Menu

आंब्याचा इतिहास

image By Wayam Magazine 18 May 2023

मुलांनो शाळेत तुम्ही जसा शिवाजीराजांचा, भारताला स्वातंत्र्य मिळाल्याचा, संस्कृतीचा इतिहास अभ्यासता, शिकता. असा इतिहास आंब्यालाही आहे

आंब्याचे मूळ स्थान ईशान्य भारतातील मेघालयाच्या दामलगिरी टेकड्या जवळ आहे असे इतिहास अभ्यासकांचे म्हणणे आहे. आंब्याच्या उगम सुमारे साडे सहा कोटी वर्षापूर्वीचा आहे. एवढेच नाही तर रामायण तसेच महाभारत या ग्रंथामध्येही आंब्याचा उल्लेख केलेला आहे

.. १४०० ते १४५० च्या दरम्यान मुसलमानांनी भारतातून आंबे फिलिपाईन्समध्ये नेले. ..१६०० ते १६५० च्या दरम्यान डचांनी थायलंडमधून आंबे लुझान बेटात नेले. .. १९११ साली त्यांनी तेथे भारतातून कलमी आंबे नेवून पुन्हा लागवड केली

पोर्तुगीजांनी गोव्यातून आंबा नेवून पूर्व आफ्रिकेत त्याची लागवड केली. तेथून पश्चिम आफ्रिकेत त्याचा प्रसार झाला

अठराव्या शतकात थेमेन आणि एकोणिसाव्या शतकात कॅनारीज अझोरास येथे आंबे गेले

इंग्रजांनी १६९० मध्ये आंबे इंग्लंडला नेले आणि काचेच्या घरात याची लागवड करण्याचा प्रयत्न केला. .. १८०८ साली न्यू गार्डनमधील आंब्याच्या झाडांना फळे आली होती

.. १६६५ साली मोलुक्कज, अठराव्या शतकात लिस्बनला, १९०५ साली इटलीच्या दक्षिण भागात १८७० साली ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांतात आंब्याची लागवड केली

१८ व्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी ब्राझीलमध्ये आंब्याची लागवड केली.

भारतामध्ये आंब्याची लागवड सुमारे ४००० वर्षांपासून होत आहे. परंतु ही आंब्याची पद्धतशीर लागवड मुघल राजांच्या काळापासून सुरू झाली. अकबर बादशाहने दरभंगाजवळील (बिहार) लाखीबागेत जवळपास एक लाख आंबा झाडाची लागवड केली होती

आंब्याचं उत्पादन हे फक्त आपल्याच देशात होत नाही तर जगातील जवळपास १११ देशांमध्ये आंबा हे पीक घेतले जाते. मात्र जगाच्या एकूण आंबा उत्पादनांपैकी जास्तीत जास्त आंबा हा फक्त भारत देशातच होतो. आंब्यांच्या वेगवेगळ्या जातीही भारतातच आढळतात. विशेष म्हणजे भारतामध्ये जवळपास आंब्याच्या १३०० जातींची नोंद झालेली आहे. यातील जवळ जवळ २५ ते ३० आंबा जाती व्यापारीदृष्ट्या महत्वाच्या लोकप्रिय आहेत.

भारतामध्ये उत्तरप्रदेशात सर्वाधिक आंबा पिकतो. त्या खालोखाल बिहार, आंध्रप्रदेश, पश्चिमबंगाल, तामिळनाडू, ओरिसा, महाराष्ट्र गुजरातचा क्रमांक लागतो. परंतु हा आंबा या सर्व ठिकाणी एकाच वेळी तयार होत नाही तर कन्याकुमारीत आंबा जानेवारीत पिकतो, केरळात पिकलेले आंबे फेब्रुवारी महिन्यात मिळतात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश महाराष्ट्रात पिकलेले आंबे मुख्यतः मे महिन्यात विपुल प्रमाणात मिळतात. त्याचप्रमाणे बंगालमध्ये जूनमध्ये तर उत्तर प्रदेशात जुलैमध्ये आणि पंजाबात ऑगस्ट महिन्यात आंबे पिकतात. म्हणजेच आंबे तयार होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो

भारतामध्ये अतिथंडीचा आणि अतिउष्णतेचा वाळवंटी प्रदेश सोडल्यास सर्वत्र या पिकाची लागवड दिसून येते. भारतामध्ये आंब्याच्या अधिक उत्पादन घेणाऱ्या राज्यामध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, ओरिसा, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो.

हापूस ही जात डी अल्फान्सो या फ्रेंच व्यक्तीने संशोधन केली आहे. असा संदर्भ पुस्तकांमध्ये जरी आढळत असला तरी पूर्वीच्या वाङमयात रत्नागिरीजवळ शिरगाव येथे महानुभावांचा मठ होता. तेथे त्यांनी दत्तमंदिर बांधून आमराया लावण्याचा उल्लेख आहे. या आमराईमधून हापूस या जातीची निवड झाली असावी. कोकणातील उष्ण दमट हवामान आणि जांभा दगडाची जमीन या जातीस विशेष मानवते. त्यामुळे कोकणातील चारही जिल्हयांमध्ये या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली आहे होत आहे.

-वेंगुर्ला फळ संशोधन केंद्र यांच्याकडून साभार 


                                 ***

My Cart
Empty Cart

Loading...