मुंबईतील राणीच्या बागेत हवी आहे सिंहाची जोडी. ती आणायची आहे गुजरातमधल्या प्राणिसंग्रहालयातून. त्यांना त्या बदल्यात हवी आहे झेब्रा-जोडी. ती आणली जाणार आहे इस्राएलमधून. म्हणजे आता इस्रायलमधून झेब्रा-जोडी आणली की ती गुजरातच्या झूमध्ये पाठवली जाईल आणि तिथली सिंह-जोडी राणीच्या बागेत आणण्यात येईल! आहे की नाही अजब व्यवहार? १५ सप्टेंबरच्या लोकसत्ता वृत्तपत्रात प्रसाद रावकर या पत्रकाराची ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.
आता तुम्ही कल्पना करा की, हे सिंह आणि झेब्रा एकमेकांशी काय गप्पा मारतील? तुमचे गप्पा-लेखन आमच्याकडे पाठवा.
???? ही स्पर्धा पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी
???? ह्या गप्पा मराठी किंवा इंग्लिश या भाषांमध्ये चालतील.
???? शब्दमर्यादा- २००.
???? पाठवण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर.
???? पाठवण्याचा पत्ता- ‘वयम्’ मासिक, न्यू वंदना को.ऑप.हा.सो., ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे- ४००६०२, दूरध्वनी- ०२२-२५९८६२७०/७१/७२/७३ या पत्त्यावर पाठवा किंवा तुमचे गप्पा-लेखन ahamawamwayam@gmail.com या इमेलवर पाठवा.
निवडक संवाद-लेखनाला ‘वयम्’ मासिकात प्रसिद्धी व प्रमाणपत्र मिळेल.