Menu

१४ फेब्रुवारी व्हॅलेन्टाइन डे

image By Wayam Magazine 13 February 2023

''वयम्'' फेब्रुवारी 2016 

हाहा म्हणताफेब्रुवारी आलासुध्दा आणि मनामनांच्या गाभाऱ्यात  प्रेमदिनाची हळूवार आठवण ताजी झाली. प्रेमाचा अनोखा स्पर्श पूर्ण आयुष्याचा कायापालट करतो. या प्रेमाचे बंध माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवतात. स्नेह,मायाममताप्रीतीसख्यजिव्हाळावात्सल्यकिती असंख्य शब्द या प्रेमासाठी वापरले जातात. या प्रेमाच्या छटा तरी किती विविध असतातपहाना !पितृप्रेम  वडिलांबद्दलचं प्रेममातृप्रेम  आईचं प्रेममित्रप्रेम  दोन मित्रांमधलं किंवा दोन मैत्रिणींमधलं प्रेमगुरूप्रेम  गुरूंबद्दलचं प्रेमबंधुप्रेम  भावाबद्दलचं प्रेमभगिनीप्रेम  बहिणीबद्दलचं प्रेमयाव्यतिरिक्तही प्रेमाचे आणखी कितीतरी प्रकार आहेतजसं की राष्ट्रप्रेम  राष्ट्राबद्दलचं प्रेमग्रंथप्रेम  पुस्तकांवरचं प्रेमनिसर्गप्रेम निसर्गावरचं प्रेमपशुप्रेम म्हणजे प्राण्यांवरचं प्रेमपक्षीप्रेम म्हणजे पक्षांवरचं प्रेम. असे अनेक प्रकार सांगता येतील.

      मुळात फेब्रुवारी महिना आणि प्रेम यांचा संबंध जोडला गेला तो 14 फेब्रुवारी या व्हॅलेन्टाइन्स दिनाच्या निमित्तान. व्हॅलेन्टाइन हे प्रसिध्द रोमन संत होते. त्यांच्या काळात राज्य करणारा रोमन राजा ''क्लॉडिअस दुसरा'' याने एकदा एक फतवा काढला की लष्करात भरती होणाऱ्या तरुणांना लग्न करता येणार नाहीत. या नियमामुळे सैनिक अधिक कर्तव्यनिष्ठ राहतीलअसं त्याचं मत होतं. परंतु संत व्हॅलेन्टाइन यांना हा सैनिकांवरचा अन्याय सहन झाला नाही आणि त्यांनी गुप्तपणे या तरुणांची लग्न लावून देण्याचा सपाटा लावला. हे उघडकीस आल्यावर राजाने संत व्हॅलेन्टाइन यांना कारागृहात बंद केलं. तरुणवर्गाच्या प्रेमसंवेदनांच्या बाबतीत संवेदनशील असलेले असे हे थोर संत  व्हॅलेन्टाइन. 14 फेब्रुवारीला त्यांचा स्मृतिदिन असतो. हा स्मृतिदिन त्यांच्या संवेदनशीलतेमुळे जगभर प्रेमदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवाय फेब्रुवारीच्या अखेरीस पश्चिमी देशातला अतिथंडीचा काळ संपुष्टात येऊ लागतो. वसंत ऋतूच्या नांदीची कीणकीण सुरू होते. हळुहळू जमिनीला कोंभ फुटू लागतात आणि नंतर फुलणाऱ्या नवजीवनाची स्वप्नं जगाला पडू लागतात. म्हणूनच की काय, ’Saint Valentine brings the keys of the roots’ ‘Valentine - the first spring saint’ असे वाक्प्रचार पाश्चात्यांमध्ये रुढ झाले आहेत. फेब्रुवारीचा मध्य उलटला की बागाईतदार शेतजमिनींवर कामं सुरू करतात. पक्षांच्या थव्यांनी गजबजलेल्या रानांची ही चाहूल असते. तर असा हा फेब्रुवारी महिन्याचा प्रेमाशी असलेला संबंध.

      प्रेम हा शब्द मुळात प्री  प्रीणाति या संस्कृत धातूशी संबंधित आहे. प्री  प्रीणति म्हणजे प्रेम करणं. तसंच स्नेह हा शब्दही संस्कृतातील स्निह्  स्निह्यति म्हणजे प्रेम करणं या धातूपासून सिध्द झाला आहे. स्नेह या शब्दाचे संस्कृतात दोन अर्थ आहेत. प्रेम आणि तेल. प्रेम हे तेलासारखं स्निग्धपारदर्शी आणि प्रवाही असतं. प्रेम आणि स्नेह या शब्दांपासून अनेक सुंदर शब्द तयार झाले आहेत. प्रेमळ म्हणजे प्रेम करणारा मायाळू माणूस. प्रेमपासून मग प्रेमळ,प्रेमार्द्रप्रेममयप्रेमस्वरुपसप्रेमप्रेमी असे शब्द बनवले जातात. स्नेही म्हणे मित्र. खरंच स्नेह असल्याशिवाय मैत्री कशी होणार ?पत्राच्या शेवटी आपला स्नेहांकित किंवा स्नेहाभिलाषि असं लिहिण्याची पध्दत आहे. तसंच पत्राच्या सुरुवातीलाही . . वि. वि. म्हणजेच सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं तुम्ही वाचलं असेल. आपले नातेवाईक किंवा मित्र-मैत्रिणींना वाढदिवशी भेटवस्तू देताना तुम्ही त्यावर लिहिता नासप्रेम भेट ! अर्थातच प्रेमामुळे नाती जपली जातात आणि प्रेम करणाऱ्या माणसाला पुन्हा प्रेमाची अपेक्षा असते.

 

      बरं काप्रेम करणारी माणसं मिळणंयासाठी खूप भाग्य असावं लागतं. आपण खरंच भाग्यवान आहोत की प्रेम करणारे आईबाबाभाऊबहिणीमित्र- मैत्रिणीगुरूजनशेजारीआजीआजोबाकाकामामाआत्यामावशा या प्रेम करणाऱ्या माणसांत आपण राहतो. घडतोपडलो तरी सावरतो. अशा या नात्यानात्यातील प्रेमाची असंख्य उदाहरणं आणि कथा आपल्याला सापडतात.

      प्रेमाचं आपल्या जीवनातलं स्थान कायहे सांगणाऱ्या गोष्टी अनेक आहेत. फ्रान्समध्ये प्रसिध्द असलेली ही लोककथाही प्रेमाची महती सांगणारी आहे.

      एक छानसं राज्य होतं आणि त्या राजाला दोन अत्यंत गोंडस मुली होत्या. राजाचं आपल्या मुलींवर जीवापाड प्रेम होतं. एकदा राजाचा वाढदिवस होताम्हणून मेजवानी आयोजित करण्यात आली होती. तऱ्हेतऱ्हेच्या चवदार पदार्थांची रेलचेल तिथे होती. उंची पेयं होती. भला थोरला केक होता. सरदार खास पाहुणेसाऱ्यांचं आदरातिथ्य शाही इतमामाने केलं जात होतं. राजाच्या मेजवानीला त्याच्या दोन राजकन्या त्याच्या दोन बाजूला बसल्या होत्या. राजाने थोरलीला सहज प्रश्न केला, ‘बाळामाझं तुझ्या जीवनात काय स्थान आहे? ’ थोरली म्हणाली, ‘या दिमाखदार केकवरील गोड मऊशार क्रीम म्हणजे बाबा तुम्ही. राजा दिमाखाने हसला. दरबारी मंडळींनी वाहवा केली. तो खूपच आनंदला. मग त्याने धाकटीला प्रश्न केला. ‘बाळातुझ्या जीवनात माझं स्थान काय?’ धाकटी म्हणाली, ‘बाबा तुम्ही,’तुम्ही माझ्या जेवणातील मिठासारखे आहात.’ राजा दचकला.’ अरेते खारटचरचरीत मीठ म्हणजे मी?’  त्याला कळेनाधाकटी मोठ्या प्रेमाने त्यांना ‘मीठमीठ’ म्हणत होती. दरबारीही गप्प झाले. राजाला हा मोठाच अपमान वाटला आणि अविचाराने तो गरजला, ‘खामोश!’ ‘आत्ताच्या आत्ता नाहीशी हो माझ्या डोळ्यांसमोरून. ही माझी आज्ञा आहे पाळली नाहीसतर फार भयंकर परिणाम भोगावे लागतील तुला.’

      धाकटी दुखावली. व्याकुळ झाली. तिला फार अपमानित वाटले. ‘बाबाबाबा..’. व्याकुळ स्वरात हाका घालत तिने मेजवानीची जागा सोडली. ती आपल्या महालात आली. पण राजाचे कठोर शब्द तिथेही तिचा पिच्छा पुरवत राहिले. आणि तिची ती रात्र त्या राजवाड्यातली शेवटची रात्र ठरली. अत्यंत बेचैन अवस्थेत तिने राजवाडा सोडला. ती चालत सुटली. तिने बघता बघता राज्याची वेस ओलांडली. ती कित्येक योजने चालली. खाण्यापिण्याची आबाळ करत ती चालतच राहिली. पण शेवटी भुकेने कळस गाठला. तेव्हा मात्र तिला काम शोधण्याची आवश्यकता भासली. पण त्याही अवस्थेत पराकोटीचं सौंदर्य लाभलेल्या तिला सहज कोणीही ओळखलं असतं. मग तिने वेष पालटला. आपला भरजरी पोषाख तिने लपवला आणि जाडीभरडी वस्त्रं नेसली. स्वतःचं अंगही तिन मलीन केलं. कोळशाची पूड तोंडालाहातापायांना फासून ती एक कुरुप मुलगी बनली आणि एका शेतात मेंढ्या चारण्याचं काम तिने मिळवलं. शेताची मालकीण तिला राबवत असपण मात्र कामानंतर अतिशय सुंदर लुसलुशीत रोट्या बनवण्यास तिने राजकन्येला शिकवलं. एकदा त्या देशीचा राजकुमार लढाईवरून परतत होता. लढाई जिंकून राजकुमार परत राजवाड्यात चालला होता. त्याला खूप भूक लागली होती. तो राजकन्येच्या मालकिणीच्या शेतावर आला. मालकिणीने त्याला खाऊपिऊ घातलं आणि तिथे त्याने चाखली ती लुसलुशीत अप्रतिम रोटी. राजवाड्यात गेल्यावरही त्या रोटीचा त्याला विसर पडला नाही आणि त्याने त्या रोट्या आणण्यासाठी पुन्हापुन्हा सेवकांना शेतावर धाडलं. एकदा रोट्या बांधताना राजकन्येची मुद्रांकित अंगठी राजकुमाराकडे गेली. अंगठीवरील मुद्रा शेजारच्या राज्याची आहेहे राजकुमाराला कळलं. त्याने ती अंगठी शेजारच्या राज्याच्या राजाकडे पोहोचवली. तोपर्यंत राजकन्येच्या शोधात हवालदिल झालेला राजा अत्यंत दीनवाणा झाला होता. अंगठी मिळताच तो कन्येसाठी शेतावर धावत आला. राजकन्येने पित्याचं दुःख ओळखलं आणि आपलं खरं रुप प्रकट केलं. राजकुमार आणि राजकन्या यांचा विवाह झाला. विवाहाच्या मेजवानीत राजकन्येने आपल्या पित्याला मिठाशिवाय बनवलेले पदार्थ वाढले. राजाला एकही घास घशाखाली उतरेना. त्याचवेळी राजाला राजकन्येच्या उत्तराचा खरा मतितार्थ समजला आणि उमजलंस्वतःचं महत्त्वाचं स्थान. तर प्रेम हे असं असतं. प्रेमाचं जीवनातील स्थान हे असंच अढळ आणि अटळ आहे. मग ते प्रेम पित्यावरचं असो की अन्य कोणावरचं. रोजच्या जेवणात मीठ हा अविभाज्य घटक आहे. तसंच प्रेम हा जीवनातला अविभाज्य घटक आहे.

      प्रेमनाती ही जपावी लागतात. प्रेम ही प्रेरणा आहे. प्रेम ही शक्ती आहे. प्रेम संजीवक असतं. दुःखावर घातलेली एक प्रेमाची फुंकर एखाद्याचं पूर्ण आयुष्य पालटू शकतं. अर्थात् प्रेमासाठी त्याग करावा लागतो. प्रेमसेवाभाव अंगी बाणवणं. यासारखं दुसरं सुख नाही. तेव्हा आता या प्रेमदिनाच्या मुहूर्तावर संकल्प करा प्रेमाचा. आणि होप्रेम केवळ माणसांवरच करावंअसं नाही. प्रेम कवितेवर करावंप्रेम पुस्तकांवर करावंप्रेम घरावर करावंप्रेम देवावर करावंप्रेम आदर्शांवर करावंप्रेम मूल्यांवर करावंप्रेम सद्विचारांवर करावंजगात जे जे शुध्दपवित्रसुंदर त्या सर्व गोष्टींवर प्रेम करावं. प्रेम भाषेवर करा. प्रेम पक्षांवर करा. त्यांना स्वतंत्र भरारू द्या प्रेम झाडाझुडुपांवर करा. त्यांना जोमाने वाढू द्या. प्रेम ही अशी दिव्य शक्ती आहे की जी जगाच्या कानाकोपऱ्यात असामान्यसुंदर बदल घडवू शकते. चलातर मग या प्रेमदिनाच्या मुहूर्तावर प्रेम करण्याचा संकल्प करू या.


-मंजिरी हसबनीस

(लेखिका संस्कृत विषयाच्या अध्यापक आहेत.)

My Cart
Empty Cart

Loading...