'वयम्' दोस्तांनो,
'वयम्' मासिकातर्फे मराठी राजभाषा
दिनानिमित्त घेण्यात आलेल्या अभिवाचन स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलांचं
कौतुक. “कोण म्हणतं आजची मुलं वाचत नाहीत? ही मुलं बघा,
कशी समरसून वाचतात ते!” असं खणखणीत उत्तर तुमच्या सहभागाने दिलं
आहे!
या स्पर्धेला तुम्ही छान प्रतिसाद दिलात. सुमारे १५० मुलांनी अभिवाचनाचे व्हिडीओ पाठवले. यातील २० जणांची निवड आम्ही विजेते म्हणून केली आहे. आपल्या प्रथेप्रमाणे पहिला, दुसरा क्रमांक काढलेला नाही. ‘विजेते २०’ जाहीर केले आहेत. हे काम कठीण झाले, कारण अनेक मुलांचे प्रयत्न चांगले आहेत.
काही निरीक्षणे-
· संवाद, कविता,
गोष्टीतली मजा हे सारे आवाजातून दाखवण्याचा मुलांचा प्रयत्न स्तुत्य
आहे.
· शहरी, ग्रामीण
सर्व ठिकाणच्या मुलांचा उत्साही आणि सफाईदार सहभाग सुखावणारा आहे.
· मुलांच्या निवडीत वैविध्य आहे. गोष्टी, कविता, संवाद, विज्ञानलेख,
माहिती अशी विविधता आहे.
'वयम्' संपादकीय विभाग
२७ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्याने २-३ सादरीकरणे 'वयम्'च्या सोशल मिडियावरून प्रसिद्ध करीत
आहोत.
विजेत्यांची नावे-
∙ अद्वैत केदार जोशी, इ. चौथी, आदरणीय गोपाळ कृष्ण सोहनी विद्यामंदिर, दापोली.
∙ सनत सचिन देशपांडे, इ. सातवी, शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणे, पुणे.
∙ जान्हवी ओम दांडेकर, इ. आठवी, सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे.
∙ आदित्य अभिजित गानू, इ. नववी, हि. हा. रा. चिंतामणराव पटवर्धन हायस्कूल, सांगली.
∙ स्वानंदी आनंद बाबरेकर, इ. सातवी, भारतीय विद्या भवन, शिवाजीनगर, पुणे.
∙ श्रुती सुयोग पावसे, अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, एरंडवणे, पुणे.
∙ संयुजा श्रीकांत पाटील, इ. सहावी, जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सालपे नं. १, लांजा, रत्नागिरी.
∙ वैदेही सच्चिदानंद चाटुफळे, इ. सातवी, एम. जी. एम. संस्कार विद्यालय, संभाजीनगर, (औरंगाबाद).
∙ रसिका अंबरीष माळवदे, इ. नववी, सुर्यदत्ता नॅशनल स्कूल, बावधन, पुणे.
∙ श्लोक रुपेश समेळ, इ. पाचवी, एन. आय. ओ. एस, ठाणे.
∙ शौर्य विशाल भुजाडे, इ. चौथी, जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, बोपर्डी, वाई.
∙ अदिती हर्षल चानसीकर, इ. सातवी, आनंद निकेतन, नाशिक.
∙ शार्दुल हिमांशु जोशी, इ. आठवी, डी. ई. एस. स्कूल, पुणे.
∙ कनक अनिल चव्हाण, इ. सहावी, आनंद निकेतन, नाशिक.
∙ श्रेष्ठा निलेश भावसार, इ. नववी, आनंद निकेतन, नाशिक.
∙ श्रुतिका समीर अभ्यंकर, इ. सातवी, सरस्वती विद्यामंदिर सेकंडरी स्कूल, ठाणे.
∙ अवधूत सुहृद अन्नछत्रे इ. सहावी, पोद्दार इंटरनेशनल स्कूल (इंग्रजी माध्यम), औरंगाबाद.
∙ सनंदन सचिन देशपांडे, इ. सातवी, शिशुविहार प्राथमिक शाळा, एरंडवणे, पुणे.
∙ शुभ्रा जयश्री गिरीश कुलकर्णी, इ. चौथी, ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, लातूर.
∙ माधुरी बलभीम मोरे, इ. आठवी, मा. दादासाहेब दांडेकर विद्यालय, भिवंडी, ठाणे.