प्राण्या तुझा रंग कसा ?

 • प्राण्या तुझा रंग कसा ?

  By Admin, On 4th March 2020, Children Magazine

  इंट्रो - प्राण्या-पक्ष्यांचे रंग किती वेगवेगळे असतात ना? रोहित पक्षी (फ्लेमिंगो) छान गुलाबी का? मोराचा मूळ रंग म्हणे तपकिरी असतो पण आपल्याला तर तो मोरपिशी दिसतो... असे का? प्राण्या तुझा रंग कसा ? आणि प्राण्या तो असा का ? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधताना या पृथ्वीवर असणाऱ्या विविध सजीवसृष्टीत निसर्गाने किती विचारपूर्वक रंगांची उधळण केली आहे, ते लक्षात येते. प्राण्यांच्या अंगावर दिसणारे रंग हे त्यांच्या कातडीत, केसात, लवेमध्ये किंवा पिसांत असणाऱ्या रंगद्रव्यामुळे दिसतात. आपल्या त्वचेच्या खाली जसे मेलॅनिन हे रंगद्रव्य असते, तशीच निरनिराळी रंगद्रव्ये प्राण्यांच्या त्वचेत असतात. लाल-गुलाबी प्राणी, पक्षी, रंगीत मासे यांच्या त्वचेत कॅरेटिनॉईडस् ही रंगद्रव्ये असतात. ही कॅरेटिनॉईडस् त्यांच्या शरीरात तयार होत नाहीत, तर ती खाण्यावाटे त्यांच्या शरीरात पोहोचतात. तांबड्या-गुलाबी पंखाचा रोहित पक्षी (फ्लेमिंगो) दिवसभर तांबड्या कोलंब्या खातो आणि तोच रंग त्याच्या पंखावर चढतो. म्हणून तर त्याला ‘अग्निपंख’ असेही नाव आहे.

  कोलंब्या सागरी जालातले सूक्ष्म शेवाळे खातात म्हणून त्या लाल होतात. शेवाळांना मात्र स्वतःचा कॅरेटिनॉईडस् रंगद्रव्य निर्माण करता येतो. अन्नसाखळीच्या मार्गाने रंग एकाकडून दुसरीकडे जातो. आहे की नाही गंमत! मग तुम्ही म्हणाल, गाई आणि काळ्याकभिन्न म्हशी हिरवंगार गवत खातात तरी त्या हिरव्या का नाही होत ? तर त्याचे कारण असे आहे की, हरितद्रव्य किंवा क्लोरोफिल हे पचनक्रियेत साफ बदलून जाते. काही प्राण्यांच्या शरीरात क्रोमॅटोफोर्स (रंगद्र्व्यांच्या पेशी) असतात. या पेशींचा आकार, त्यात असलेले रंगद्र्व्याचे प्रमाण इत्यादी बदलता येते. आणि हा बदल प्राणी स्वतःच्या इच्छेनुसार करतो. या रंगबदलू प्राण्यांच्या शरीरातील प्रक्रियेला

  ‘मेटॅक्रोसिस’ असे म्हणतात. कॅमेलियॉनसारखा (सरडा) सरीसृप प्राणी किंवा माकुलासारखा मृद्काय अपृष्ठवंशीय, सागरी प्राणी हे दोघेही अतिशय वेगाने आपला रंग बदलू शकतात. रंग बदलाचे मुख्य कारण छदमावरण- कॅमोफ्लेज- हे असते. सभोवतालच्या परिसरात बेमालूम लपून जाण्याची ही प्रक्रिया अनेक प्राणी व विशेषतः कीटक दाखवतात. नळ, माकूळ यांसारखे शीर्षपाद प्राणी फिकट रंगावर पोहोत आले की त्यांच्या शरीरातल्या कोमॅटोफोर्सचे प्रसारण होते आणि काळसर ठिपके आता मोठ्या डागात परावर्तीत होतात. सहाजिकच त्यांचा रंग गोऱ्यापासून काळ्यापर्यंत बदलत जातो.

  बेडकांसारख्या उभयचर प्राण्यांमध्ये तीन प्रकारचे चांदणीच्या आकाराचे क्रोमॅटोफोर्स असतात. हे त्वचेच्या निरनिराळ्या थरात असतात. सर्वांत वरच्या थरांत नारिंगी, लाल किंवा पिवळ्या रंगद्र्व्यानी भरलेली ‘झॅन्योफोर्स’ असतात. मधल्या थरांमध्ये असतात ‘इरिडीओफोर्स’. यात चंदेरी चकचकीत रंगद्रव्य असतात, तर सर्वात तळाच्या थरात मेलॅनोफोर्स हे मेलॅनिन रंगद्रव्ये असणारे पेशीसमूह दिसतात.

  पक्ष्यांची पिसे आणि रंगीत कीटकांची कवचे यांचे रंगकाम वेगळेच असते. यात अत्यंत सूक्ष्म व तरल पृष्ठभाग असलेल्या भागांचा दृश्य प्रकाशाशी संयोग होतो. त्यात असणाऱ्या थोड्याफार रंगद्र्व्याचा परिणाम त्यामुळे निराळाच असतो. उदा. मोराची पिसे आपल्याला निळी-हिरवी-मोरपिशी दिसतात. खरे तर मोरपिसात तपकिरी (ब्राऊन) रंगाचे रंगद्रव्य असते, पण पिसाच्या खास रचनेमुळे हिरव्या, निळ्या, मोरपिशी रंगाची उधळण झाल्यासारखे दिसते. या पद्धतीने निर्माण होणारे रंग बहुतेक वेळा झळाळी मारतात.

  काही प्राणी स्वयंप्रकाशित असतात. लुकलुकता काजवा जमिनीवर, तर अनेक सागरी जीव आणि मासे हा उजेडाचा खेळ करताना आढळतात. या सर्व प्राण्यांत ‘ल्युसिफेरीन’ नावाचे रंगद्रव्य असते. अगदी खोल खोल पाण्यात राहणाऱ्या अँगलर माशाच्या डोक्यावर शेंडी असते. या शेंडीवर प्रकाश निर्माण करणारे रंगद्रव्य असणारे जीवाणू कायम वास्तव्याला आलेले असतात, काळोखात भक्ष्य सापडणे तसे कठीण, पण या अँगलरला अशा उजेडाचा उपयोग होतो.

  वनस्पतींमध्ये निरनिराळी रंगद्रव्ये असतात. गाजरात असणारे कॅरॅटिनॉईड; हिरवा रंग देणारे क्लोरोफिल म्हणजेच हरितद्रव्य; याशिवाय झँथोफिल आणि अँन्योसायनिन ही रंगद्रव्ये पानावर, फुला-फळांवर रंगांची निरनिराळी डिझाईन्स करतात.

  -नंदिनी देशमुख
  [email protected]

  मार्च २०१५ ‘वयम्’

 • साहित्यातील कोलंबस!

  By Admin, On 27th Feb 2020, Children Magazine

  ज्यांच्या नावाचा एक तारा अथांग तारांगणात अक्षय विराजमान आहे असं एक

  आदरणीय नाव - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. अर्थात –‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त विष्णू वामन शिरवाडकर. जनमानसातले तात्यासाहेब! कवी, साहित्यिक अनेक असतात; पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि.वा.शिरवाडकर म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू.

 • सत्याचा शोध

  By Admin, On 28th Feb 2020, Children Magazine

  मित्रांनो, आपल्या सार्‍या भारतीयांसाठी फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे. याचं कारण याच महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. दरवर्षी त्या दिवशीचं म्हणून एक घोषवाक्य जाहीर केलं जातं आणि त्या दिवशी देशभर होणारे कार्यक्रम त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं केले जातात. या कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, विविध संशोधन संस्था यांच्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक भाग घेतात. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून.

 • रंगांची ओळख

  By Admin, On 3rd March 2020, Children Magazine

  इंट्रो- आपण रंग कसे काय ओळखू शकतो? आपल्या शरीरात अशी कोणती यंत्रणा आहे, जी आपल्याला रंग ओळखायला मदत करते? रंग ओळखणे ही काही सोपी क्रिया नाही. नीट समजून घ्या हं. या शास्त्रज्ञ काकानी आपल्याला खूप सोपं करून सांगितलय हे विज्ञान. आपल्याला रंग कसे शिकवले जातात? तर हिरवा रंग गवताचा. म्हणजे तर गवत ज्या रंगाचं असतं तो हिरवा. पण मग पोपटाचाही हिरवाच कसा, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. कारण त्या दोन रंगांमध्ये फरक असतो. तेव्हा रंगांची ओळख पटायची तर त्या रंगांचा अनुभव त्याला घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांनी तो रंग पाहिल्याशिवाय त्याची ओळख पटणं तसं कठिणच आहे.

 • अग्नि-उत्सव!

  By Admin, On 9th March 2020, Children Magazine

  शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात ‘होळी’ आणि ‘अग्नी’ या शब्दांची नातीगोती जाणून घेऊया. `होळी रे होळी पुरणाची पोळी’, `आयी होली आयी, सब रंग लायी’ या अशा ओळी वाचून गेल्या वर्षी साजऱ्या केलेल्या होळी या सणाच्या कितीतरी आठवणी मनात जाग्या झाल्या असतील ना तुमच्या ? आणि आता तुम्हाला होळी पेटल्यावर तडतडतडतड वाजत आसमंताला भिडणाऱ्या आगीच्या ज्वाळा, होळीच्या गरम गरम हाळा, होळीत टाकलेल्या नारळाच्या खमंग भाजक्या खुरड्या मस्त स्वादिष्ट पुरणपोळी तुमच्या बरोबरीने काकामामांनी ठोकलेल्या आरोळ्या आणि मारलेल्या बोंबा आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या रंगांनी रंगवलेली बाळगोपाळ दोस्त मंडळी.

 • रंगांची बेरीज-वजाबाकी

  By Admin, On 10th March 2020, Children Magazine

  सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी गर्रकन फिरवली की, हा पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र काळाकुट्ट रंग होतो. असे का? आपल्याला रंग कसे दिसतात?.. वाचा हा लेख - “आई, असं का होतंय?” नीलने आईला ओढतच बाल्कनीत नेलं. “इथे बघ! आम्ही ही सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी बनवली. ती रंगवताना आम्ही बशीत त्या साती रंगांचे वेगवेगळे ठिपके घोटवले होते. आता ही भिंगरी गर्रकन फिरली की, हा असा मस्त पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र हा बघ असा काळाकुट्ट रंग झाला.” “असं का झालं, काकू?” नीलच्या मित्राला, अर्णवलाही, हाच प्रश्न पडला होता.

 • नैसर्गिक रंगात रंगलो आम्ही!

  By Admin, On 11th March 2020, Children Magazine

  रंग कोणाला नाही आवडत ? होळी, दहीहंडी अशा सणांवेळी आपण मोठ्या प्रमाणात रंगांशी खेळतो. पण हे रंग बनतात कसे? काही वेळा हे रंग अपायही करतात. मग कोणते रंग चांगले? वाचा मार्च २०१६ च्या ‘वयम्’ अंकातील उद्योगभेटीचा वृत्तान्त - रंगात रंग कोणता? म्हणजेच Colour colour which colour? हा खेळ आपण तुम्ही खेळलाय? हा खेळ खेळताना जो रंग आपल्याला शोधायला सांगितला आहे तो रंग शोधायला आपण आपल्या आजूबाजूला पळतो आणि तो रंग सापडला की त्याला हात लावून धरतो. तो रंग शोधेपर्यंत जो आउट होईल त्यावर राज्य येते. यावेळी निसर्गातील अनेक रंगाची जणू उजळणीच चाललेली असते.

 • शंकू ते मेंदू – आपला रंगप्रवास

  By Admin, On 12th March 2020, Children Magazine

  इंट्रो - मानवी डोळ्यांना रंग नेमके कसे ओळखता येतात, यावर आतापर्यंत बरीच संशोधने झाली आहेत. काही संशोधने चालू आहेत. त्या संशोधनांतून कितीतरी रंगतदार शोध लागले आहेत... आपल्या जीवनात रंगच नसते, सगळं काही काळं-पांढरं असतं तर किती कंटाळवाणं झालं असतं, नाही का ! नशीब, आपल्या सभोवतालीच निसर्गानेच किती रंगांची लयलूट केली आहे. सरत्या पावसाच्या संध्याकाळी आभाळात दिसणारी इंद्रधनूची कमान त्यावरील ता ना पि हि नि पा जा किंवा VIBGYOR आपण आनंदाने पाहू शकतो कारण आपले डोळे आणि त्यांना आज्ञा देणारा मेंदू !