‘वयम्’- ऋणांजली’ योजना

  • १०
Boy

५ अंक दरमहा ३ वर्षांसाठी रु. ६०००

बहुतेक मराठी पालकांना वाटतं की हल्ली मुलं वाचत नाहीत- निदान मराठीत काही वाचत नाहीत. अनेकांना वाटतं की टीव्ही, क्रिकेट, मोबाईल, व्हॉटस अॅप यांतच त्यांचा वेळ जातो.

तुम्हालाही असंच वाटतंय? पण असं का होत असेल?

आम्हाला याबाबत काय वाटतं ते सांगतो- एवढी ११ कोटी लोकांची मराठी भाषा- गोड आणि प्रभावी, मग असं का? एक कारण म्हणजे आपणच आपल्या भाषेला कमी लेखतो. इंग्रजी ही जागतिक भाषा, ती आलीच पाहिजे, अगदी उत्तम आली पाहिजे, पण भाषातज्ज्ञ सांगतात की जर मातृभाषा चांगली येत नसेल तर इंग्रजीतही आपली प्रतिभा फुलणार नाही. म्हणून मातृभाषेत वाचण्याची आवड लहानपणीच लागायला हवी.

म्हणून आम्ही शालेय मुलांसाठी `वयम्’ मासिक प्रसिद्ध करतो. विशेष म्हणजे हजारो मराठी मुलांनी, अगदी इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनीही `वयम्’ ला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

या मराठी मासिकांत काही पाने इंग्रजीत असतात. दर्जेदार कथा, उद्योग-भेट, ताज्या विषयांवरचे लेख, सृजनात्मक Activities, कोडी असे बरेच काही साहित्य `वयम्’ मध्ये प्रसिद्ध केले जाते. दर्जेदार साहित्य, आकर्षक चित्रे, सुंदर छपाई यामुळे `वयम्’ मासिक मुलांना आवडू लागले आहे. ‘वयम्’च्या सल्लागार मंडळात डॉ. अनिल काकोडकर, कुमार केतकर, अच्युत गोडबोले, डॉ. उदय निरगुडकर, राजीव तांबे, श्रीकांत वाड अशा ज्येष्ठ व्यक्ती आहेत. शुभदा चौकर या मासिकाच्या मुख्य संपादक आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ही ‘वयम्’ची ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. अच्युत पालव कला सल्लागार आहेत.

आज अशी अनेक मुले आहेत, जी वाचत नाहीत, कारण चांगले साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. अशा मुलांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही एक योजना आखली आहे. या योजनेचे नाव आहे- ऋणांजली.

तुम्ही एवढेच करायचे की ६००० रुपये आमच्याकडे द्यायचे. आम्ही तुमच्यातर्फे गरजू विद्यार्थी बहुसंखेने असलेल्या एखाद्या शाळेला पुढील ३ वर्षे दर महिन्याला `वयम्’चे ५ अंक पाठवू. ‘ऋणांजली’ योजनेचा लाभ कोणत्या शाळेला करून द्यायचा, हे तुम्ही स्वतः ठरवू शकता किंवा त्यासाठी आमची मदत घेऊ शकता.

‘ऋणांजली’ योजनेचा फॉर्म सोबत जोडत आहोत. तुम्ही एक वा अधिक फॉर्म भरून या योजनेत सहभागी होऊ शकता. ‘वयम्’ म्हणजे आपण सारे. तुम्ही, आम्ही, आपण सारे मिळून काही गरजू मुलांपर्यंत दरमहा `वयम्’ पोहोचवू.

धन्यवाद
श्रीकांत बापट, प्रकाशक, वयम्‘वयम्’- ऋणांजली’ योजना फॉर्म