांना माहीत असलेला चा उच्चार. हिंदीत हे अक्षर नसल्यामुळे हिंदी भाषिक चा करतात. त्यांना म्हणता येत नाही

ही आहे गंमत, मातृभाषा आपल्या मेंदूत किती सहज, नैसर्गिक असते, याची

कान हे आपलं महत्त्वाचं ज्ञानेंद्रिय. कानांवाटे मेंदूत पोचलेल्या ध्वनिलहरी आणि ऑडिटरी कॉर्टेक्सचा यात महत्त्वाचा सहभाग असतो. याबरोबरच भाषा शिकण्यासाठी मेंदूतले ब्रोकाआणि वर्निकहे दोन भाग महत्त्वाचे आहेत. (ही दोन्ही शास्त्रज्ञांची नावं आहेत. डॉ. पॉल ब्रोका यांना सर्वप्रथम हे लक्षात आलं की, मेंदूच्या या भागातून भाषानिर्मिती केली जाते. डॉ. वर्निक यांनी याचप्रकारे आकलनाच्या भागाचा शोध लावला.) 

बाळ जन्माला येतं तेव्हापासून मेंदूतला वर्निकहा भाग काम करत असतो. ‘वर्निकहा भाषा-आकलनाचा भाग आहे; तरब्रोकाहा भाषा- निर्मितीचा भाग आहे. आसपासची माणसं ज्या भाषेत बोलतात, त्यातले शब्द वर्निकया भागात साठवले जातात. वयाच्या साधारणत: वर्ष-दीड वर्षापर्यंत ब्रोकाविकसित होतो. जेव्हा ब्रोकाविकसित होतो, तेव्हापासून मुलं बोलायला लागतात. जी भाषा, जे शब्द आतापर्यंत वर्निकमध्ये साठवले गेले आहेत, तेच शब्द आणि तीच भाषा मूल आधी बोलतं. ऐकलेल्या भाषेशिवाय दुसरं काहीही मूल बोलत नाही. मुलांच्या आसपास जे काही बोललं जाईल, त्याच भाषेत मुलं पहिल्या दोन-अडीच वर्षांत छान बोलायला लागतात. जे जे ऐकतात, ते सगळं बोलतात. याउलट ज्या मुलांच्या कानावर भाषा फारशी पडत नाही, त्यांचा भाषेचा विकास सीमित हो्तो.

इथे एक गमतीशीर प्रयोग सांगावासा वाटतोय. कॅनडामधल्या शास्त्रज्ञांनी केलेला. काही चिनी बाळांना कॅनडातल्या फ्रेंच-कॅनेडियन कुटुंबांनी दत्तक घेतलं. या मुलांनी पहिल्या वर्षीच फक्त चिनी भाषा ऐकली होती. त्यानंतर कधीच ऐकली नाही. या मुलांवर हा प्रयोग केला. ही मुलं ते १७ वर्षं या वयोगटातली होती. जेव्हा त्यांना चिनी टोनमध्ये काही वाक्यं ऐकवली, तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये भाषेच्या भागामध्ये विशेष उद्दीपन दिसून आलं. याचाच अर्थ मेंदू पहिली भाषा मातृभाषा - कधीच विसरत नाही. मातृभाषेशी आपलं नातं असं अगदी वेगळंच असतं

वयाची पहिली दोन वर्षं भाषाशिक्षणासाठी चांगली असतात. या काळात आसपासचे सर्व आवाज मुलांचे कान टिपत असतत. घरच्या, शेजारच्या माणसांकडून, नातेवाइकांकडून ज्या भाषा सहजरित्या मुलांच्या कानावर पडतात, त्या त्यांना बोलता येऊ शकतात. जन्मापासून जी मुलं एकापेक्षा जास्त भाषांच्या / भाषिकांच्या संगतीत असतात, त्यांना कमी-आधिक प्रमाणात त्या सर्व भाषा समजतात. मुलांना या भाषांमध्ये व्यक्त होण्याच्या संधी मिळाली, तर मुलं या सर्व भाषा बोलूही शकतात

आपल्याला ज्या गोष्टींची माहिती आधीपासून असते, त्याला आपण पूर्वज्ञान म्हणतो. जे आपल्याला आधी माहिती आहे, त्याच्याच आधारावर नवी माहिती मिळवून मेंदूत साठवली जाते. याच पद्धतीने आपण कोणतीही गोष्ट, कोणतीही कला शिकत असतो. उदा. आधी शब्द ऐकलेले असतात. त्या आधारावर मुलं बोलतात. त्याच आधारावर वाचन शिकतात आणि मग लेखन. पहिल्या एक-दोन वर्षांत कधीतरी अंक ऐकले जातात. अंक ऐकल्यावर आधी ते वाचले आणि मग लिहिले जातात. यानंतर मग बेरीज वजाबाकी गुणाकार - भागाकार. आधी शब्द किंवा अंक माहिती नसले तर थेट कोणीच लेखन शिकवायला जाणार नाही किंवा भागाकारही शिकवणार नाही. शब्द आणि अंकांची ही माहिती आपण फार लहानपणापासून मिळवलेली असते. ती जर मातृभाषेतून मिळवलेली असेल तर हे त्याच भाषेत शिकणं सोपं जातं

असं आपलं नातं आपल्या भाषेशी असतं. ते फार सखोल असतं. प्रत्यक्ष मेंदूत केलेल्या संशोधनातूनही आता हेच सिद्ध झालेलं आहे. मातृभाषा म्हणजेच आपलं आपल्या भावनांशी नातं. म्हणूनच ते आपण जपायला हवंच..


डॉ. श्रुती पानसे

(ज्येष्ठ मेंदूविज्ञान तज्ज्ञ)

 

My Cart
Empty Cart

Loading...