best bedtime stories in marathi | मराठीतील सर्वोत्तम कथा

Image not found

मराठी बालगोष्टी | bedtime stories for kids

आई-वडिलांनी किंवा आजी-आजोबा यांनी आठवड्यातून चार गोष्टी, moral stories for kids, bedtime stories in marathi तरी मुलांना सांगाव्यात व त्यातून मिळणाऱ्या तात्पर्यविषयी मुलांबरोबर चर्चा करावी. त्यातून मिळणारे बोध जर मुलांनी आपल्या आचरणात आणले तर भविष्यकाळात ही मुले नक्कीच ‘माणूस’ म्हणून चांगली घडतील. शरीरिक विकासाबरोबरच मुलांच्या मनाचा व बुद्धीचा विकास होणेही गरजेचे आहे. या गोष्टी नक्कीच त्यांच्या बहुअंगाने व्यक्तिमत्त्व विकासाला मदत करतील. वाचा Marathi katha ,मराठी कथा,Marathi Goshti,मराठी गोष्टी,marathi stories, stories,Marathi Inspirational Stories, Marathi Motivational stories.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  तिसऱ्या लुगड्याची गोष्ट : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

  १० मार्च सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी. त्यांच्या अपार कष्टामुळे आणि जिद्दीमुळे स्त्री-शिक्षणाला सुरुवात झाली. आज महिला साक्षर होऊन अनेक उच्च पद भूषवत आहेत ते सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच. अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित त्यांचीच ही एक छोटीशी गोष्ट- - सावित्रीबाई फुले यांचे नाव ठाऊक नाही अशी स्त्री सापडणे कठीण आहे. त्या तेव्हा होत्या म्हणून आज आपण आहोत हा विचार केलात ना प्रिय मुलींनो, तर विचारांच्या साऱ्या दिशा लख्ख उजळतील.ख्ख उजळतील.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  पतंग उडतो का? कसा?

  मकर संक्रांत आली की आकाशात पतंग उडताना दिसू लागतात. पण पतंग उडविण्यासाठी योग्य वेळ कोणती? पतंग उडतो कसा? त्यामागे कोणते विज्ञान आहे? पतंग आणि विमान या दोन्ही गोष्टींचे आकर्षण लहानथोर सर्वांनाच असते. दोन किंवा अधिक पतंगांची चढाओढदेखील आपले लक्ष खिळवून ठेवण्यास समर्थ असते. कोणाचा पतंग गोते खातोय, कोणाचा कटतोय किंवा कोणाचा उंच उंच जातोय हे महत्त्वाचे नसते, पण मनोरंजक असते.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  कालमापन

  शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात 'काळ' या शब्दाची नातीगोती जाणून घेऊया. दर महिन्याला नवनव्या शब्दांचा गोफ विणता विणता आपण नववर्षांत पदार्पण केलंसुद्धा. आणि या वर्षी आणखी नवे शब्द आणि त्यांच्या वेगवेगûया कथा घेऊन आपली शब्दयात्रा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. वर्ष म्हणजे १२ महिन्यांचा काळ, ३६५ दिवस, ८,७६० तास आणि ५,२५,००० मिनिटं. ३,१५००,००० सेकंद. एवढा मोठा काळ. दर चार वर्षांनी लीप वर्ष येतं आणि त्या वर्षांत मात्र एकंदर ३६६ दिवस असतात.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  स्पीकर शाळा

  मुख्याध्यापक शांताराम बारगजे यांनी शिक्षण खात्याकडून आलेलं परिपत्रक नजरेखालून घातलं. १५ जून २०२० पासून सर्व शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्यास सुरुवात करावी, असं त्या परिपत्रकात नमूद करण्यात आलं होतं. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रातील सर्व शाळा २२ मार्च २०२० पासून बंद होत्या. आपल्या शाळेतील मुलांना ऑनलाइन शिकवणं सुरू करायचं असेल तर कोणत्या अडचणी येतील व त्या अडचणी दूर करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यासंबंधी आपल्या शाळेतील शिक्षकांची मतं जाणून घ्यावी, म्हणून मुख्याध्यापक बारगजे यांनी सर्व शिक्षकांची बैठक आयोजित केली. बैठकीसाठी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांवरून मुख्याध्यापक बारगजे यांनी नजर फिरवली. सर्व शिक्षक सुरक्षित अंतर राखून बसलेले आहेत, याचं त्यांना समाधान वाटलं. त्यांनी शिक्षकांना परिपत्रक वाचून दाखवलं. ते म्हणाले, “ऑनलाइन शिकवण्यात काही अडचणी येतील व त्या दूर करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील, त्याबाबत तुमची मतं जाणून घेण्यासाठी मी ही बैठक बोलवली आहे.”

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  वक्त

  अम्मी, अब्बूंनी तुला आनंद व्हावा म्हणून हा रेडिओ दिला तसं आम्हांला बरं वाटावं म्हणून त्यांचा वेळ दिला असता तर... बाप-मुलींची ही छोटीशी हृद्य कथा खास फादर्स डे निमित्त- सकाळचे सात वाजले होते. जमादारांच्या घरात नेहमीप्रमाणे रेडिओची पिरपीर चालली होती. शन्नूबेन चपात्या लाटत होती. सारा आणि दानिया शाळेला जायची तयारी करत होत्या. चपात्या भाजता भाजताच शन्नू एका हाताने रेडिओचं बटण फिरवत होती.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  विज्ञानकथा सोन्याचा हार

  कलीमुद्दीन धावतधावतच असदखानाच्या दिवाणखान्यात शिरले. त्यांना पाहताच असदखान म्हणाला, “ आप आ गये कलीमुद्दीनसाहब?” “कैसे नही आते! आपका बुलावाही ऐसा था. मगर इतनी जल्दी क्या निकल पडी?ʼ” “सांगतो, सांगतो. इतरांनाही येऊ द्या.ʼ

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  छोटीशी चूक

  सोलापूरहून मुंबईला चाललो होतो. पहाटे पावणे पाच वाजता बस कुठल्याशा गावाजवळ थांबली. पहाटेची वेळ. मस्त गारेगार थंडी. कानाभोवती मफलर आवळून आम्ही पाच सहा माणसंच खाली उतरलो. दोन्ही हात खिशात घालून आणि अंग आखडून आम्ही इकडे तिकडे पाहात होतो. सगळ्यांना हवा होता गरमागरम चहा.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  उत्तमें ढमढमे पादे...

  शाळा सुटून दहाच मिनिटं झाली असतील किंवा नसतील. इवान धापा टाकत घरी आला. तडक संडासात घुसला. पोट जाम बिघडलं होतं. संडासातून बाहेर आल्यावर एकदम पाय दुखायला लागले. खाली वाकत पाय दाबत-दाबतच तो हॉलमध्ये आला तर आजी त्याला बघून हसायला लागली... “आज्जी, हसू नको नं गं. मी आजोबांची नक्कल करत नाहीये. खरंच! आपल्या ‘यलो रूम’ मधून आलोय. आज एकदम जोरात लागली म्हणून शाळा सुटल्या सुटल्या धावत घरी आलो. आता पाय पण दुखताहेत.’’

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  सदाशिव सैनिक होतो

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ही गोष्ट आहे. सदाशिव नावाचा एक खेड्यात रहाणारा मुलगा मामा-मामीच्या जाचाला कंटाळून घर सोडून निघाला. आई-वडील बिचारे कधीच मरून गेले होते. मामीच्या तोंडच्या शिव्यांची आणि शिळ्या चटणीभाकरीची फार लहानपणापासूनच सवय होती सदाशिवला. पण तो तरी किती सहन करणार? एके दिवशी आपल्या छोट्या मैत्रिणीला, सोनीला सांगून त्याने शिवाजीच्या सैन्यात दाखल व्हायचं ठरवलं आणि तिने लपवून- छपवून आणलेली शिदोरी खाकोटीला मारून सदाशिवराव गावच्या पाटलाचं मरतुकडं घोडं घेऊन (अर्थातच गुपचूप) सैन्यात भरती व्हायला निघाला.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  दे आर जीनियस

  विहान शाळेतून घरी आला ते उड्या मारतच. आईला कळेना की आज एवढा कसला आनंद झाला आहे. त्याच्या आनंदाचं कारण जेव्हा तिला समजलं तेव्हा तिला आनंदही झाला आणी काळजीही वाटली. विहानच्या आनंदाचं कारण होतं शाळेची सहल जाणार होती रायगडला. रायगड, प्रतापगड, पाचगणी आणि महाबळेश्वर आणि आपल्याला रायगडावर जायला मिळणार या बातमीतच विहानच्या आनंदाला पारावार नव्हता. तसा गेल्या वर्षी तो चौथ्या इयत्तेत होता तेव्हा त्याला छ. शिवाजी राजांचा इतिहास सांगितला होता तो त्याच्या इतिहासाच्या पुस्तकापेक्षा कितीतरी भारी होता.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  मंगळावर स्वारी

  आमचं अंतराळयान आता पृथ्वीपासून कितीतरी प्रकाशवर्ष अंतरावर पोचलं होतं. यानात आम्ही पाचजण होतो. मी स्वतः यानाचा कप्तान अपूर्व, आमच्या तब्येतीची काळजी घेणारा डॉक्टर अमेय शर्मा, खगोलवैज्ञानिक मधुरा अय्यर, रसायनशास्त्रज्ञ आशय गोडबोले, आणि जीवशास्त्रज्ञ अमृता जोशी. ज्या ग्रहावर माणसाला वस्ती करता येईल असा ग्रह शोधून काढायच्या मोहिमेवर आम्ही निघालो होतो.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  ‘पायरो’ मयूर

  रोहितने दोनच दिवसांपूर्वी विकत घेतलेली नवी फूटपट्टी त्याच्या स्कूलबॅगमधून गायब झाली होती. प्लास्टिकच्या फूटपट्टीवरची अक्षरं काही दिवसांनी पुसट होतात म्हणून रोहितच्या दादानं त्याला स्टीलची महागडी फूटपट्टी विकत घेऊन दिली होती. फूटपट्टीवर नेहमीचे आकडे होतेच, शिवाय गणिताची काही सूत्रं आणि इतरही उपयोगी माहिती होती. तशी पट्टी रोहितने कोणाकडेही याआधी पाहिलेली नव्हती.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  शपथ

  सूर्यप्रभा कॉलनीतील आठ-दहा मुले कॉलनी जवळच्या मैदानांत खेळून परत येत होती. “ए, रजत, नार्वेकर काका स्वाक्षरी देतील का रे?”- साहिलने विचारले. “त्यांच्यासमोर जाऊन स्वाक्षरी मागायची तुला हिंमत तर झाली पाहिजे !”- रजत म्हणाला. मैदानाच्या समोर रस्त्यापलीकडे श्रीमंती थाटाचे श्रीरंग अपार्टमेंट नुकतेच झाले होते. सध्या टी.व्ही.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  सदाशिवचा भन्नाट पराक्रम

  सदाशिव सैनिक कसा झाला, याची गोष्ट तुम्ही गेल्या महिन्याच्या वयम् मध्ये वाचली असेल. आता वाचा सदाशिवच्या पराक्रमाबद्दल- पावसाळ्याचे दिवस तोरणागडावर सदाशिवने मजेत काढले. जिऊमहाला त्याला तलवार चालवायला शिकवी. शिवाजीची आई जिजाबाई त्याच्यावर खूप प्रेम करायची. शिवाजी महाराजांचे सैनिक म्हणजे जणू सगळा एक परिवारच होता.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  श्रीमंती

  नंदूला ते सगळं एकदम भारी वाटलं. पक्या नि जावेद या दोघांबरोबर चालता चालता नंदूच्या मनात विचार आले, किती वेगळं आहे हे सगळं. भीती वाटतेय, पण मजाही वाटतेय. आता आपणही असे पैसे कमवणार... वाचा ही रोचक कथा !

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  कट्टी आणि बट्टी

  घरी आल्याबरोबर आशनाने दप्तर भिरकावून दिलं, बूट तसेच बाहेर टाकले, युनिफॉर्म तसाच उलटा गादीवर टाकला. ती सतत कशा ना कशावर चिडत होती, ओरडत होती. ही सगळी लक्षणं होती सपाटून भूक लागल्याची आणि अर्थात कशाचा तरी राग आल्याची. पण तिच्या पोटात काहीतरी गेल्याशिवाय ही काही नीट बोलणार नाही हे आईला माहीत होतं. ‘‘हे बघ आशू, पटकन खाऊन घे आणि मग मला सांग तुझं आणि आर्णाचं आज कशावरून वाजलं?’’

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  किती वजन

  “ममा, चल ना लवकर खाली.” शाळेतून आल्या आल्या अनिकाने लगेच परत बाहेर जायचा हट्ट धरला. मी इथे लॅपटॉपवर एका कामात अडकले होते. “कशाला गं?” स्क्रीनवरून नजर ढळू न देता मी विचारलं.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  खोटी गोष्ट

  इंट्रो- दोन्ही वेळा मी बोललो, ते खोटंच! का, कशासाठी? ते नाही सांगता येणार! पण दोन्ही वेळेला मला काय वाटलं ते मात्र तुम्हाला मनापासून माझ्या मनातलं खरं खरं सांगणारी ही गोष्ट! ))))))))))))) ‘लक्ष आहे का वेळेकडे?’ बाबा म्हणाले, तेव्हा मी पुस्तकातून वर पाहिलं. पावणेदहा झाले होते. शाळा पावणेअकराची असायची, त्यामुळे आंघोळ स्किप केली, तर अजून पंधराएक मिनिटं वाचत बसणं शक्य होतं. पण ते बाबांना कसं सांगणार?

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  गब्बू

  गब्बूचा चेहरा विचित्र आहे. त्याचं डोकं म्हणजे त्याला अगदी दुस-याच मुलाचं चिकटवल्यासारखं. हात, पाय चांगले गोरे गोंडस. मात्र डोळे, नाक, कपाळ, ओठ, कान काहीच कुठल्या प्रमाणात नाही... आधी विचित्र वाटलेला हा मुलगा बघता बघता आमचा मित्र झाला... ))))))))))) शुभंकर त्या बंगल्यात बॉल शोधायला गेला, त्याला २०-२५ मिनिटं झाली. त्याची वाट पाहत, या पायावर, त्या पायावर उभं राहून कंटाळा आला.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  ओझं

  तंबी दुराई’ म्हणून महाराष्ट्रातील वाचक ज्यांना ओळखतात, त्या मार्मिक लेखकाची ही मनस्वी गोष्ट - ओझं नेहा आणि रिया दोघीही स्कूटीवर होत्या. स्कूटर चालवण्याचं दोघींचंही वय नव्हतं. दोघीही यावर्षी दहावीत होत्या आणि शाळा, क्लास, अभ्यास यातच दिवस जात होते.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  अन् झिंगारो बदलतो..

  बनपाव श्वानाश्रमात दाखल होतो झिंगारो! स्वभावाने उनाड.. इतरांना त्रास देण्यात आनंद मानणारा... पण रुपेशसारखा गुणी डॉगी असण्याने तेथील इतर श्वान मित्र त्याला बदलवतात. खरा आनंद कशात असतो, हे त्याला समजावून सांगतात... एक धम्माल कथा! बनपाव श्वानाश्रमात झिंगारो आला तेच एकदम उसळ्या घेत, गुर्मीने इथे-तिथे पाहात, अगदी मोगॅम्बो स्टाईलनं!

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  नवा धडा...

  “आदू, आईला त्रास देऊ नकोस. आई आता अजिबात तुला उचलून घेणार नाही. जरा आईची काळजी तू पण घेत जा आता. दादा होणारेस ना,” बाबा आदूला समजावत होता. आई दुस-या बाळाला घेऊन येणार हे कळल्यापासून त्याला त्यासाठी तयार करायचे आदूच्या आईबाबांचे प्रयत्न सुरू होते. “पण म्हणजे आई आता मला कध्धीच उचलून घेणार नाही का रे बाबा.. आता फक्त बाळालाच घेणार ती?

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  मनात घर करून राहील अशी एका निरागस मुलीची ही कथा- आबली

  म्हात्रे गुरुजी दिसले तसं हातातील भगुलं जिथल्या तिथं टाकून आबली रानात पसार झाली. मेंढरामागे कोकरासारखी उंडारणारी ही पोर. गुरुजी कुठपर्यंत धावणार? घर म्हणावं तर तसं काहीच नव्हत तिथं. ना भिंतीचा आडोसा होता ना पालाचं झाकण होत. तीन दगडाची तेवढी चूल, कोंबड्यांचं डालंग, वागरीत बंदिस्त झालेली चार-पाच नवजात कोकरु, काही भांडीकुंडी, कंटाळ आणि बिछाना. उघड्यावर मांडलेला एवढाच काय तो पसारा होता तिथं.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  मी ‘पी’ बोलतोय…

  सध्या मंगळावर काम करत असलेला पर्सिव्हिअरन्स रोव्हर नेमका कसला शोध लावतोय? समजून घेऊया! हॅलो, मी ‘पी’ बोलतोय. थांबा, असं दचकू नका. ‘पी’ म्हणजे पर्सिव्हिअरन्स यांत्रव. होय, तोच तो, सध्या मंगळाच्या भूमीवर असणारा. ३० जुलै २०२० या दिवशी वसुंधरेचा निरोप घेऊन मी अवकाशात झेप घेतली आणि १८ फेब्रुवारी २०२१ या दिवशी मंगळावर उतरलो.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  जिद्दी येसबा

  छत्रपती शिवरायांनी गनिमांच्या विळख्यातून मराठी मुलूख सोडवून स्वराज्य स्थापन केलं. आणि त्याचं सुराज्य करण्यासाठी रयतेने त्यांना साथ दिली. त्यात केवळ वयानं मोठी माणसेच नव्हती, तर येसबासारखी जिद्दी मुलंही होती. मन अभिमानाने भरून यावं अशी ही इतिहासातील एका चिमुकल्याची जिद्दगाथा! मराठीत अगदी प्रथमच आणली आहे- प्रवीण दवणे यांनी... खास 'वयम्'च्या वाचक मित्र-मैत्रिणींसाठी.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  पुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत

  संक्रांतीच्या सणाला तिळगूळ खाता खाता या सणाचे शास्त्र समजून घ्या, ते मजेदार आहे! १४ जानेवारी म्हटलं की, आपल्याला आठवते ती मकर संक्रांत. दसरा, भाऊबीज, गणपती, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी इ. उत्सव किंवा सण आपल्या कॅलेंडरप्रमाणे वेगवेगळ्या तारखांना येतात; मग मकर संक्रांतच तेवढी जानेवारीला का येते, हा प्रश्न तुम्हांलाच नव्हे तर मोठ्यांनाही पडतो.

 • स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख.

  १२ जानेवारी ही स्वामी विवेकानंद यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील काही किस्से सांगणारा हा प्रेरणादायी लेख. एकदा संध्याकाळची वेळ होती. आकाशात चंद्रकोर चमकत होती. देवघरात मुले डोळे मिटून बसून होती. खोलीच्या कडेकडेने एक नाग सरपटत जात असल्याचे एका मुलाने पाहिले. तो घाबरून ओरडला. बाकीची मुलेही सापाला पाहून घाबरली.

 • श्रीनिवास रामानुजन

  श्रीनिवास रामानुजन

  गणितज्ज्ञ रामानुजन यांची आज जयंती आहे. यशाची बीजं बरेचदा बालपणातच दिसतात. रामानुजन शाळेत असतानाची गोष्ट! एके दिवशी शाळेतल्या गणिताच्या शिक्षकांना शिकवण्याचा अतिशय कंटाळा आला होता. विद्यार्थ्यांना अत्यंत अवघड काम द्यावं आणि आपण आराम करावा असा ‍विचार त्यांनी केला. १ ते १०० पर्यंतच्या आकड्यांच्या बेरजा मुलांना करायला लावून हे महाशय स्वस्थ बसले होते . पण त्या दिवशी आराम त्यांच्या नशिबातच नसावा! काही मिनिटांतच एक विद्यार्थी गुरुजींच्या जवळ येऊन म्हणाला, “गुरुजी, झालं माझं!” आता आश्चर्यचकित व्हायची वेळ गुरुजींची होती.

 • माझी पहिली चहाडी

  कोकणातल्या एका छोट्याशा गावात राहणारी पिंटी आणि तिचे दोन भाऊ यांच्या बालपणीच्या काळातल्या, म्हणजे १९८० च्या दशकातील मजेदार अनुभव-कथा सांगणारे डॉ. निधी पटवर्धन यांचे 'पिंटी’ हे नवे पुस्तक जरूर वाचावे, असे आहे. वाचा यातील एक कथा'
  आजी प्लास्टिकच्या जाड कागदावराच्या चिकोड्या सोडवत होती. मी पण तिला मदत करत होते. चिकवड्या सुकल्या की आपोआपच सुटत. न सुटणारी एखादी जाड चिकवडी पाठून ओलसर राहिलेली असे, ती मी गट्टम करत होते. आजी ओरडत होती, ‘पुरे झाली मदत.’ मी पुन्हा दोन चिकवड्या घेऊन पळ काढला. रुप्याला एक दिली.

 • चमचम गोष्ट

  परीच्या जगातील एक परीकथा....
  एक होती परी. तिचं नाव जरू. जरूचा एक मित्र होता, त्याचं नाव हिमान. जरू जशी परी होती तसा हिमान परा होता. त्यांची गंतच चालायची. दोघं आपल्या रंगीबेरंगी पंखांनी उड उड उडायचे. खेळायचे. वेगवेगळ्या आकाराच्या ढगांना शिवायचे. त्यांच्यावर बसायचे. त्यांच्याशी स्पर्धा सुद्धा खेळायचे. पाऊस भरलेल्या ढगांध्ये गेल्यावर मज्जा यायची. त्यातलं पाणी जमिनीवर पडायच्या आता जरू आणि हिमान त्यात खेळायचे. सकाळ होत आली, फुलं उमलली की दोघं आपल्या

 • पार्सल

  निरागस अलफाज आणि त्याचे प्रेमळ व समजूतदार अम्मी-अब्बू यांची ही तरल गोष्ट- शाळा सुटली आणि अलफाज घरी आला. दप्तर ठेवलं आणि हात पाय धुऊन खेळायला पळाला. आज मॅच ठरली होती गावातल्या पोरांशी... आज त्यांना हरवायचंच, असं सगळ्या गॅंगने ठरवलं होतं. अलफाज बेस्ट बॅटसमन होता... हमखास मॅच जिंकून देणारा. तो घाईतच गेला. जाता जाता त्याला अब्बू येताना दिसले. ते पार थकून गेलेले भासत होते. आज जास्त टपाल असणार. अलफाजचे अब्बू पोस्टमन होते. त्यांना पत्र वाटण्यासाठी तीन-चार गावात फिरावं लागे. अलफाजने अब्बुना ‘खेळायला जातो’ असं सांगितलं आणि तो पळाला.

 • नवा धडा

  खरं तर पालक मुलांना घडवतात पण कधी कधी ही लहान मुलंही आपल्याला नकळतपणे बरंच काही शिकवून जातात....

  “आदू, आईला त्रास देऊ नकोस. आई आता अजिबात तुला उचलून घेणार नाही. जरा आईची काळजी तू पण घेत जा आता. दादा होणारेस ना,” बाबा आदूला समजावत होता. आई दुसऱ्या बाळाला घेऊन येणार हे कळल्यापासून त्याला त्यासाठी तयार करायचे आदूच्या आईबाबांचे प्रयत्न सुरू होते.

  “पण म्हणजे आई आता मला कध्धीच उचलून घेणार नाही का रे बाबा.. आता फक्त बाळालाच घेणार ती? “ आदूला अजूनही नेमका अंदाज येत नव्हता की, मग आपण आईचे लाडके असणार की नाही ?

 • मुंगेरीचा उलटा चष्मा

  हिरव्या सुंदर वनराईची काळजी न घेणाऱ्या माणसाच्या जगातला उलटा चष्मा प्राण्यांच्या जगात पोहोचला. हुप्प हुप्प करीत धमाल करणाऱ्या मुंगेरीची ही गोष्ट. हसवेल आणि विचारही करायला लावेल-

  सगळ्या नातवंडात मुंगेरी अगदी द्वाड ! आजी-आजोबा मेटाकुटीला येत मुंगेरीला समजावता समजावता. मुंगेरीचे आई-बाबा लेकरांसाठी आणि त्यांच्या आजी-आजोबांसाठी कुठे फळं मिळतात का ते बघायला कोवळ्या उन्हाचं बोट धरूनच बाहेर पडत नि नाना-नानींवर मुंगेरी व चंदेरीला सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडे. चंदेरी ही अक्षरशः गुणी मुलगी होती. सक्काळीच आई-बाबांनी शिकवलेल्या नव्या धड्याचा ती सराव करीत असे. छोट्या फांदीवर तोल सावरून कसं बसायचं, एका फांदीवरून दुस-या फांदीवर झुपकन् उडी कशी मारायची, जाळीतून कोवळी करवंद काढताना हाताला काटा कसा लागू द्यायचा नाही; माणसांनी टाकलेल्या पुडीतल्या शेंगदाण्याऐंवजी –नव्यानं येणा-या कैरीचा आंबटपणा कसा गोड मानायचा असा सगळा सराव नाना-नानींच्या देखरेखीखाली छान करायची.

 • आगळे गुरुपूजन

  आईला अभ्यासाला लावून तिला परीक्षा द्यायला लावणाऱ्या मुलीची गोष्ट- तास संपल्यावर कामतबाई टीचर्सरूममधे गेल्या तेव्हा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वर्गातील पल्लवी दबकतच त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. “बाई एक विचारू?”.....पल्लवीने हळूच विचारले. “अगं विचार की.” बाई “बाई शाळेत येऊ न शकणाऱ्याना १०वीची परीक्षा कशी देता येईल? त्यासाठी काय करावे लागेल?” पल्लवीने विचारले. “का ग... अजून १०ची वर्ष सुरू झाले नाही तोच हा प्रश्न कुठून आला तुझ्या मनात? कुणाला बसायचेय परीक्षेला? बाईनी विचारले. “माझ्या आईला १०वीच्या परीक्षेला बसायचंय” ...तिच्या उत्तराने बाई क्षणभर चकित होऊन तिच्याकडे बघतच बसल्या.

 • घरच्या घरी कल्पक राख्या!

  रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘वयम्’ मासिकाने घरातील गोष्टींपासून राख्या कशा बनवता येऊ शकतील, याच्या काही कलाकृती उदाहरणादाखल पाठवल्या होत्या. मुलांनी स्वतः घरच्या घरी बनवलेल्या राख्यांचे फोटो आणि दोन ओळीत कृती लिहून ‘वयम्’कडे पाठवण्याचे आवाहनही केले होते. या आवाहनाला मुलांनी छान प्रतिसाद दिला. आपल्या काही वाचक मुलांनी घरातील साहित्यापासून कितीतरी कल्पक राख्या बनवल्या. बघा, कल्पक वयम् वाचकांच्या या राख्या!

 • Aatmaroop Ganesha

  Ganapati, our beloved deity, is known by the different names and forms. Let’s try to explore more about it..

  Friends, Ganesh Chaturthi festival is just round the corner. Lord Ganesha is one “form” of God who is not just worshipped but is loved all-over. Throughout the year, we await His arrival in our homes. So, on this auspicious occasion, let us explore the different names and forms of our beloved deity.

 • राष्ट्रीय प्रतिज्ञा कोणी लिहिली ?

  १५ ऑगस्टला झेंडावंदन करताना आपण आपली प्रतिज्ञा म्हणतो. ही प्रतिज्ञा कोणी लिहिली, माहितीये? वाचा, वयम् मासिकात २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख, आज पुन्हा!
  देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सुरुवातीलाच 'प्रतिज्ञा’ असते. आपण रोज ती म्हणतो. ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? कधी लिहिली? ती केव्हापासून देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली? या लेखकाने संशोधन करून ही माहिती मिळवली. वाचा तर, कोण आहेत आपल्या प्रतिज्ञेचे जनक!

 • हिरवाईत लपलेली रंगीत दुनिया

  पाऊस पडला की अगदी आठवड्याभरातच आपल्या आजूबाजूचं चित्र हिरवंगार होतं. कवी ना. धों. महानोरांच्या भाषेत सांगायचं तर ‘आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा!’ मग हे सृष्टी लावण्य खुलतं कसं? हे समजून घेऊया जिल्पा निजसुरे यांच्या लेखातून!'वयम्' मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख वाचा आणि तुम्ही काय काय नवीन पाहिलंत ते जरूर कळवा-

 • रात्री उडणारे ‘पतंग'

  दि.१८ ते २६ जुलै हा आठवडा भारतात National Moth week म्हणून साजरा होत आहे. फुलपाखरांचे चुलतभाऊ म्हणता येतील अशा पतंगांच्या जगाची आम्हांला ( मी आणि युवराज गुर्जर Yuwaraj Gurjar) ओळख झाली, ती येऊरला अचानक दिसलेल्या अॅटलास मॉथ मुळे. डॉ. अरूण जोशी आणि आयझॅक किहीमकर Isaac Kehimkar हे आमचे सुरुवातीचे मार्गदर्शक. जानेवारी २०१५ मध्ये 'वयम्' मासिकासाठी संपादिका शुभदा चौकर यांनी मला संक्रांत विशेषांकात 'पतंगां'वर लेख लिहायला सांगितला, तो लेख म्हणजे- ‘रात्री उडणारे पतंग’. ‘राष्ट्रीय 'पतंग' महोत्सव २०२०’च्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचकांसाठी आम्ही शेअर करतोय

 • खमंग सुगंध मातीचा!

  गंध आणि आठवणी याचं एक छान नातं आहे. हा गंध बसल्याजागी आपल्याला स्थळ-काळ कोणत्याही मर्यादेशिवाय कुठेही घेऊन जातो. आठवा बघू तुम्हाला जुन्या आठवणी करून देणारे वेगवेगळे गंध! एक गंध तर सगळ्या मुला-माणसांना धुंद करतो तो म्हणजे पहिल्या पावसानंतर पसरणारा मातीचा गंध... त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचू या पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांचा लेख! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख आज या नव्या माध्यमात प्रसिद्ध करत आहोत.

  पहिल्या पावसात भिजताना मातीचा सुवास अनुभवलाय तुम्ही? त्याला म्हणतात मृद्गंध. मृदा म्हणजे माती. मातीच्या हा गंध छान खमंग असतो.

 • थेंबू आला भेटीला

  गेले काही दिवस पावसाने जवळपास पूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावून सगळं वातावरण गारेगार केलंय. पण पाऊस नक्की पडतो तरी कसा? आपल्याला सांगतोय थेंबू! हो हो थेंबू ! थेंबूची ही छानशी गोष्ट. या थेंबूला आपल्यासाठी बोलका केलाय ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके यांनी! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख खास बाल-किशोरांना वाचायला पाठवत आहोत.

  मित्रांनो, मी आलोSSS मी... पावसाचा थेंब!

 • पाठ्यपुस्तकांचा इतिहास!

  काय, नवीन पाठ्यपुस्तकं पाहिलीत का? शैक्षणिक वर्ष सुरू झालं की पाठ्यपुस्तकं पाहायची ओढ लागते ना? यंदा तर अजून शाळा सुरू नाही झाल्या, पण पाठ्यपुस्तकं मात्र वेळेत आली. पाठ्यपुस्तक या प्रकारचा शोध कधी, कुणी लावला, पहिलं पाठ्यपुस्तक कधी प्रसिद्ध झालं, माहितीये?... 'वयम्' मासिकाच्या जुलै 2014 अंकात प्रसिद्ध झालेला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांचा हा लेख आज मुद्दाम तुम्हाला वाचायला देत आहोत.

  'नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडायचा' हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं/ऐकलं असेल. आत्ता प्रौढ असणाऱ्या अनेकांसाठी 'नवं पुस्तक' म्हणजे 'पाठ्यपुस्तक'च असायचं. कारण बाकी इतर कोणती पुस्तकं हातात पडायचीच नाहीत. शाळेत जाऊन साक्षर झालेल्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचं स्थान असलेली पुस्तकं म्हणजे पाठ्यपुस्तकं!

 • ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!'

  यंदा करोनाच्या काळात सर्वत्र ताळेबंदी असूनही SSC बोर्डाची पाठ्यपुस्तके वेळेत तयार झाली. ती वेबसाइटवर आली. काही मुलांच्या हातातही आली. पाठ्यपुस्तक हे शालेय अभ्यास शिकण्याचं महत्त्वाचं माध्यम! पाठ्यपुस्तकं कोण, कशी तयार करतं? जाणून घेऊया? ‘वयम्’ मासिकाच्या जुलै 2014च्या अंकातला लेख आहे हा! ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!'

  “स्थायू, द्रव आणि वायू अशा पदार्थाच्या तीन अवस्था आहेत. पेटलेली मेणबत्ती स्थायू अवस्थेत असते, तिच्यापासून ओघळणारे मेण द्रव अवस्थेत, तर ज्योतीतील जळणारे मेण वायू अवस्थेत असते…’

 • ‘वयम्’च्या अनुभव लेख उपक्रमावर आधारित शैक्षणिक लेख, आज 'महाराष्ट्र टाइम्स'च्या संपदकीय पानावर

  पाठ घेण्यापेक्षा पाठबळ द्या !

  सध्या मुलांच्या शाळा निदान ऑनलाइन पद्धतीने सुरू व्हाव्या, असा अट्टहासी सूर आळवला जात आहे. करोना-काळात जणू मुलांचे शिक्षण थबकले आहे आणि शिक्षण-विरहित पोकळीत ती जगत आहेत, अशी चिंता काहींना वाटत आहे. खरोखरच अशी स्थिती आहे का? प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी मुलांचे शिकणे बंद पडले आहे का? या काळात अनेक मुलांनी नव्या क्षमता कमावल्या, नवी कौशल्ये आत्मसात केली, त्यांना नव्या जाणिवा झाल्या- ही शक्यता आपण लक्षात का घेत नाही?

  येनकेन प्रकारे शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील पाठ मुलांसमोर सादर केले तरच शिक्षण होते, या गृहीतकापलीकडे आपण शिक्षणाचा विचार केला तर नव्या शक्यता लक्षात येऊ शकतात. अगदी पाठ्यपुस्तक या महत्त्वाच्या व मूलभूत शिक्षण-साधनाला प्रमाण मानूनही मुलांना शिकण्यासाठी चालना देण्याच्या अनेक नव्या शक्यता आपण या काळात आजमावू शकतो.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 16

  तीव्र संवेदनशीलता

  नवनवीन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही? मुलांना तर वेगवेगळं, चटकदार खायला हवच असतं ना! मात्र सध्याच्या परिस्थितीत आपण गरजा आणि चैन यांतील फरक समजून घेतला पाहिजे, याची जाणीव या मुलांनाही लख्खकन् झाली! मुलांची संवेदनशीलता किती तीव्र आहे बघा!! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या...

  आज वाचा भाग- 16.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 15

  संयमाची रुजवण

  मुलांना पाहिजे तेव्हा पाहिजे ते मिळण्याची सवय बहुतांश घरांतून लागलेली असते. लॉकडाउनमुळे त्यांना जाणीव झाली की, आपल्याला जे जे हवेसे वाटतेय ते आत्ता मिळू शकणार नाही. आहे त्यात समाधान मिळवावे लागेल. कौतुक हे, की मुलांनी हाही धडा आनंदाने आत्मसात केला या काळात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुले लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या...

  आज वाचा भाग- 15.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 14

  शिस्तशीर मुलांना सलाम!

  “आजच्या पिढीला शिस्त नाही,” असा आरोप मोठी माणसं अनेकदा करतात. हा आरोप सपशेल खोटा पाडलेली अनेक मुलं भेटली आम्हांला... अर्थात त्यांच्या पत्रांतून! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा, या मुलांनी गेल्या दोन महिन्यांत किती गोष्टी करून पाहिल्या... त्याही अगदी शिस्तीत! कोण म्हणू धजेल की आजची मुलं बेशिस्त आहेत?

  आज वाचा भाग- 14.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 13

  बेगमीचा काळ !

  करोना सुट्टीच्या काळात बच्चे कंपनी पापड, शेवया असे बेगमीचे पदार्थही बनवू लागली. मुळात बेगमी म्हणजे काय, ती का करायची, हे या काळाने शिकवले त्यांना! आणि घरच्यांशी मनसोक्त गप्पा मारण्यातून त्यांना कितीतरी नव्या जाणिवा झाल्या... हीही बेगमीच, त्यांना पुढच्या आयुष्यात पुरेल अशी!!

  …‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात एव्हाना शेकडो मुले लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.

  आज वाचा भाग- 13.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 12

  घरोघरी छोटे शेफ!

  स्वयंपाकघर ही एक महत्त्वाची प्रयोगशाळा. पण व्यग्रतेमुळे मुलांना या घरच्या शाळेत वावरायला वेळही नसतो आणि वावही नसतो. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे मुलांचे पाय स्वयंपाकघरात खेचले गेले. लुडबूड करता करता ही मुले किचन चॅम्पियन झाली की! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात जी शेकडो मुले लिहिती झाली, त्यांतील अनेकांनी त्यांच्या ‘शेफ’गिरीबद्दल लिहिलंय!

  आज वाचा भाग- 12.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 11

  एरव्ही दुर्मीळ असलेला वेळ मिळाल्यावर मुलं बारीक निरीक्षण करतात. अनोखे अनुभव मनापासून उपभोगतात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. आज वाचा भाग- 11.

 • बुध व शुक्राचे सुरम्य दर्शन

  बुध व शुक्राचे सुरम्य दर्शन
  श्री. हेमंत मोने

  शुक्रवार दि. 22 मे 20 रोजी सायंकाळी पश्चिमेकडे बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचे एकमेकांजवळ दर्शन होईल. त्या दिवशी संध्याकाळी 7.10 वा. सूर्यास्त होईल.शुक्र खूपच तेजस्वी असल्यामुळे सुर्यास्तानंतर 5—10 मिनिटांतच दिसू लागेल. त्यानंतर 7.35 चे सुमारास संधिप्रकाशाचा प्रभाव कमी होईल आणि मग शुक्राच्या डाव्या हातास (दक्षिणेस ) सुमारे एक अंशावर बुध ग्रह व्यवस्थित दिसेल. या दोन ग्रहांची युती मृग नक्षत्रात होत आहे.मृगातील काक्षी (Betalguse ) हा लाल तारा, सारथी तारका पुंजातील अग्नी (Elnath) व रोहिणी (Aldeberan) यांच्या त्रिकोणात शुक्र आणि बुधाचा मुक्काम असेल.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 10

  विस्मृतीतील कलांची ओढ !

  मोकळा वेळ ही पर्वणी वाटलीये मुलांना. शाळा, होमवर्क, ट्यूशन क्लास यांनी गच्च झालेल्या दिवसांत मुलांना छंद जोपासायला वेळच मिळत नाही. भरतकाम, शिवणकाम, बागकाम या कला तर फार मागे पडतात. करोनाच्या सुट्टीत काही मुले या विस्मृतीतील कलांकडे वळली. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमामुळे ही मुले लिहिती झाली. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.

  आज वाचा भाग- 10.

 • तीन ग्रहांचे दर्शन

  ‘वयम’ वाचकांनो, पहाटे उठून जरा आकाशात बघा. गुरु, शनी व मंगळ सध्या आपल्याला सहजपणे दर्शन देत आहेत. पहाटे 5 चे सुमारास एकाच वेळी आकाशात तीन ग्रहांचे सुंदर दर्शन होते आहे. त्यासाठी द्विनेत्री, दुर्बिण अशा कोणत्याही साधनाची जरुरी नाही. आपले डोळे त्यासाठी समर्थ आहेत. आता हे ग्रह कसे पहायचे ते सांगतो. पहाटे 5 ते 5.30 ही वेळ सर्वात उत्तम. दक्षीणेकडे तोंड करा. तुमच्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे (पश्चिमेक्डून पूर्वेकडे ) क्रमाने गुरु, शनी व मंगळ यांचे दर्शन होईल. गुरु या तिघांमध्ये तेजस्वी आहे. गुरु—शनी एकाच नजरेत येतात. या दोघांपासून मंगळ डाव्या हातास (पूर्वेकडे) थोडा दूर आहे. मंगळवाऱ दि. 12 ते शनिवार दि.16 पर्यंत निरीक्षण केल्यास आकाश दर्शनाबरोबरच चंद्राचे सरकणेही लक्षात येईल. या काळात ग्रहांच्या स्थितीत लक्षात येण्यासारखा कोणताच बदल होणार नाही. मंगळवाऱ दि. 12 च्या पहाटे चंद्राजवळ गुरु व शनी सहज ओळखता येतील. बुधवार दि. 13 रोजी चंद्र शनीच्या जवळ पोहोचलेला असेल. गुरुवार दि.15 रोजी चंद्र मंगळाला भेटेल. शुक्रवार दि. १६ रोजी चंद्राच्या रेषेत उजवीकडे (पश्चिमेस) अनुक्रमे मंगळ, शनी आणि गुरु यांचे सुरम्य दर्शन होईल.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 9

  घरच्या घरी, कित्तीतरी! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 9 मध्ये मुलांच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका? आज वाचा भाग- 9.

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 8

  घरच्या घरी, कित्तीतरी! घरी असतानाही खूप काही शिकता येतं, याचे धडे या काळाने मुलांना दिले. मुलांनी घराची प्रयोगशाळा केली आणि पापड, केकपासून सॅनिटायझरपर्यंत काय काय करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 8 मध्ये मुलांच्या मनमुराद प्रयोगांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 7

  मदत घेण्याची कला!

  अचानक भरपूर वेळ मिळाल्यावर तो कारणी लावण्यासाठी कोणाची मदत घ्यायची हे, ही मुलं न शिकवता शिकली. आपले शिक्षक, आजी-आजोबा, दादा-ताई, शिबिर किंवा क्लब चालवणारी त्यांच्या जिव्हाळ्याची व्यक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हात धरून त्यांनी नवं काहीतरी करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 6

  मुलं वाचत नाहीत.. त्यांना अभ्यास नकोसा वाटतो... ही गृहितकं चुकीची आहेत. निदान ‘वयम्’ मासिकाशी निगडित असलेली मुलं तरी छान वाचतात, स्वतः स्वतःला हवं ते आवडीने शिकतायत. त्यासाठी मनापासून अभ्यास करतात. संधी, वेळ आणि वाव मिळताच ही मुलं किती काय काय करताहेत, बघा! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 5

  मुलांना एरव्ही मोकळा वेळ मिळणे दुर्मीळ झाले आहे. शांत, निवांत वेळ मिळताच ही मुले किती वेगवेगळ्या गोष्टी करून पाहतात, बघा. वयम् वाचक मुलांच्या अनुभव-लेख मालिकेचा हा 5वा भाग!

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 4

  वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, ही अनुभव-मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 3

  वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, तुम्ही ही अनुभव-मालिका?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 2

  करोना विषाणूमुळे घरातच वेळ घालवत असताना आपण किती वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो, हे मुलांकडून समजून घेण्यासारखे आहे. रोजच्या रोज ‘वयम्’च्या वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहेत. सिंधुदुर्ग ते गडचिरोली अशा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-पश्चिम सीमाभागांतूनही मुलांचे अनुभव-लेख आले आहेत. या संभ्रम-काळाबद्दल वाटणारी हुरहूर, चिंता आपल्या लेखनातून ही मुलं प्रकट करत आहेत. रडत, कंटाळत न राहता त्यांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे. त्यांचे अनुभव, नव्या जाणिवा त्यांच्याच शब्दांत, पण थोडक्यात समोर ठेवणारी ही अनुभव-मालिका.. वाचताय ना?

 • ‘वयम्’च्या मुलांचे सुट्टी अनुभव – भाग 1

  घरोघरीची मुले सध्या घरी आहेत. यंदा करोना विषाणूमुळे अचानक मिळालेली सुट्टी शिवाय सर्व कुटुंबीयही घरी, अशा या काळात मुलांनी काय नवे अनुभव घेतले, त्यांना कोणत्या नव्या जाणिवा झाल्या, हे जाणून घेण्यासाठी ‘वयम्’ मासिकातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजच्या रोज ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख वाचायला मिळत आहे. त्यात संभ्रम-काळाबद्दल मुलांच्या मनात निर्माण झालेल्या विविध भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात हुरहूर, काळजी, चिंता अशा भावना स्वाभाविकपणे प्रकट झाल्या असल्या तरी बहुतांश मुलांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे.

 • शंकू ते मेंदू – आपला रंगप्रवास

  इंट्रो - मानवी डोळ्यांना रंग नेमके कसे ओळखता येतात, यावर आतापर्यंत बरीच संशोधने झाली आहेत. काही संशोधने चालू आहेत. त्या संशोधनांतून कितीतरी रंगतदार शोध लागले आहेत... आपल्या जीवनात रंगच नसते, सगळं काही काळं-पांढरं असतं तर किती कंटाळवाणं झालं असतं, नाही का ! नशीब, आपल्या सभोवतालीच निसर्गानेच किती रंगांची लयलूट केली आहे. सरत्या पावसाच्या संध्याकाळी आभाळात दिसणारी इंद्रधनूची कमान त्यावरील ता ना पि हि नि पा जा किंवा VIBGYOR आपण आनंदाने पाहू शकतो कारण आपले डोळे आणि त्यांना आज्ञा देणारा मेंदू !

 • नैसर्गिक रंगात रंगलो आम्ही!

  रंग कोणाला नाही आवडत ? होळी, दहीहंडी अशा सणांवेळी आपण मोठ्या प्रमाणात रंगांशी खेळतो. पण हे रंग बनतात कसे? काही वेळा हे रंग अपायही करतात. मग कोणते रंग चांगले? वाचा मार्च २०१६ च्या ‘वयम्’ अंकातील उद्योगभेटीचा वृत्तान्त - रंगात रंग कोणता? म्हणजेच Colour colour which colour? हा खेळ आपण तुम्ही खेळलाय? हा खेळ खेळताना जो रंग आपल्याला शोधायला सांगितला आहे तो रंग शोधायला आपण आपल्या आजूबाजूला पळतो आणि तो रंग सापडला की त्याला हात लावून धरतो. तो रंग शोधेपर्यंत जो आउट होईल त्यावर राज्य येते. यावेळी निसर्गातील अनेक रंगाची जणू उजळणीच चाललेली असते.

 • रंगांची बेरीज-वजाबाकी

  सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी गर्रकन फिरवली की, हा पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र काळाकुट्ट रंग होतो. असे का? आपल्याला रंग कसे दिसतात?.. वाचा हा लेख - “आई, असं का होतंय?” नीलने आईला ओढतच बाल्कनीत नेलं. “इथे बघ! आम्ही ही सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी बनवली. ती रंगवताना आम्ही बशीत त्या साती रंगांचे वेगवेगळे ठिपके घोटवले होते. आता ही भिंगरी गर्रकन फिरली की, हा असा मस्त पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र हा बघ असा काळाकुट्ट रंग झाला.” “असं का झालं, काकू?” नीलच्या मित्राला, अर्णवलाही, हाच प्रश्न पडला होता.

 • अग्नि-उत्सव!

  शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात ‘होळी’ आणि ‘अग्नी’ या शब्दांची नातीगोती जाणून घेऊया. `होळी रे होळी पुरणाची पोळी’, `आयी होली आयी, सब रंग लायी’ या अशा ओळी वाचून गेल्या वर्षी साजऱ्या केलेल्या होळी या सणाच्या कितीतरी आठवणी मनात जाग्या झाल्या असतील ना तुमच्या ? आणि आता तुम्हाला होळी पेटल्यावर तडतडतडतड वाजत आसमंताला भिडणाऱ्या आगीच्या ज्वाळा, होळीच्या गरम गरम हाळा, होळीत टाकलेल्या नारळाच्या खमंग भाजक्या खुरड्या मस्त स्वादिष्ट पुरणपोळी तुमच्या बरोबरीने काकामामांनी ठोकलेल्या आरोळ्या आणि मारलेल्या बोंबा आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या रंगांनी रंगवलेली बाळगोपाळ दोस्त मंडळी.

 • प्राण्या तुझा रंग कसा ?

  इंट्रो - प्राण्या-पक्ष्यांचे रंग किती वेगवेगळे असतात ना? रोहित पक्षी (फ्लेमिंगो) छान गुलाबी का? मोराचा मूळ रंग म्हणे तपकिरी असतो पण आपल्याला तर तो मोरपिशी दिसतो... असे का?
  प्राण्या तुझा रंग कसा ? आणि प्राण्या तो असा का ? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधताना या पृथ्वीवर असणाऱ्या विविध सजीवसृष्टीत निसर्गाने किती विचारपूर्वक रंगांची उधळण केली आहे, ते लक्षात येते. प्राण्यांच्या अंगावर दिसणारे रंग हे त्यांच्या कातडीत, केसात, लवेमध्ये किंवा पिसांत असणाऱ्या रंगद्रव्यामुळे दिसतात.

 • रंगांची ओळख

  इंट्रो- आपण रंग कसे काय ओळखू शकतो? आपल्या शरीरात अशी कोणती यंत्रणा आहे, जी आपल्याला रंग ओळखायला मदत करते? रंग ओळखणे ही काही सोपी क्रिया नाही. नीट समजून घ्या हं. या शास्त्रज्ञ काकानी आपल्याला खूप सोपं करून सांगितलय हे विज्ञान. आपल्याला रंग कसे शिकवले जातात? तर हिरवा रंग गवताचा. म्हणजे तर गवत ज्या रंगाचं असतं तो हिरवा. पण मग पोपटाचाही हिरवाच कसा, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. कारण त्या दोन रंगांमध्ये फरक असतो. तेव्हा रंगांची ओळख पटायची तर त्या रंगांचा अनुभव त्याला घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांनी तो रंग पाहिल्याशिवाय त्याची ओळख पटणं तसं कठिणच आहे.

 • सत्याचा शोध

  मित्रांनो, आपल्या सार्‍या भारतीयांसाठी फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे. याचं कारण याच महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. दरवर्षी त्या दिवशीचं म्हणून एक घोषवाक्य जाहीर केलं जातं आणि त्या दिवशी देशभर होणारे कार्यक्रम त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं केले जातात. या कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, विविध संशोधन संस्था यांच्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक भाग घेतात. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून.

 • साहित्यातील कोलंबस!

  ज्यांच्या नावाचा एक तारा अथांग तारांगणात अक्षय विराजमान आहे असं एक

  आदरणीय नाव - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. अर्थात –‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर. जनमानसातले तात्यासाहेब! कवी, साहित्यिक अनेक असतात; पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू.