Menu

आसपास जाणवणारा वसंत ऋतू

image 01
Apr

‘वयम् दोस्तांनो’, आपल्या सभोवताली पाहिलं की आता *वसंत ऋतू* जाणवू लागलाय. निसर्ग बहरलाय. सृष्टीचं लोभस रूप दिसू लागलंय. *तुमच्या आसपास तुम्हांला वसंत ऋतूचं जे चित्र दिसतंय ते तुम्ही चितारून पाठवाल? कसं?*स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी हे करा-


१. चित्रातून- ए४ आकाराच्या कागदावर चित्र काढून, रंगवून पाठवा. किंवा
२. लेखनातून- जास्तीत जास्त १५० शब्दांत वर्णन लिहून पाठवा. (मराठीत किंवा इंग्रजीत)
३. त्या फोटोला साजेशी २ ते ४ वाक्ये मराठीत किंवा इंग्रजीत लिहा.
4. *तुमचं चित्र किंवा लेखन ३० एप्रिलपर्यंत आमच्यापर्यंत पोचवा.*


*स्पर्धेचे नियम-*


१. चित्र किंवा लेखन यांपैकी एक किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेतला तरी चालेल.
२. ही स्पर्धा इयत्ता *चौथी ते दहावीच्या* मुलांसाठी आहे.
३. *लेखन किंवा चित्र* ????इमेलद्वाराही पाठवू शकता.
४. लेखन इमेल करताना शक्यतो टाइप केलेले असावे किंवा हाताने लिहिलेले PDF स्वरुपात पाठवावे.
५. चित्र इमेल करत असाल तर फोटो न काढता ते स्कॅन करून PDF मध्ये पाठवावे.
६. चित्र किंवा लेखन पाठवताना त्याबरोबर तुमचं पूर्ण *नाव, इयत्ता, शाळेचं नाव, पत्ता, इमेल आणि फोन नंबर* आठवणीने लिहा.
७. जमल्यास ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''वयम्''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''च्या सोशल मिडियावर तुमचे लेखन किंवा चित्र tag करा. (Facebook- wayam / Instagram-wayam_magazine)
४. लेखन इमेल करताना शक्यतो टाइप केलेले असावे किंवा हाताने लिहिलेले PDF स्वरुपात पाठवावे.
इ-मेल : ahamawamwayam@gmail.com ✉️ पोस्टाने/कुरिअरने पाठवण्यासाठी पत्ता- ‘वयम्’ मासिक, न्यू वंदना को.ऑप.हा.सो., ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे-400602, दूरध्वनी- 022 25986273 / 69086273


लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी वाचावं असं मासिक- ''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''वयम्''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''.


सभासद नसाल तर लवकरात लवकर सभासद व्हा आणि वाचनाचा खजिना जमवा. अधिक माहितीसाठी- www.wayam.in वेबसाइट पाहा.


- ‘वयम्’टीम

आसपास जाणवणारा वसंत ऋतू- स्पर्धा निकाल 2022

आसपास जाणवणारा वसंत ऋतू स्पर्धा- विजेत्यांचे अभिनंदन.

‘वयम्’ मासिकाच्या मार्च महिन्याच्या अंकात आसपास जाणवणारा वसंत ऋतू ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वसंत ऋतूत दिसणारं सृष्टीचं लोभस रूप निबंध किंवा चित्र स्वरुपात पाठवायचं होतं. या स्पर्धेला मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. या स्पर्धेचं परीक्षण ‘वयम्’च्या लेखिका कांचन जोशी आणि संपादक शुभदा चौकर यांनी केलं. नेहमीप्रमाणे एक, दोन असे क्रमांक न काढता- उत्तम निबंध लेखन चार आणि सुंदर चित्र रेखाटलेले विजेते पाच अशी निवड करण्यात आली आहे. या सर्वांचे विशेष अभिनंदन!

निबंध लेखन विजेते-

  • 1. आदिती प्रवीण वानखडे, चौथी, हेमा पाटील इंग्लिश प्रायमरी स्कूल, जरूड, जि. अमरावती
  • 2. स्वरा राहुल पाटणकर, पाचवी, आर्यन वर्ल्ड स्कूल, वारजे, पुणे
  • 3. जान्हवी ओम दांडेकर, सातवी, सरस्वती सैकेण्डरी शाळा, ठाणे
  • 4. सार्थक श्रीराम पवार, आठवी, आप्पासाहेब. पी. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, नांद्रा.ता-पाचोरा, जळगाव

चित्र रेखाटन विजेते-

  • 1. अक्षरा पालवणकर, आठवी, सिस्क स्कूल, पुणे
  • 2. स्वानंदी आनंद बाबरेकर, सहावी, भारतीय विद्या भवन, पुणे
  • 3. तनया पराग धर्माधिकारी, सहावी, द ब्लाइंड रिलीफ अससोसिएशन नागपूरस् मुंडले इंग्लिश मिडीयम स्कूल, नागपूर
  • 4. मल्हार भार्गवे, सातवी, आनंद निकेतन, नाशिक
  • 5. अपर्णा गणेश कोठवडे, पाचवी, दिल्ली पब्लिक स्कूल, नाशिक

परीक्षकांचे मनोगत

नमस्कार बालदोस्तांनो!

‘वयम्’ने घोषित केलेल्या स्पर्धांना तुम्ही नेहमीच भरभरून प्रतिसाद देता याचा ‘वयम्’ टीमला आनंदच आहे. पण एक गोष्ट परीक्षण करताना प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे तुमचं मत, तुम्हांला काय वाटलं? तुम्ही काय पाहीलं? हे अपेक्षित असताना बरीच मुलं सर्वसाधारण मत, पुस्तकी भाषा आणि वर्णन यातच अडकलेली आहेत. असं का बरं होतंय?

बदललेल्या पाठ्यपुस्तकातही स्वाध्यायांमधून तुमचं मत, निरीक्षणं यावर आधारित प्रश्न आहेत. मग? लिहीणार ना यापुढे स्वतः विचार करुन स्वतःच्या भाषेत? तुम्ही जे पहाता, जे अनुभवता, जे तुम्हाला वाटतं ते तुमच्या भाषेत लिहाल तेव्हा एक आगळाच आनंद तुम्हांला मिळेल, तो ही अनुभवा!My Cart
Empty Cart

Loading...