Menu

खिडकीतला निसर्ग फोटो स्पर्धा!

image 07
Jun

  • खिडकीतला निसर्ग फोटो स्पर्धा!

    तुमच्या घरातून, वस्तीतून, आवारातून, गच्चीतून निसर्गातली जी जी गंमत दिसते तिचे फोटो काढा. त्यातला फक्त एक फोटो आम्हांला पाठवा. त्या फोटोखाली त्याचं वर्णन करणारी २ ते ४ वाक्यं लिहा. मात्र, एक अट आहे; या फोटोतून कळलं पाहिजे की, तो तुम्ही तुमच्या घरातून किंवा आवारातून काढलाय. एरवी आपण बाहेर फिरायला गेलो की, निसर्गाचे फोटो काढतो, तसे फोटो अपेक्षित नाहीत. आपल्याला दाखवायचाय घरातून दिसणारा निसर्ग! आपल्या ‘वयम्’ जून २०२१ महिन्याच्या अंकाचं कव्हर किंवा अंकातले काही फोटो नीट बघा, म्हणजे तुम्हांला आयडिया मिळेल. उत्तम फोटो पाठवणाऱ्यांना अंकातून प्रसिद्धी आणि आकर्षक प्रशस्तिपत्रक.


  • स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी हे करा-

    • १. तुमच्या घरातून, वस्तीतून, आवारातून, गच्चीतून दिसणारा निसर्गाचा कोणताही घटक, कोणतंही रूप कॅमेऱ्यात टिपा.
    • २. त्यातला तुम्हांला आवडेल तो एक फोटो ‘वयम्’कडे पाठवा.
    • ३. त्या फोटोला साजेशी २ ते ४ वाक्ये मराठीत किंवा इंग्रजीत लिहा.
    • ४. हे फोटो व वाक्य ahamawamwayam@gmail.com या इमेलवर JPEG Format मध्ये पाठवा.
    • ५. त्या इमेलमध्ये तुमचं नाव, वय, पत्ता, शाळेचं नाव, इयत्ता, फोन नंबर, इमेल आयडी लिहा
    • ६. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख- ३० जून २०२१.
    • ७. ही स्पर्धा चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

    फोटो व वाक्य पाठवण्याचा इ-मेल : ahamawamwayam@gmail.com अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५ विविध स्पर्धा आणि उपक्रम याविषयी जाणून घेण्यासाठी www.wayam.in या आमच्या वेबसाइटला जरूर भेट द्या.

    - ‘वयम्’टीम

    *****

  • खिडकीतला निसर्ग फोटो स्पर्धा!

विजेत्यांचे अभिनंदन

वयम्मासिकाच्या जून महिन्याच्या अंकाच्या मुखपृष्ठावर सीमा राजेशिर्के यांनी काढलेला फोटो होता. त्यात खिडकीत आलेले पक्षी होते. त्याच महिन्याच्या अंकात सीमा राजेशिर्के यांच्या Window Birding या त्यांच्या छंदाबाबत आणि त्यांच्या फिल्मविषयी विजयराज बोधनकर यांनी लिहिलेलाखिडकीतले पक्षीहा लेख प्रसिद्ध झाला होता. तो तुम्ही वाचला असेल. त्यावर आधारितवयम्मासिकानेखिडकीतला निसर्ग फोटो स्पर्धा!’ चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. यामध्ये तुमच्या घरातून, वस्तीतून, आवारातून, गच्चीतून निसर्गातली जी जी गंमत दिसते, तिचे फोटो काढायचे होते. त्यातला फक्त एक फोटो आम्हांला पाठवायचा होता. त्या फोटोखाली त्याचं वर्णन करणारी दोन ते चार वाक्यं लिहायची होती. मात्र, त्यात एक अट अशी होती की, त्या फोटोतून कळलं पाहिजे की, तो तुम्ही तुमच्या घरातून किंवा आवारातून काढलाय. एरवी आपण बाहेर फिरायला गेलो की, निसर्गाचे फोटो काढतो, तसे फोटो या स्पर्धेत अपेक्षित नव्हते. आपल्याला दाखवायचा होता घरातून दिसणारा निसर्ग!

मुलांनी विषय समजून घेऊन भरभरून प्रतिसाद दिला. सुमारे १५० फोटो एन्ट्रीज आमच्याकडे आल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून या एन्ट्रीज होत्या. सीमा राजेशिर्के यांनी ह्या स्पर्धेचे परीक्षण केले. ‘वयम्च्या प्रथेप्रमाणे एक, दोन असे नंबर काढता विजेते १० आणि उत्तेजनार्थ १४ निवडले आहेत. सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सहभागी झालेल्या सर्वांचे कौतुक!

परीक्षकांचे मनोगत-

फोटो परीक्षण करताना हे सारे वयाने लहान असणारे छायाचित्रकार निसर्गात रमणारे, नियमितपणे घरातला आणि घराभोवतालचा निसर्ग जपणारे आहेत हे लक्षात येत होते आणि याचा आनंद वाटत होता.

यातील काही फोटो बाजूला काढावे लागले याचे वाईट वाटते आहे. कारण ते फोटो खूप क्रॉप केले आहेत, तर काहींवर कॅप्शन लिहिल्या आहेत.

निवडलेल्या वर्गात एक फोटो महत्त्वाचा आहे, ज्यात पोपट बिस्कीट खात आहे. खरे तर पक्ष्यांना मैद्याचे, तेलकट, तिखट, खारट पदार्थ कधीही देऊ नयेत; ते त्यांच्या आरोग्यासाठी चांगले नसते. तुम्ही मुलांनी हे नक्की लक्षात ठेवा हं!

काही फोटोतील खिडकीत आरामात बसलेले पक्षी बघताना मला आमच्या घराच्या खिडकीची आठवण होत होती...

अभ्यास सांभाळून निसर्गातील गमतीजमती डोळसपणे बघताना तुम्हा छायाचिकारांच्या मनात निसर्ग संवर्धनाचं बीज आपसूकपणे रूजलं जात आहे, याचं समाधान वाटतंय. छायाचित्रणाचा छंद असाच जोपासावा, तो सदैव वाढता ठेवावा यासाठी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद.

-
सीमा राजेशिर्के

 

फोटो स्पर्धाविजेते 10

  • मंथन टक्के, दहावी, आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वरवडे, ता. कणकवली- सिंधुदुर्ग
  • मुग्धा क्षीरसागर, आठवी, आनंद निकेतन स्कूल, नाशिक
  • अथर्व लक्ष्मण आगरे, दहावी, चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूल, मुंबई
  • वेद किरण माडकर, चौथी, डि. . व्ही. पब्लिक स्कूल, ऐरोली
  • अत्रेय केदार देवस्थळी, पाचवी, ...शाळा क्र.१५ दामले विद्यालय, रत्नागिरी
  • आकांक्षा अभिजित कुलकर्णी, आठवी, मिलेनियम स्कूल, पुणे
  • मेहूल प्रसन्न गांधी, सातवी, जनप्रबोधिनी, प्रशाला पुणे
  • देवेश वळवी, सातवी, युनिव्हर्सल स्कूल ब्रह्मांड, ठाणे पश्चिम
  • मोक्षदा मयुरेश कोनेक, पाचवी, एस. एस. समिती हायस्कूल, गोवा
  • जान्हवी ओम दांडेकर, सातवी, सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे

फोटो स्पर्धा - उत्तेजनार्थ 14

  • आर्यन लालासाहेब तांबडे, आठवी, ज्ञानप्रबोधिनी बालविकास मंदिर, सोलापूर
  • ओम सचिन चोरगे, दहावी, आय. . एस. सेकंडरी स्कूल, भांडूप- मुंबई
  • तनया सुधीर गायकवाड, नववी, जैन इंग्लिश स्कूल, पुणे
  • टीना सचिन फुलोरे, दहावी, सुहासिनी प्रभाकर अधिकारी महाविद्यालय, अंबरनाथ
  • सुहानी कोल्ह्टकर, दहावी, अभिनव विद्यालय हायस्कूल, पुणे
  • वरद कुलकर्णी, सातवी, आय. . एस. चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली (पू)
  • प्रतिक्षा रावराणे, दहावी, अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी-सिंधुदुर्ग
  • स्वानंदी दाते, नववी, . भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, गोरेगाव-मुंबई
  • शांभवी बारोळे, सातवी, ज्ञानप्रकाश बाल विकास केंद्र, लातूर
  • अनुष्का दोभाडा, सहावी, विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडियम स्कूल, सोलापूर
  • आनंदी जाधव, पाचवी, आनंद निकेतन स्कूल, नाशिक
  • अर्जुन रत्नेश नींगुरकर, पाचवी, भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल बेलवाडी, पुणे
  • मुग्धा मुंडले, दहावी, पी. जोग मराठी मिडियम स्कूल, पुणे
  • जान्हवी ललित मंजुळे, दहावी, मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेज, नाशिक


My Cart
Empty Cart

Loading...