‘वयम्’विषयी

बाप्पा स्पेशल अंक - पुन्हा तुमच्या भेटीला येत आहे.या गणपती विशेषांकात वयम् मासिकात २०१३ ते २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेले काही साहित्य आपण एकत्रित रूपात देत आहोत.लहानांबरोबर मोठ्यांनी, मोठ्यांबरोबर लहानांनी नक्की वाचा

‘अहम् आवाम् वयम्’ हे किशोरवयीन मुलांचे मासिक आहे. वय वर्षे ९ ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, त्यांना दर्जेदार साहित्य वाचायला मिळावे, यासाठी ठाण्याच्या लॅबइंडिया कंपनीचे अध्यक्ष श्रीकांत बापट (‘वयम्’चे प्रकाशक) यांच्या आर्थिक पाठबळातून ‘वयम्’ हे मासिक जून, २०१३ पासून प्रसिद्ध होत आहे. ‘वयम्’चे ब्रीदवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास’. मुख्यत्वे शाळा व वाचनालयांत आमचे मासिक वितरीत होते. तसेच वाचनप्रेमी विद्यार्थी, शिक्षक व पालक आवर्जून ‘वयम्’चे वर्गणीदार होतात.

Download For Free