वाचन-प्रेरणा दिन स्पर्धा निकाल

हाय फ्रेंड्स, वाचन प्रेरणा दिन लेखन आणि व्हिडीओ स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल तुम्हां सर्वांचे आभार. पहिली स्पर्धा ही ‘वयम्’मधील आवडलेल्या साहित्याबद्दल तुमची प्रतिक्रिया २०० शब्दांत लिहायची होती. दुसरी स्पर्धा ही ‘वयम्’मधील साहित्यातील २ मिनिटांचा उतारा वाचायचा होता. या दोन्ही स्पर्धेत मिळून सुमारे २०० मुलांनी भाग घेतला. प्रत्येकांनी मनापासून प्रयत्न केले. वाचनासाठी निवडलेला उतारा, त्याचे वाचन कसे केले, वाचतानाचे भाव, शब्दोच्चार, वय या सर्व लक्षात घेऊन स्पर्धेचे परीक्षण करण्यात आले. लेखनाच्या बाबतीतही तो लेख आवडण्यामागचे कारण, त्यासंदर्भातील लेखन, शब्दमर्यादा या सर्व गोष्टींचा विचार केला गेला. दोन्ही स्पर्धांतून मिळून २२ मुले विजेती म्हणून निवडण्यात आली आहेत. या विजेत्या मुलांचे व्हिडीओ आणि लेखन सोशल मिडिया आणि वेबसाइटवर टप्याटप्याने प्रसिद्ध करू. तसेच विजेत्यांना इ-प्रशस्तीपत्रकही मेलद्वारे पाठवून देण्यात येईल. विजेत्यांचे अभिनंदन.

वाचन-प्रेरणा दिन लेखन स्पर्धा विजेते- १०

 • १. ज्ञानेशा वाडेकर, नववी, मॉडर्न हायस्कूल, गणेशखिंड, पुणे
 • २. कृष्णाई जेऊरकर, पाचवी, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, लातूर
 • ३. संकेत फणसे, नववी, बालविकास मंदिर मराठी माध्यमिक शाळा आदर्श नगर, वरळी- मुंबई
 • ४. स्वरा पाटील, सातवी, चिंतामणराव केळकर विद्यालय अलिबाग रायगड, महाराष्ट्र
 • ५. हर्षदा चव्हाण, नववी, ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, लातूर
 • ६. ओवी साधू, शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स, नांदेड
 • ७. प्रांजल सोनावणे, चौथी, आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा, शिरपूर, जिल्हा धुळे
 • ८. पलक चुरी, दहावी, विद्यामंदिर, दहिसर
 • ९. उर्वी खडके, दहावी, श्री समर्थ विद्यालय, अमरावती
 • १०. मुग्धा प्रभू, नववी, सेंट तेरेसा कॉन्व्हेंट हायस्कूल, सांताक्रुज- मुंबई

वाचन-प्रेरणा दिन वाचन- स्पर्धा विजेते- १२

 • १. अस्मी आठलेकर, तिसरी, मोहनराव परुळेकर प्राथमिक शाळा, मालवण
 • २. निधी हेटकरी, सहावी, विद्या विकास प्राथमिक शाळा, वांगणी
 • ३. स्वरा पाटणकर, चौथी, आर्यन वर्ल्ड स्कूल, पुणे
 • ४. उत्कर्षा पाटील, सातवी, ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, लातूर
 • ५. उर्वी खडके, दहावी, श्री समर्थ विद्यालय, अमरावती
 • ६. आर्यन महाजन, दहावी, ब्रजलाल पारेख विद्यानिधी हायस्कूल, जुहू-मुंबई
 • ७. ईश्वरी बेलाटीकर, दहावी, ब्रजलाल पारेख विद्यानिधी हायस्कूल, जुहू-मुंबई
 • ८. साक्षी जगताप, नववी, नूतन ज्ञान मंदिर, कल्याण
 • ९. तनिष्का निगोसकर, नववी, अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, पुणे
 • १०. मधुश्री महाजन, आठवी, मुरबाड
 • ११. नभा बडे, तिसरी, कृ.चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरी
 • १२. स्वानंदी शेंबवणेकर, सहावी, रा. भा. शिर्के प्रशाला, रत्नागिरी

आम्ही सोशल मीडिया वर आहोत, आमच्याशी कनेक्ट व्हा !