
तिसऱ्या लुगड्याची गोष्ट : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
१० मार्च सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. त्यांच्या अपार कष्टामुळे आणि जिद्दीमुळे स्त्री-शिक्षणाला सुरुवात झाली. आज महिला साक्षर होऊन अनेक उच्च पद भूषवत आहेत ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित त्यांचीच ही एक छोटीशी गोष्ट- - सावित्रीबाई फुले यांचे नाव ठाऊक नाही अशी स्त्री सापडणे कठीण आहे. त्या तेव्हा होत्या म्हणून आज आपण आहोत हा विचार केलात ना प्रिय मुलींनो, तर विचारांच्या साऱ्या दिशा लख्ख उजळतील.ख्ख उजळतील.