‘वयम्’ मासिकाने आयोजित केलेल्या ‘गुरुपौर्णिमा पत्रलेखन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल ‘वयम्’ मासिकाच्या वेबसाइटवर जाहीर झाला आहे. विजेत्या ३० पैकी काही प्रातिनिधिक पत्रे शेअर करत आहोत.
माझ्या लाडक्या दादाला, (शाळेचे संस्थापक, अरुण ठाकूर यांना-) दादा मुद्दामच तुला प्रिय, आदरणीय असं काही लिहित नाही कारण तू तर माझा मित्रच आहेस. माझ्या इतर शाळांमधल्या मैत्रिणींना जेव्हा मी तुझ्याबद्दल सांगायचे तेव्हा तुम्ही तुमच्या सरांना अरे-तुरे करता? हा प्रश्न त्यांच्या चेहेऱ्यावर स्पष्टपणे दिसायचा.पण कधी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावंसं वाटलं नाही कारण तुझं आमच्यावरचं प्रेम हेच त्याचं उत्तर होतं. कालच निमिषने तुझ्यावर लिहिलेला लेख वाचला आणि आपोआप डोळ्यात पाणी आलं तेव्हा मागच्या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची तूझ्या bagची गंमत आठवली आणि पटकन चेहेऱ्यावर हसू आलं. तू गेल्यानंतर इतिहासाच्या प्रत्येक तासाच्या आधी पुन्हा जिन्यात जाऊन उभं राहावं आणि तुझी वाट पहावी असं वाटायचं.आणि जिन्यातून वर्गापर्यंतच्या आपल्या गप्पा आठवायच्या. Lockdown च्या आधी कोणत्यातरी कार्यक्रमाला माईकची खरखर ऐकू आली आणि आम्ही वर्गात शांत बसावं म्हणून तू मुद्दामहून काढणारा माईकचा आवाज आठवला. तो आवाज कितीही कर्कश्श असला तरी त्यातली माया,आपलेपणा,प्रेम आणि तुझा संयम जाणवायचा. तुझ्यावरच्या लेखात तुझा उल्लेख आनंद निकेतनचं खोड असा केला. आता तू नसलास तरी तुझे विचार, तुझी मत, तुझा आमच्याबद्दलचा जिव्हाळा खोडाची भूमिका नेमकी वठवत आहेत. दादा तुझा फोटो जेव्हा जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा कसलीतरी जाणीव करून देतो आणि जेव्हा जेव्हा तुझी आठवण येते तेव्हा तू समजावून सांगितलेली INVICTUS कविता आठवते आणि त्या ओळी आपसूक ओठांवर येतात I AM THE MASTER OF MY FATE I AM THE CAPTAIN OF MY SOUL. -तुझी विद्यार्थी मैत्रीण आभा नववी, नाशिक |
प्रिय आजोबा, यः प्रेरकः धर्मज्ञः सूचकः विद्वान् च सः गुरुः। यः अज्ञानस्य तिमिरः ज्ञानस्य प्रकाशेन निवारयति। तस्मै श्री गुरवे नमः।। माता, पिता, अध्यापक या सर्वांना वंदन. पण माझे आणखी एक वंदनीय गुरू म्हणजे तुम्ही आजोबा. अठरा विश्वे दारिद्र्य, अज्ञान आणि व्यसन यांच्या विळख्यात तुमचा जन्म झाला. पण तुमच्या या समस्यांना न डगमगता तुम्ही त्यातून मार्ग काढत राहिला. एक गणवेश आणि शाळेची जुनी पुस्तके यांच्य |