सत्याचा शोध

 • सत्याचा शोध

  By Admin, On 28th Feb 2020, Children Magazine

  मित्रांनो, आपल्या सार्‍या भारतीयांसाठी फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे. याचं कारण याच महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. दरवर्षी त्या दिवशीचं म्हणून एक घोषवाक्य जाहीर केलं जातं आणि त्या दिवशी देशभर होणारे कार्यक्रम त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं केले जातात. या कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, विविध संशोधन संस्था यांच्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक भाग घेतात. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून. भारताचे नोबेल पारितोषिक मिळवणारे थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी दि. २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी कलकत्ता येथील 'इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' या संस्थेत आपल्या संशोधनाची घोषणा केली. हे संशोधन 'रामन परिणाम' म्हणून ओळखलं जातं. याच संशोधनाबद्दल रामन यांना १९३० साली नोबेल पारितोषिक मिळालं. रामन यांच्या या संशोधनकार्याचं स्मरण कायम राहावं, त्यांच्या ध्येयनिष्ठ आणि विज्ञानालाच वाहून घेतलेल्या जीवनापासून नवीन पिढीला स्फूर्ती मिळावी, यासाठीच दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशी सूचना ‘नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन' (एनसीएसटीसी) या संस्थेनं भारत सरकारला केली आणि भारत सरकारनं ती मान्य केली. तेव्हापासून दरवर्षी २८ पेâब्रुवारी हा ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून देशभर साजरा करण्यात येतो.

  रामन यांच्या कार्यापासून नव्या पिढीला मूलभूत संशोधनाकडं वळण्याची प्रेरणा मिळावी, हा एक उद्देश हा दिवस साजरा करण्यामागं आहेच, पण त्याशिवाय पाच उद्दिष्टं निश्चित करण्यात आली आहेत. ती म्हणजे –

  १. सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्‍या विविध वैज्ञानिक गोष्टींचं महत्त्व उलगडून सांगणं आणि त्या आपल्या जीवनात किती अर्थपूर्ण ठरत आहेत, याची जाणीव करून देणं.
  २. सकल मानवाच्या कल्याणासाठी विज्ञानाच्या विविध क्षेत्रांत केले जाणारे प्रयत्न आणि त्यात आलेलं यश उलगडून सांगणं.
  ३. विज्ञानाच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करणं आणि विज्ञानाच्या विकासाशी संबंधित सर्व प्रश्नांची चर्चा करणं.
  ४. देशातल्या ज्या नागरिकांचा कल विज्ञानाकडं झुकलेला आहे, अशा लोकांना आवश्यक त्या संधी उपलब्ध करून देणं.
  ५. लोकांना विज्ञानाभिमुख बनण्यासाठी उत्तेजन देणं आणि विज्ञान-तंत्रज्ञान समाजात लोकप्रिय करणं.

  ही उद्दिष्टं साध्य करण्यास मदत करतील असेच कार्यक्रम त्या दिवशी आखले जातात आणि ते केलेही जातात. त्यामध्ये विविध विषयांवरची व्याख्यानं, विज्ञानविषयक चित्रपट, विज्ञानाशी संबंधित प्रदर्शनं, रात्रीच्या वेळेस आकाशदर्शन, विज्ञानविषयाशी संबंधित वादविवाद स्पर्धा आणि सामान्यज्ञानाशी संबंधित प्रश्नमंजुषा असे अनेकविध कार्यक्रम होतात. शिवाय ज्या संस्था समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करतात आणि समाजाच्या सर्व थरांमध्ये विज्ञानाचा प्रसार करतात, अशा संस्थांना या दिवशी पारितोषिक देऊन त्यांचा गौरव केला जातो.

  आपला भारत देश सर्वार्थानं संपन्न आणि बलवान व्हायचा असेल तर या देशातल्या प्रत्येक नागरिकानं विज्ञानाचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. एकविसाव्या शतकात जगातल्या सर्व लोकांना एकत्र आणू शकेल अशी एकच शक्ती आहे आणि ती विज्ञानामध्ये आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणूनच आपल्याला कायम भान हवं, ते वर्तमानातल्या वैज्ञानिक घडामोडींचं आणि नजर हवी भविष्याच्या पोटात दडलेल्या संभाव्य वैज्ञानिक घडामोडींकडे! आताचं युग हे ज्ञाननिष्ठेचं आहे, याचंही भान आपण ठेवणं गरजेचं आहे. ज्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो, ते सी. व्ही. रामन स्वतः तसेच होते. त्यांच्या आयुष्याकडे अगदी धावती नजर टाकली तरीसुद्धा ही गोष्ट आपल्या लक्षात येते. विज्ञानाच्या संदर्भात रामन यांनी आपल्याला फार मोलाचं असं सांगून ठेवलं आहे. ते म्हणतात, 'विज्ञान म्हणजे दुसरं, तिसरं काही नसून तो एक सत्याचा घेतला जाणारा शोध आहे. हे सत्य केवळ भौतिक जगातलंच नाही, तर तर्कशास्त्र, मानसशास्त्र यांसारख्या गोष्टींतलाही आहे. त्यातील सत्य हुडकणं म्हणजे विज्ञान. जे असत्य आहे, खोटं आहे, ते नाकारण्याची तयारी असणं, ती शक्ती असणं हेच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचं वैशिष्ट्य आहे. असत्याला कवटाळून बसणं साफ चूक आहे, हेच विज्ञाननिष्ठ दृष्टी आपल्याला सांगते.' विज्ञानाचं महत्त्व असं साध्या सोप्या भाषेत सांगणार्‍या रामन यांचे पूर्वज शेती करणारे होते. तंजावर जिल्ह्यातल्या पारासगुडी आणि मानसगुडी या खेड्यांजवळ त्यांची शेती होती. अशा शेतकरी कुटुंबात रामन यांचा जन्म दि. ७ नोव्हेंबर १८८८ या दिवशी झाला. ते चार वर्षांचे झाले असताना त्यांचे वडील भौतिकशास्त्राचे व्याख्याते म्हणून श्रीमती ए. व्ही. नरसिंहराव महाविद्यालयात काम करू लागले होते. लहानपणापासून तेज बु्द्धी असलेला मुलगा अशीच कीर्ती रामन यांनी मिळवली होती. मॅट्रिकच्या परीक्षेत ते पहिले आले, त्यावेळी त्यांचं वय होतं, १५ वर्षांचं! १९०४ सालात रामन बी.ए.च्या परीक्षेत पहिले आले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे १९०६ मध्ये यांचा पहिला संशोधन निबंध लंडन येथील फिलॉसॉफिकल मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झाला. नंतर ते एम.ए. झालेच, पण त्यांनी फिनान्शियल सर्व्हिस परीक्षेतही पहिला नंबर पटकावला. त्यानंतर त्यांची नेमणूक कलकत्ता येथे साहाय्यक लेखापाल म्हणून झाली. त्याच काळात त्यांचं लग्न झालं. मात्र वैवाहिक आयुष्याला सुरुवात झाल्यानंतर रामन त्यातच अडकून पडले नाहीत, तर त्यांनी कलकत्त्यामधल्याच 'इंडियन असोसिएशन फॉर कल्ल्टिव्हेशन ऑफ सायन्स' या संस्थेमध्ये संशोधन करणं सुरू केलं. त्यावेळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. विज्ञानातील संशोधनास पोषक असं वातावरण अजिबातच नव्हतं. परंतु रामन यांनी मोठ्या चिकाटीनं आपलं संशोधन सुरूच ठेवलं आणि २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी, ते ज्या संस्थेत संशोधन करत होते तिथंच, त्यांनी आपल्या 'रामन परिणाम' या संशोधनाची घोषणा केली. पुढच्याच वर्षी त्यांना 'सर' हा किताब मिळाला आणि १९३० सालामध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांच्या या तेजस्वी कार्याचं स्मरणं करावं आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आजच्या पिढीनंसुद्धा मूलभूत विज्ञानातील संशोधनाकडं वळावं, असाच उद्देश ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करण्यामागं आहे. आपणही त्यातून प्रेरणा घ्याल, असा विश्वास वाटतो.

  -श्रीराम शिधये
  [email protected]

  फेब्रुवारी २०१८

 • साहित्यातील कोलंबस!

  By Admin, On 27th Feb 2020, Children Magazine

  ज्यांच्या नावाचा एक तारा अथांग तारांगणात अक्षय विराजमान आहे असं एक

  आदरणीय नाव - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. अर्थात –‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर. जनमानसातले तात्यासाहेब! कवी, साहित्यिक अनेक असतात; पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू.

 • रंगांची ओळख

  By Admin, On 3rd March 2020, Children Magazine

  इंट्रो- आपण रंग कसे काय ओळखू शकतो? आपल्या शरीरात अशी कोणती यंत्रणा आहे, जी आपल्याला रंग ओळखायला मदत करते? रंग ओळखणे ही काही सोपी क्रिया नाही. नीट समजून घ्या हं. या शास्त्रज्ञ काकानी आपल्याला खूप सोपं करून सांगितलय हे विज्ञान. आपल्याला रंग कसे शिकवले जातात? तर हिरवा रंग गवताचा. म्हणजे तर गवत ज्या रंगाचं असतं तो हिरवा. पण मग पोपटाचाही हिरवाच कसा, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. कारण त्या दोन रंगांमध्ये फरक असतो. तेव्हा रंगांची ओळख पटायची तर त्या रंगांचा अनुभव त्याला घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांनी तो रंग पाहिल्याशिवाय त्याची ओळख पटणं तसं कठिणच आहे.

 • प्राण्या तुझा रंग कसा ?

  By Admin, On 4th March 2020, Children Magazine

  इंट्रो - प्राण्या-पक्ष्यांचे रंग किती वेगवेगळे असतात ना? रोहित पक्षी (फ्लेमिंगो) छान गुलाबी का? मोराचा मूळ रंग म्हणे तपकिरी असतो पण आपल्याला तर तो मोरपिशी दिसतो... असे का?
  प्राण्या तुझा रंग कसा ? आणि प्राण्या तो असा का ? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधताना या पृथ्वीवर असणाऱ्या विविध सजीवसृष्टीत निसर्गाने किती विचारपूर्वक रंगांची उधळण केली आहे, ते लक्षात येते. प्राण्यांच्या अंगावर दिसणारे रंग हे त्यांच्या कातडीत, केसात, लवेमध्ये किंवा पिसांत असणाऱ्या रंगद्रव्यामुळे दिसतात.

 • अग्नि-उत्सव!

  By Admin, On 9th March 2020, Children Magazine

  शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात ‘होळी’ आणि ‘अग्नी’ या शब्दांची नातीगोती जाणून घेऊया. `होळी रे होळी पुरणाची पोळी’, `आयी होली आयी, सब रंग लायी’ या अशा ओळी वाचून गेल्या वर्षी साजऱ्या केलेल्या होळी या सणाच्या कितीतरी आठवणी मनात जाग्या झाल्या असतील ना तुमच्या ? आणि आता तुम्हाला होळी पेटल्यावर तडतडतडतड वाजत आसमंताला भिडणाऱ्या आगीच्या ज्वाळा, होळीच्या गरम गरम हाळा, होळीत टाकलेल्या नारळाच्या खमंग भाजक्या खुरड्या मस्त स्वादिष्ट पुरणपोळी तुमच्या बरोबरीने काकामामांनी ठोकलेल्या आरोळ्या आणि मारलेल्या बोंबा आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या रंगांनी रंगवलेली बाळगोपाळ दोस्त मंडळी.

 • रंगांची बेरीज-वजाबाकी

  By Admin, On 10th March 2020, Children Magazine

  सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी गर्रकन फिरवली की, हा पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र काळाकुट्ट रंग होतो. असे का? आपल्याला रंग कसे दिसतात?.. वाचा हा लेख - “आई, असं का होतंय?” नीलने आईला ओढतच बाल्कनीत नेलं. “इथे बघ! आम्ही ही सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी बनवली. ती रंगवताना आम्ही बशीत त्या साती रंगांचे वेगवेगळे ठिपके घोटवले होते. आता ही भिंगरी गर्रकन फिरली की, हा असा मस्त पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र हा बघ असा काळाकुट्ट रंग झाला.” “असं का झालं, काकू?” नीलच्या मित्राला, अर्णवलाही, हाच प्रश्न पडला होता.

 • नैसर्गिक रंगात रंगलो आम्ही!

  By Admin, On 11th March 2020, Children Magazine

  रंग कोणाला नाही आवडत ? होळी, दहीहंडी अशा सणांवेळी आपण मोठ्या प्रमाणात रंगांशी खेळतो. पण हे रंग बनतात कसे? काही वेळा हे रंग अपायही करतात. मग कोणते रंग चांगले? वाचा मार्च २०१६ च्या ‘वयम्’ अंकातील उद्योगभेटीचा वृत्तान्त - रंगात रंग कोणता? म्हणजेच Colour colour which colour? हा खेळ आपण तुम्ही खेळलाय? हा खेळ खेळताना जो रंग आपल्याला शोधायला सांगितला आहे तो रंग शोधायला आपण आपल्या आजूबाजूला पळतो आणि तो रंग सापडला की त्याला हात लावून धरतो. तो रंग शोधेपर्यंत जो आउट होईल त्यावर राज्य येते. यावेळी निसर्गातील अनेक रंगाची जणू उजळणीच चाललेली असते.

 • शंकू ते मेंदू – आपला रंगप्रवास

  By Admin, On 12th March 2020, Children Magazine

  इंट्रो - मानवी डोळ्यांना रंग नेमके कसे ओळखता येतात, यावर आतापर्यंत बरीच संशोधने झाली आहेत. काही संशोधने चालू आहेत. त्या संशोधनांतून कितीतरी रंगतदार शोध लागले आहेत... आपल्या जीवनात रंगच नसते, सगळं काही काळं-पांढरं असतं तर किती कंटाळवाणं झालं असतं, नाही का ! नशीब, आपल्या सभोवतालीच निसर्गानेच किती रंगांची लयलूट केली आहे. सरत्या पावसाच्या संध्याकाळी आभाळात दिसणारी इंद्रधनूची कमान त्यावरील ता ना पि हि नि पा जा किंवा VIBGYOR आपण आनंदाने पाहू शकतो कारण आपले डोळे आणि त्यांना आज्ञा देणारा मेंदू !