आंबा पिकतो
रस गळतो,
कोकणचा राजा
बाई दंगा
मांडतो... `हापूस’
या चित्रपटातील
हे गाणं
तुम्ही कदाचित
ऐकलं असेल...
कोकणातील या
राजाची निर्यात
होताना होणारी
धडपड या
चित्रपटातून दाखवली
आहे, त्याशिवाय
अनेक प्रश्नही
या चित्रपटातून
मांडले आहेत.
तुम्ही बातम्या
वाचल्या असतील
की काही
देश आपल्या
हापूस आंब्याला
प्रवेशबंदी करीत
आहेत. कारण
काही देशांनी
आंब्याला व्हिसा
नाकारलाय ! व्हिसा
म्हणजे बाहेरच्या
देशात राहण्यासाठी
आवश्यक असलेला
परवाना. व्हिसाच्या
नियमानुसार आपण
जरा जरी
कोणत्या निकषावर
कमी पडलो,
तरी आपल्याला
त्या देशांत
जायला परवानगी
मिळत नाही.
आंब्याचही अगदी
तसचं आहे.
पण असं
का होतं?
प्रत्येक देशाचे
फळ, भाज्या
निर्यात करण्यासाठीचे
नियम हे
ठरलेले आहेत.
आपल्याकडचा आंबा
निर्यातीसाठी योग्य
आहे की
नाही, याची
चाचणी प्रत्येक
देश आपापल्या
नियमानुसार घेत
असतो. या
चाचण्यातून त्यात
साका (साका
म्हणजे आंब्याच्या
कोयीलगत असलेली
फिकट पिवळसर
पदार्थ गाठ.
ही विकृती
असेल तर
तो आंबा
चाचणीत नापास
होतो), साखरेचं
प्रमाण, कीड,
स्वाद अशा
अनेक बाबतीत
जोखले जाते.
जर या
सर्व चाचण्यांमध्ये
आंबा सर्वच
बाबतीत योग्य
आढळला तरच
तो निर्यातीसाठी
स्वीकारला जातो.
अन्यथा या
आंब्याला परत
मुंबई बाजारपेठेतच
यावं लागतं.
निर्यात शब्दाचा
अर्थ तुम्हांला
कळतोय ना
! भूगोलामध्ये असतो
निर्यात हा
शब्द. निर्यात
म्हणजे आपल्याकडील
माल दुसऱ्या
देशात, राज्यात
विक्रीसाठी पाठवणे.
इंग्रजीत त्याला
Export म्हणतात. अंबा
निर्यातीमध्ये आपला
भारत देश
पाठीमागे आहे
आणि याची
अनेक कारणे
आहेत हे
मला आंबा
बागायतदार आणि
कृषी तज्ज्ञांशी
बोलल्यावर कळल.
त्यांच्या मतानुसार
सर्वांत महत्त्वाचं
कारण म्हणजे
आंब्याची लागवड
करताना निर्यातीसाठी
लागणाऱ्या महत्त्वपूर्ण
बाबी लक्षात
घेण्यात येत
नाही. तसेच
आंबा बागायतदारांमध्ये
एकी नाही.
आता आंब्याची
जी काही
निर्यात होत
आहे ती
फक्त मुंबई
बाजारपेठेतीलतील आंबा
विकणाऱ्या दलालांकडून.
दलाल निर्यातीला
योग्य असे
आंबे बाजारपेठेतून
निवडतात व
ते काही
देशात पाठवून
देतात.
गंमत म्हणजे-
शितावरून भाताची
परीक्षा केली
आणि भात
शिजला नाही
म्हणून अजून
शिजवला तर
त्याचा पातळ
भात होतो!
तसचं कधी
कधी आंब्याच्या
बाबतीत होतं.
युरोपीय बाजारपेठेत
आपला आंबा
का नाकारला
माहितीये? आंब्याचा
शत्रू असेलेली
फळमाशी दक्षिणेकडून
आलेल्या एका
आंब्यात मिळाली.
आणि मग
काय, हा
धोका नकोच
म्हणून त्यांनी
आंबा नाकारला.
खरे तर
आपल्याकडचे काही
आंबा बागायतदार
या बाबतीत
फारच सावध
होते, पण
तरीही काही
उपयोग झाला
नाही.
आंब्याची निर्यात
व्यवस्थित व्हावी
यासाठी लागवडीपासूनच
काळजी घेतली
पाहिजे. आंबा
काढल्यानंतर तो
जास्त उन्हात
तापू न
देता सावलीत
ठेवला पाहिजे.
आंबा काढताना
तो खाली
पडणार नाही
याची काळजी
घ्यावी लागते.
आंब्याची गुणवत्ताही
सतत पहावी
लागते.
कोकणातील विशेषतः
देवगड,मालवण,
वेंगुर्ले तसेच
रत्नागिरी परिसरातील
आंबा मार्च-एप्रिलमध्ये
तयार होतो.
या आंब्याला
मुंबई व
गुजरात बाजारात
चांगला भाव
मिळत असल्याने
बागायतदार या
काळात बाहेर
देशातील निर्यातीस
फारसे उत्सुक
दिसत नाहीत.
कोकण विभागामध्ये
हापूस या
एकाच जातीची
सलग लागवड
फार मोठ्या
प्रमाणावर झालेली
आहे. त्यामुळे
कोकणामधून हापूस
आंब्याच्या निर्यातीस
भरपूर वाव
आहे. परंतु
हापूस हा
कोकणचा राजा
असला तरी
निर्यातीच्या दृष्टीने
आवश्यक असलेल
नियम पूर्ण
करण्यास हापूस
अनेकदा कमी
पडतो. काही
वेळा बेंगनपल्ली,
केसर या
आंब्याच्या जातींची
निर्यात यशस्वी
होते, कारण
ते पास
होतात आणि
हापूस मात्र
पास होतोच
असे नाही.
हापूस नापास
होतो कारण
त्याचा काही
भरवसा नाही...
काही वेळा
फळे कुजतात.
सर्व फळे
एकाच वेळी
पिकत नाहीत.
रंगात वेगळेपणा
दिसतो. त्यात
साका सापडतो,
इ.
हापूस ही
जात फारच
नाजूक आहे.
तो काढणे,
देठ तोडणे,
बुरशीनाशकाने धुणे,
योग्य तापमानात
जास्त दिवस
साठवणूक करणे
याबाबत खूप
काळजी घ्यावी
लागते. कोकणात
आर्द्रता जास्त
असल्याने तुडतुडे
व इतर
किडींच्या विष्ठेवर
काळ्या बुरुशीची
वाढ होते.
तसेच फळावर
इतर रोगही
येतात.
आंबा बगयतदारानी आंब्याला त्यांच्या या शत्रूपासून वाचवले पाहिजे. निर्यात तंत्रज्ञान शिकून घेतले पाहिजे.
थोडक्यात, निर्यातीची
परीक्षा पास
होण्यासाठी आंब्याची
पूर्णे तयारी
करून घेतली
पाहिजे. म्हणजे
तो नक्की
पास होईल,
त्याला विसा
मिळेल आणि
युरोपातील लोकांना
भारतीय आंब्याची
अवीट गोडी
चाखायला मिळेल.
-क्रांती रामचंद्र
पाटील
***