श्रावणातील निसर्ग- फोटो स्पर्धा!
१९ ऑगस्ट हा जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित 'वयम्' मासिक श्रावणातील निसर्ग- फोटो' स्पर्धा घेत आहे. तुझ्या आजूबाजूच्या निसर्गाचे फोटो काढून आमच्याकडे पाठवायचे आहेत. श्रावणात निसर्गाचं रूप मनमोहक दिसतं. याच निसर्गाचं सौंदर्य तुला टिपायचं आहे. जे फोटो तू काढशील, त्यातले फक्त दोन बेस्ट फोटो आम्हांला पाठव. त्या फोटोखाली त्याचं वर्णन करणारी २ ते ४ वाक्यं लिही. उत्तम फोटो पाठवणाऱ्यांना अंकातून आणि सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळेल.
स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी हे करा-
१. तुझ्या आजूबाजूच्या परिसरातील निसर्गाचे फक्त २ फोटो 'वयम्'च्या मेल आयडीवर पाठवायचे आहेत. (उदा. फुलं, पाण्याचे झरे, हिरवागार निसर्ग इत्यादी.)
२. त्या फोटोला साजेशी २ ते ४ वाक्ये मराठीत किंवा इंग्रजीत लिही. नुसता फोटो पाठवू नकोस. त्या फोटोच्या वर्णन करणाऱ्या ओळीही महत्त्वाच्या आहेत. नुसते फोटो स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
३. हे फोटो व वाक्य ahamawamwayam@gmail.com या इमेलवर JPEG Format मध्ये पाठव. JPEG Format मध्ये नसलेले फोटो आम्ही स्पर्धेसाठी स्वीकारणार नाही.
४. फोटो आणि फोटोओळींचा इमेल करतेवेळी तुझं नाव, वय, पत्ता, शाळेचं नाव, इयत्ता, फोन नंबर, इमेल आयडी हे आठवणीने लिही. विसरू नकोस. नाहीतर फोटो कोणाचे आहेत हे आम्हांला कळणार नाही.
५. ही स्पर्धा इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
६. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख- ३१ ऑगस्ट २०२४.