Menu

शालेय शिक्षकांसाठी अनुभवलेख-स्पर्धा

image 15
Jul

???? विषय आहे- ‘मी, वयम् आणि माझे विद्यार्थी’ ????


अनेक शिक्षक ‘वयम्’ मासिकाचा वापर शैक्षणिक साहित्य किंवा मुलांशी चर्चा करण्याचे साधन किंवा मुलांना वाचनाकडे वळवण्याचे माध्यम म्हणून वापरतात. ते कसे वापरले जाते, हे समजून घेण्यासाठी ही खास स्पर्धा.


स्पर्धेचे नियम-

१. ‘वयम्’ मासिकातील कोणत्याची साहित्याचा वापर तुम्ही तुमच्या शिकवण्यात किंवा विद्यार्थ्यांसाठी कसा केलात, त्याचा अनुभव लिहून पाठवणे अपेक्षित आहे.

२. पहिल्या पाच स्पर्धकांना प्रत्येकी रुपये १००० बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाईल. शिवाय ‘वयम्’ मासिकात / सोशल मिडियावर प्रसिद्धी मिळेल.

३. ही स्पर्धा कोणत्याही इयत्तेच्या, विषयाच्या, कोणत्याही माध्यमाच्या शिक्षकांसाठी आहे.

४. लेखाची शब्दमर्यादा- जास्तीत जास्त ८०० शब्द (कितीही कमी चालेल)

५. लेख मराठी किंवा इंग्रजीत असावा.  

६. लेख पाठवण्याची अंतिम तारीख - १५ जुलै

७. अनुभव-लेख पाठवताना त्यासोबत नाव, पत्ता, वय, शाळेचे / क्लासचे नाव, कोणत्या इयत्तेला कोणते विषय शिकवता, संपर्क क्रमांक, इमेल आय. डी. हा तपशील पाठवावा.

८. लेख वर्ड फाईलमध्ये टाइप केलेला किंवा हाती लिहून त्याची PDF बनवलेली फाइल पाठवावी.  (टपालाने किंवा इमेलने पाठवू शकता. दोन्ही पद्धती वापरू नयेत.)

९. लेख पाठवण्याचा पत्ता- संपादकीय विभाग- ‘वयम्’, न्यू वंदना को.ऑप.हा.सो., ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे- ४००६०२

दूरध्वनी : ०२२-२५९८६२७०

इमेल- ahamawamwayam@gmail.com

✒️ तुमच्या प्रतिसादाची आम्ही वाट बघत आहोत.


My Cart
Empty Cart

Loading...