Menu

‘वयम्’ कथा स्पर्धा २०२१

image 30
Aug

‘गोष्ट रचा’ या स्पर्धेची इमेज नीट पहा. त्यात दोन चित्रे दिली आहेत आणि त्या चित्रांसाठी दोन ओळीही दिल्या आहेत. त्या चित्रांच्या आणि ओळींच्या आधारे छानशी गोष्ट रचा आणि वयम् मासिकाकडे पाठवा. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इयत्ता, इमेल, फोन नंबर लिहा. तुमच्या कल्पक कथांची आम्ही वाट पाहत आहोत.



कथा स्पर्धेचे नियम-


१. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इयत्ता, इमेल, फोन नंबर लिहायला विसरू नका.

२. ही स्पर्धा इयत्ता चौथी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

३. कथा एकतर टाइप केलेली असावी किंवा PDF फॉरमॅटमध्ये असावी. कागदाचे फोटो काढून पाठवलेली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही. टाइप करण्यासाठी वापरलेला फॉन्ट शक्यतो युनिकोडमध्ये असावा.

४. मराठी व इंग्रजी यांपैकी कोणत्याही भाषेतून कथा लिहू शकता.

५. कथेची शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. त्यापेक्षा जास्त शब्दांची कथा असल्यास ती कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही.

६. ahamawamwayam@gmail.com या मेलवर कथा पाठवायची आहे.

७. कथा पाठवण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२१ आहे. या तारखेनंतर पाठवलेली कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही.

८. कथा स्पर्धेमधून १, २, ३ असे क्रमांक काढले जाणार नाहीत. उत्तम अशा निवडक कथा ‘वयम्’च्या अंकामध्ये आणि ‘वयम्’च्या सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्या जातील.

९. परीक्षकांचा निर्णय बंधनकारक राहील. अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५ विविध स्पर्धा आणि उपक्रम याविषयी जाणून घेण्यासाठी www.wayam.in या आमच्या वेबसाइटला भेट द्या.

कथा पाठवण्याचा इ-मेल : ahamawamwayam@gmail.com अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५ विविध स्पर्धा आणि उपक्रम याविषयी जाणून घेण्यासाठी www.wayam.in या आमच्या वेबसाइटला जरूर भेट द्या.



- ‘वयम्’टीम


‘वयम्’ गोष्ट रचा कथा स्पर्धा निकाल-

वयम्’ मासिकाच्या जुलै २०२१च्या अंकात गोष्ट रचा स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. मुलांनी त्यांच्या उत्तम कल्पना मांडत गोष्टी रचल्या. या स्पर्धेत पाच निवडक विद्यार्थी कथाकारांच्या कथा विजेत्या कथा म्हणून निवडण्यात आल्या आहेत. त्याबद्दल विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी विद्यार्थ्यांना खूप-खूप शुभेच्छा. सर्व विजेत्यांच्या कथा एकाच अंकात प्रसिद्ध करणे सोयीचे नसल्याने तीन कथा या अंकात प्रसिद्ध करत आहोत. सर्व सहभागींचे आभार आणि विजेत्यांना धन्यवाद!-शुभदा चौकर
मुख्य संपादक ‘वयम्’ मासिक

एखाद्याचं लेखन वाचून त्यातून बेस्ट फाईव्ह शोधणं हे तसं कठीण काम. त्यातल्या त्यात मुलांनी लिहिलेलं वाचून त्यातून पाच शोधणं त्याहून महाकठीण. सहभागी लेखकांचं लेखन तपासताना दमछाक झाली. खूप सुंदर कल्पना लढवल्या आहेत मुलांनी. काहीजण तात्पर्यात अडकलेले दिसले. मात्र काहींनी मुक्तपणे आपली कल्पकता वापरली. हे फारच भन्नाट होतं. जाम आवडलं. काही जणांनी खूप सुंदर लेखन केलं. आपलं खूप खूप अभिनंदन आणि पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा.

विजेते आहेत-

  • आनंदी अनिरुद्ध जाधव, पाचवी, नाशिक
  • दुर्गा गोवर्धन ठाकूर, आठवी, नांदेड
  • अनन्या प्रशांत देशपांडे, चौथी, बाणेर-पुणे
  • दिविजा शीतोळे, चौथी, पुणे
  • तनिष्का संजय सागडे, दहावी, बारामत

My Cart
Empty Cart

Loading...