Menu

किल्ल्यांचा जतनदार

image By Wayam Magazine 15 February 2023

किल्ला म्हटलं की आपल्याला इतिहास आठवयाला लागतो. शिवाजी महाराजांनी किल्ले कसे जिंकले याचे

वर्णनही पाठ्यपुस्तकात वाचतो, किल्ल्यांची चित्रही आपण पाहतो. परंतु प्रत्यक्षात आपण किल्ला पहिला गेलो

तर आपण त्यावेळी शिकलेली किल्ल्याची रचना, तेथील वेगवेगळ्या गोष्टी यांना काय म्हणतात हे विसरतो.

केवळ मी हा किल्ला पाहिला एवढंच आपण सांगू शकतो. परंतु मुलांनो, हा किल्ला तुम्हांला नुसता

पाठ्यपुस्तकातून शिकण्यापेक्षा प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन शिकण्याची संधी मिळाली तर... किती मजा येईल

ना! बुरुज, तोफा, कमान, आज्ञापत्र ह्या सारख्या किल्ल्याशी संबधित गोष्टी प्रत्यक्ष पाहून शिकता आल्या तर...

इतिहास विषयही आवडू लागेल आणि कायमस्वरूपी तुमच्या मेंदुरूपी हार्डडिस्कवर ही माहिती सेव्ह पण

होईल बरोबर ना ! पण हे वाचताना तुमच्या मनात शंका आली असेल की, कसं काय आम्ही किल्ल्याविषयीचा

धडा प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन शिकू? तर मुलांनो, श्रीदत्त राऊत नावाचा दादा आहे. त्याला किल्ल्याविषयी

फार प्रेम, आदर आहे. ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन-संवर्धन व्हावे यासाठी या दादाने आगळी-वेगळी ‘किल्ले

वसई मोहीमही उभारली आहे. किल्ले हेच त्याचं आयुष्य आहे. तसेच या दादाने अनेक किल्ल्यांच्या बारीक-

सारीक माहितीचा संग्रहही करून ठेवला आहे. अनेक शाळांतील मुलांना किल्ल्याच्या संदर्भातील धडे प्रत्यक्ष

किल्ल्यावर नेवून शिकवले. आणि त्या शाळांतील मुलांनाही हे शिकताना खूप मजा आली. मग तुम्हांलाही जर

या मुलांप्रमाणे किल्ल्यावर जाऊन किल्ल्याविषयी शिकायचं आहे, तुम्हांला या दादाच्या मोहिमेविषयी जाणून

दादाच्या या मोहिमेत सहभागी व्हायचं आहे, या दादाविषयीची बरीच माहिती जाणून घ्यायची आहे तर या

दादाशी साधलेला सवांद नक्की वाचा !

तुम्हाला किल्ल्याविषयीचं वेड कसं काय जडलं?

यावर श्रीदत्त दादा म्हणाला की, ‘मला सुरुवातीपासून कविता करण्याचा छंद होता. मनात दडलेले हे विचार,

भाव यांना व्यक्त करण्यासाठी मी एकांताचा शोध घेत असताना मला घराजवळचा वसई किल्ला दिसला. या

किल्यावरील शांतता, एकांत मला खूपच भावला. आणि मग रोजच मी या किल्ल्यावर जाऊन बसू लागलो.

स्वतः स्वतःशी सवांद साधून कविता रचू लागलो. हळूहळू या संवादात मी किल्ल्याशीही बोलू लागलो. किल्ला

जणू माझा मित्रच बनून गेला. वेगवेगळ्या ऋतूत, वेगवेगळ्या वेळी मी किल्ल्यावर जाऊन बसायचो.

आजुबाजुचे रहिवासी, येणारे पर्यटक किल्ल्याविषयी काही न काही बोलायचे. त्यांची ही माहिती मला का कोण

जाने चुकीची वाटू लागली. अचूक माहिती नव्हती ती. आणि मग यातूनच कुतूहल निर्माण झालं आणि मी खऱ्या

माहितीचा शोध घ्यायचा असं मी ठरवलं. याच वेळी मला कळून चुकलं की किल्ले हेच माझं आयुष्य आहे.

योगायोगाची गोष्ट सांगायची म्हणजे मी एकदा बाबा आमटे यांच्या आश्रमात गेलो होतो. तेथे मला वृद्ध लोकांनी

सांगितलं की बाळा जा वसई किल्ला नीट कर. या साऱ्या गोष्टीमुले माझं किल्ल्यावर प्रेम कसं जडलं हे

मला कळलंच नाही. यातूनच वसई किल्ला मोहीम हाती घेतली.

वसई किल्ले मोहिमेत तुम्ही नेमकं काय काय केलंत?

साधारणतः २००३ मध्ये मी वसई किल्ल्यावर स्वच्छता मोहीम हाती घेतली. हे करताना मला तिथे दारूच्या

बाटल्या, अनेक वाईट अशा गोष्टी सापडल्या. हा कचरा साफ करताना मी आणि माझ्या मित्रांनी किल्ल्याचा

प्रत्येक भाग पिंजून काढला. हे करताना आम्हांला अनेक जुन्या-पुराण्या गोष्टी सापडल्या. त्यात जुनी कागदपत्रे,

मोडक्या-तोडक्या मूर्ती अशा अनेक गोष्टी सापडल्या. नोकरी करीत आल्याने मी सुट्टीचा रविवार किल्ल्याच्या

सफाईसाठी ठेवून दिला. सुट्टीच्या दिवशी मी किल्ल्यावरच असतो. त्यामुळे मला भेटायला येणारे मित्र-मैत्रिणी,

नातेवाईकही मला किल्ल्यावरच भेटायला येऊ लागले. किल्ल्यावर स्थानिक रहिवासी कोणतेही शुभकार्य

करायला घाबरत असत. कारण युद्धाच्या वेळी होणारा रक्तपात, पोर्तुगीजांनी पूर्वीच्या काळी किल्ल्यावर सण

साजरे करायला बंदी घातली होती आणि ही परंपरा वर्षानुवर्षे चालू होती. हे सगळे लोकांचे गैरसमज मी दूर

केले. आणि माझ्या सहकाऱ्यांच्या साथीने आम्ही वेगेवेगळे सन किल्ल्यावर साजरे करू लागलो. अशा रीतीने

किल्ला सुधारण्याची मोहीम चालू होतीच. हे करत असतानाच कुठेतरी आपला इतिहास काळाच्या पडद्याआड

चालेलेला आहे याची जाणिव आम्हांला सर्वांना होत होती म्हणून आम्ही हा इतिहास शोधण्यास सुरुवात केली.

यासठी आम्ही पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात गेलो. तेथे अनेक कागदपत्रांचा आभ्यास केला. काही

पाने पोर्तुगीज आणि मोडीलिपीत होती. त्याचा अर्थ काही मला लावता येत नहोता ना माझ्या सहकारी

मित्रांनाही. मग मी ह्या दोन्ही भाषा शिकून घेतल्या आणि म्हाईत नसलेला इतिहास उजेडात आला. वसईमध्ये

१४ किल्ले आहेत, तर ठाण्यात ५० किल्ले आहेत. पण हे कोणालाच माहित नव्हते. शासनाकडेही यातील काही

किल्यांची नोंद नव्हती. त्याची नोंदही शासनाकडे करण्याचा मी प्रयत्न करत आहे. अशा 123 किल्ल्यांची यादी

आम्ही तयार केली.

एकंदरीतच या किल्ले वसई मोहिमेअंतर्गत मी आणि माझे सहकारी दर रविवारी इच्छुक इतिहासप्रेमीना वसई

किल्ल्याची सफर घडवितो. यात वसई किल्ल्यातील महत्त्वाच्या ४० वास्तू, नाणी, शस्त्रे, रेखाचित्रे दाखवितो.

याचबरोबर श्रमदान शिबीर, किल्ल्यांचे संवर्धन करणारी कार्यशाळा, ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन, शाळा-

महाविद्यालयातील मुलांना प्रत्यक्ष किल्ला दर्शन असे अनेक उपक्रम आम्ही राबवितो. ही आमची मोहीम

विनाशुल्क आहे.

मुलांना किल्ला हे प्रकरण तुम्ही प्रत्यक्ष किल्ल्यावर शिकवता, किल्ला दाखवता त्यावेळेचे तुम्हाला आलेले अनुभव कसे होते?

शाळेत पाठ्यपुस्तकात किल्ले, बुरूज, कमान, आज्ञापत्र म्हणजे काय हे दिलेले असतं. आपण ते पाठ करतो आणि

लिहितो पण प्रत्यक्षात किल्ल्यावर गेलो की आपल्याला कशाला काय म्हणायचे हे कळत नाही. म्हणून शाळेतून

मुख्याध्यापकांची परवानगी काढून किल्ले हे प्रकरण मी किल्ल्यावर आणून शिकवू लागलो. बुरूज, तट,

राजवाडा, किल्ल्यातील धान्याची गोदामे प्रत्यक्ष दाखवू लागलो. मुलांना ते इतकं आवडलं की मुलांना किल्ला

हा रटाळ वाटणारा धडा मुले आनंदात शिकत होती. आज्ञापत्रही मुलांना प्रत्यक्ष दाखविली. पूर्वी राजे लोकांचे

घोडे असत. गंमत म्हणजे त्यांच्या पादा, लघवी याचा दुर्गंध येवू नये म्हणून घोड्यांचा तबेला हा

राजवाड्यापासून दूर असे. धान्य कोठारे ही ओल लागणार नाही अशा जमिनीपासून उंच ठिकाणावर असत.

असे बारकावे पुस्तकात नहोते. या गोष्टी मी संगत असताना मुलं अनेक शंका विचारात होती. मुलांच्या मनात

किल्ल्याविषयी निर्माण होणारं प्रेम दिसत होतं. किल्ला पाहून गेल्यावर मुलं आमच्याशी पत्रव्यवहारही

करतात. त्यामुळे त्यांचे लेखन कौशल्य वाढीला लागते. यातून मुळे आमच्याशी जोडली जातात.     

 

सर्वसामान्य मुलांना किल्ला दाखवणं, समजावणं सोपं असतं, परंतु अंध किंवा अपंग मुलांना तुम्ही किल्ला कसा काय दाखवता?

अंध मुलांच्या बाबतीतील अनुभव हा वेगळाच आहे. ही मुलं सारं काही स्पर्शज्ञानाने शिकतात. मग आम्ही त्यांच्या शिक्षकांना साथीला घेऊन बोलण्याच्या कलेतून किल्ल्याचे दर्शन घडवितो. मुलींकरिता महिला स्टाफ

नेमला जातो. या मुलांचा सिक्स सेन्स दाणगा असतो. यासहाय्याने मुलांना आम्ही किल्ला दाखवितो.

 

तुम्ही ही मोहीम हाती घेण्याअगोदरचा वसई किल्ला आणि आताचा वसई किल्ला यात तुम्हांला काय फरक जाणवतो?

हो, नक्कीच फरक झाला. या वसई किल्ला मोहिमेनंतर लोकांची मानसिकता खूप बदलली. बाहेरचे लोक येऊन

किल्ल्याची सुधारणा करतात, आपण काही करत नाही. याचं कुठेतरी सल स्थानिकांच्या मनात निर्माण झाली.

पर्यटकांच्या भेटी वाढल्या. स्थानिकांना चार पैसे मिळू लागले. मुख्य कागदपत्रे, वास्तूविषयी माहिती

मिळाल्याने लोकांची जिज्ञासा वाढीस लागली. किल्ल्यावर नको असेलेली झाडे उगवायची त्यामुळे किल्ल्याकडे

जाणाऱ्या वाटा दिसत नव्हत्या. रस्त्यांची सोय नव्हती. कचरा कुठेही टाकलेला असे. या सगळ्या गोष्टीत बदल

झाले. किल्ल्यापर्यंत जाणाऱ्या रस्ते, पायवाटा दिसू लागल्या. कचऱ्याचे व्यवस्थापन होऊ लागले. वास्तूच्या,

देवदेवतांच्या पूजा वेळोवेळी होऊ लागल्या. किल्ल्यांवर ध्वज फडकू लागले. पाण्याच्या टाक्या स्वच्छ दिसू

लागल्या. वाडे, लहान दऱ्या, चौकी, लहान किल्ले शोधले जावू लागले. किल्ल्याविषयी स्थानिक लोकांत चर्चा होऊ लागली. एकंदरीतच सर्व लोकांत किल्ल्यांविषयी आस्था निर्माण झाली.

 

लहान मुलांना किल्ल्याची ओढ लागावी म्हणून तुम्ही आणखी कोणते उपक्रम घेता?

आम्ही मुलांसाठी विविध विषयांवर स्पर्धा घेतो, किल्ला या विषयावर आम्ही एकदा चित्रकला स्पर्धा घेतली

होती. किल्ला पाहायचा आणि तुम्हाला काय दिसत त्याचं चित्र काढायचं. त्यात एका मुलानं दरवाज्यावरील

तटबंदी काढली होती व या तटबंदी शेजारी वडाच मोठ झाड होतं. हे झाड तटबंदीच्या भिंतीला छेद देऊन

बाहेर आलं होतं. जेव्हा आम्ही हे चित्र पाहिलं तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे झाड भिंत पाडणार आहे.

मुलांकडून हा बारकावा सुटला न गेल्याने किल्ल्याच्या सुधारणेला हातभार लागला व किल्ल्याची होणारी हानी

टळली. त्यामुळे आम्हांला किल्ला सुधारण्यासाठी अशा स्पर्धांची नक्कीच मदत होते. यातून मुलांची निरीक्षण,

आकलन क्षमतेचाही विकास होतो.

 

आतापर्यंतचे काम पाहता सध्या किल्ल्यांसंदर्भातील नवीन काही काम चालू आहे का ? आणि तुम्ही कोणत्या

प्रकारचं लेखन केलं आहे?

११४ किल्ल्यांवर काम करुन झालं आहे. आता ४२ किल्ल्यांवर काम चालू आहे. बऱ्याच किल्ल्यांचा इतिहास

लिहून झाला आहे. नकाशेही तयार झाले आहेत. पूर्ण तयारी झाल्याशिवाय किल्ल्याचं काम हाती घेत नाही.

व्यवस्थापन, इतिहास, चित्रकला, भूगोल, या विषयांवर मी लेखन करतो. कविताही करतो. थोडक्यात सांगायचं

तर विषयाचा खोलवर अभ्यास झाला की मगच मी नवीन काम करायला सुरुवात करतो.

 

मुलांनो, आवडला का तुम्हांला किल्लेप्रेमी दादा. तुम्हांला या दादाला भेटायचं असेल तर सुट्टीदिवशी नक्कीच

वसई किल्ला पहिला जा. शिवाय शाळेतही तुमच्या इतिहास शिक्षकांना सांगून किल्ले पाठ या दादाकडून नक्की

शिकून घ्या. इतिहास जपा आणि अशा प्रकारचं काम करुन तुम्हीही इतिहास घडवा! 

 

 

शब्दांकन- क्रांती गोडबोले-पाटील

 

My Cart
Empty Cart

Loading...