‘वयम्’ अभिवाचन स्पर्धा-
23
Feb
मराठी राज्यभाषा दिनानिमित्त ‘वयम्’ मासिकातर्फे होत असलेल्या स्पर्धेत सहभागी व्हा.
> ही स्पर्धा ४थी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.
> ‘वयम्’ मासिकाच्या कोणत्याही अंकात प्रसिद्ध झालेले कोणतेही साहित्य (कथा, लेख, कविता, किस्सा, काहीही) तुम्ही मोठ्याने वाचा. त्याचे व्हीडीओ शूटिंग करा आणि आमच्या ahamawamwayam@gmail.com या इमेलवर पाठवा.
> तुमचा व्हीडीओ ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळेचा नसावा. तुम्ही निवडलेले साहित्य मोठे असेल तर त्यातील काही भाग वाचून पाठवला तरी चालेल.
ही स्पर्धा २३ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२४ या काळापुरतीच आहे. त्यामुळे तुमच्या वाचनाचा व्हीडीओ लवकरात लवकर पाठवा. त्यासोबत पुढील प्रवेशिका याच इमेलवर भरून पाठवा-
1. स्पर्धकाचे नाव- ..............
2. जन्मतारीख- ............
3. शाळेचे नाव- .................
4. घराचा पत्ता- ..............................
5. संपर्क क्रमांक- ................
6. ‘वयम्’च्या कोणत्या अंकातील उतारा निवडला आहे- उदा., मे- २०१९ ....................
7. त्या साहित्याचे शीर्षक आणि साहित्यिकाचे नाव- .....................
विजेत्यांचे व्हीडीओ ‘वयम्’ मासिकाच्या सोशल मीडियावर कुसुमाग्रज जयंतीदिनी, २७ फेब्रुवारी २०२४ला अपलोड केले जातील.