करोनामुळे मिळालेल्या दीर्घ सुट्टीत मुलांना बंदिस्त वातावरणात अजूनही राहावे लागते आहे. थोडक्यात दुसरी सुट्टीही घरातच! म्हणून पुन्हा एकदा सुट्टी अनुभव स्पर्धा ‘वयम्’ मासिकाने आयोजित केली होती. या लांबलेल्या सुट्टीत काय केलं, वेळ कसा घालवला, याविषयीचे अनुभव मुलांना लिहायचे होते. या स्पर्धेत सुमारे ६० मुलांनी भाग घेतला आणि त्यांचे सुट्टी अनुभव आम्हांला लिहून पाठवले. दुसरीपासून दहावीपर्यंतच्या मुलांनी सहभाग घेतला. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, पंढरपूर, लातूर, नांदेड, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली अशा अनेक जिल्ह्यांतून अनुभव-लेख आले. तसेच महाराष्ट्राबाहेरील राजस्थान, गोवा, दिल्ली या ठिकाणांहूनही आले. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार आणि ‘वयम्’ लेखिका सोनाली कोलारकर-सोनार यांनी केले. हे परीक्षण करताना त्यांना जाणवलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे-
- दुसरी सुट्टीही घरातच घालवताना मुलांचे अनुभव वेगवेगळे होते. त्यात कलात्मकता, नाविन्य, कृतिशीलता अधिक दिसून आली.
- मुलांची भाषा मागील वेळपेक्षा यावेळी बरीच छान झाली आहे.
- मुलांनी स्वतःहून प्रामाणिकपणे अनुभव/मते मांडली आहेत.
- यावेळी दुसऱ्या लाटेत काही ‘वयम्’ वाचक मुलेदेखील करोनाबाधित झाली. काहींचे आई, बाबा, भावंडे आजारी होती. ही चटका लावणारी गोष्ट! परंतु मुलांनी ही परिस्थिती देखील धैर्याने हाताळल्याचे लिहिले आहे.
- अनेक मुलांनी बागकामात, नवे पदार्थ बनवण्यात आणि नवीन काही शिकण्यात खूप रस घेतला. मात्र दोन पत्रांत मुलींनी लिहिले आहे की, सुट्टी नको वाटते कारण त्यांना घरकाम करावे लागते. हा उल्लेख गमतीने का होईना पण आला आहे आणि तो विचार करायला लावणारा आहे.
- करोना काळात ‘वयम्’ मासिकाने घेतलेल्या विविध स्पर्धांमध्येही मुलांनी भाग घेतला. या स्पर्धांमुळे वाचन वाढले, असे या मुलांचे सांगणे फार आनंददायी आहे. अनेकांनी वाचनाकडेही अधिक लक्ष दिल्याचे सांगितले.
- ज्यांची नावे समाविष्ट होऊ शकली नाहीत, त्यांनी भाषा, मांडणी, विषय नेमका समजून घेणे यावर लक्ष केंद्रित केले, तर पुढील वेळेस त्यांना नक्कीच फायदा होईल.
- एकंदरीत या कठीण काळाशी सामना करताना मुलांनी दाखवलेली सकारात्मकता थक्क करायला लावणारी आहे.
- ‘वयम्’ मासिकाच्या प्रथेनुसार पाहिला, दुसरा असे क्रमांक न काढता उत्तम १२ जणांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले आहे.
१. चैतन्य परेश करंबेळकर, सातवी, सुशीलाताई दामले मराठी प्राथमिक शाळा, अंबरनाथ- ठाणे
२. मैथिली महेश पाटील, आठवी, जोधपुर, राजस्थान सेंट पट्रिक्स विद्यामंदिर, जोधपुर
३. संदेश अरुण सावंत, आठवी, श्रीकिशन सोमानी विद्यालय, लातूर
४. संकर्षण गिरीश कुलकर्णी, आठवी, श्रीकिशन सोमानी विद्यालय, लातूर
५. मुग्धा गणेश प्रभू, दहावी, सेंट तेरेसा कॉन्वेंट हायस्कूल, सांताक्रूझ, मुंबई
६. स्वरा ठोंबरे, दहावी, विटा हायस्कूल, विटा, तासगाव, सांगली
७. अनन्या अभिजीत सप्रे, सहावी, न्यू इंग्लिश स्कूल, लांजा, रत्नागिरी
८. गायत्री संतोष शेरीकर, सातवी, श्रीकिशन सोमानी विद्यालय, लातूर
९. हरिहर गजानन करमरकर, सहावी, फाटक हायस्कूल, रत्नागिरी
१०. वैनवी सुरेंद्र आंब्रे, पाचवी, निवारा विद्यालय, गोरेगाव- मुंबई
११. अभय गजानन भुतेकर, दहावी, कै.बहिरोमल लालवानी विद्यामंदिर औरंगाबाद
१२. ओजस सरदेसाई, चौथी, सी. एम. इंटरनॅशनल स्कूल, पुणे