सुट्टी अनुभव स्पर्धेच्या अंतीम फेरीचा निकाल

सुट्टी अनुभव-लेखांचे सार!

करोनामुळे मिळालेल्या दीर्घ सुट्टीत मुलांना बंदिस्त वातावरणात राहावे लागले. घरातल्या घरात राहून काय काय केले मुलांनी, काय काय जाणवले त्यांना, हे जाणून घेण्यासाठी अनुभव-लेख पाठवा, असे आवाहन आम्ही ‘वयम्’ मासिकातर्फे केले होते. त्याला सुमारे 300 मुलांनी प्रतिसाद दिला. त्यातील ३० ते ३५ लेख इंग्रजीत होते आणि बाकी सर्व मराठीत. दुसरीपासून दहावीपर्यंतच्या मुलांनी सहभाग घेतला. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, पंढरपूर, लातूर, नांदेड, सोलापूर, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली अशा अनेक जिल्ह्यांतून अनुभव-लेख आले. तसेच महाराष्ट्राबाहेरील गोवा, अहमदाबाद, दिल्ली या ठिकाणांहूनही आले. यातील सुमारे 100 निवडक लेख आम्ही समाजमाध्यमांवरून प्रसिद्ध केले. हे लेख वाचून आम्ही चकित झालो. ‘वयम्’ मासिकाशी जोडलेली ही मुले इतके काही करताहेत, ही जाणीव सुखद होती. त्यांच्या मनात असलेली प्रेरणा, स्फूर्ती, सकारात्मकता आणि समंजसपणा बघून खूप आनंद झाला. सर्व लेख वाचल्यावर जे जाणवले ते मांडण्याचा हा प्रयत्न-

 • बहुतांश मुलांनी ही परिस्थिती समजूतदारपणे स्वीकारली. मिळालेला वेळ सत्कारणी लावला. मुले खूप काही शिकली या काळात. अनपेक्षित परिस्थितीचा स्वीकार कसा करायचा, समस्येचे रूपांतर संधीत कसे करायचे, हे महत्त्वाचे धडे मुले शिकली.
 • आपण घरातील मोठ्यांना मदत कशी करायची आणि आपल्या कामासाठी कोणाची मदत केव्हा, कशी घ्यायची, हेही मुलांना शिकायला मिळाले. कधी माणसांची तर कधी तंत्रज्ञानाची मदत मुलांनी घेतली.
 • एरवी मुलांना जराही मोकळा वेळ मिळत नाही. त्यांचे टाईमटेबल गच्च असते. आता वेळ मिळाल्यावर मुलांना स्वातंत्र्य मिळाले. त्याचा विनियोग त्यांनी कलेत रमणे, छंद जोपासणे, निरीक्षणे करणे, आत्मपरिक्षण करणे अशा अनेक गोष्टींसाठी केला.
 • अनेक मुलांना अवांतर वाचायला आवडते. एरवी वेळ मिळत नाही. या काळात मात्र अनेक मुले मनापासून वाचनात गढून गेली. कथा, कादंबर्‍या, चरित्र असे अनेक प्रकारचे साहित्य वाचले. महात्मा गांधीजी, महात्मा फुले, रामदास स्वामी यांचे विचार काही मुलांनी समजून घेतले.
 • अनेक मुलांना स्वतचे स्वत टाइमटेबल करायला आवडते. एकावेळी अनेक गोष्टी करू पाहणारी मुले त्यांचे त्यांचे वेळापत्रक बरोब्बर आखतात व पाळतात.
 • स्वयंपाक, सफाई, परिसराची निगा अशी अनेक जीवनकौशल्ये मुलांनी या काळात आत्मसात केली.
 • किंबहुना अनेक मुलांना एरवीही स्वयंपाकघरात काम करावेसे वाटते, पण काहींना ती मोकळीक मिळत नाही (विशेषत मुलग्यांना). काहींना ती मुभा असते पण वेळ मिळत नाही. पण या काळात त्यांनी स्वयंपाक करण्याची मजा अनुभवली. भाकरी, घडीची पोळी, केक असे पदार्थ छान जमल्यावर होणारा आनंद अनेक मुलांनी लुटला.
 • काही मुलांनी त्यांच्या घरगुती व्यवसायात सहभाग दिला. जणू व्यावसायिक इंटर्नशिप झाली त्यांची! उदा. भाजी विकणे, शेतात काम, शिवणकाम, आरोग्य सेवेतील पालकांना मदत.
 • बागकाम, घरगुती शेती, पक्षीनिरीक्षण, आकाश निरीक्षण अशा विरंगुळयामुळे मुले निसर्गाच्या जवळ गेली. पर्यावरणाचे काही पाठ त्यांना आपोआप मिळाले.
 • घरातल्यांशी (पालक, ज्येष्ठ पालक, नातेवाईक) भरपूर गप्पा, बिकट परिस्थितीशी जुळवून घेणे, समाजात असलेली विषमता, देशासमोरची आव्हाने अशा विषयांवर विचार करणे, यासाठी निवांतपणा मिळाला. त्यातून मुलांच्या संवेदनशीलतेला खतपाणी मिळाले. या नव्याने जानवलेल्या गोष्टी त्यांनी वाचून, मोठ्यांशी बोलून समजून घेतल्या.
 • स्वअध्ययन करण्याची सवय अनेक मुलांनी लावून घेतली. त्यासाठी स्वतच्या पद्धती विकसित केल्या. आता त्यांना कुठल्याही ट्यूशनला घालण्यापूर्वी त्यांचे म्हणणे ऐकून घेणे योग्य! त्यांना खरोखरच ट्यूशनची गरज आहे का, असली तर कोणत्या विषयासाठी, कशासाठी हे समजून घेतल्याशिवाय क्लास नको लावायला!
 • मुलांना काही गोष्टी आखीवरेखीव पद्धतीने शिकण्यापेक्षा स्वतः खटपट करून शिकायला आवडतात. अनेक मुलांनी वाद्य वाजवणे, हस्तकला, नवीन भाषा शिकणे अशा गोष्टी स्वतच्या स्वत शिकण्याचा प्रयत्न केला. कुणी ऑनलाइन साइटवरून तबला शिकले. व्हिडिओ बघून हस्तकलाकृती केली. कुणी ग्रामीण बोलीभाषा जाणून घेतल्या तर कुणी परदेशी भाषा!
 • अनेक मुलांना तंत्रज्ञानाची आवड असते. पण त्यात प्रयोग करण्यासाठी उसंत मिळत नाही. या काळात अनेक मुलांनी संगणकाची भाषा शिकणे, प्रोग्रामिंग करून पाहणे, घरगुती उपकरण दुरुस्त करणे असे तंत्र-शिक्षण घेतले.
 • बहुतांश मुले मोकळ्या वेळासाठी आसुसलेली आहेत. शाळा सुरू झाल्यावरसुद्धा रोज थोडा तरी मोकळा वेळ मिळवा, असे मुलांना वाटतेय.
 • अनेक मुलांना त्यांची शाळा, शिक्षक, मित्रमैत्रिणी यांची आठवण येऊ लागली आहे. अधूनमधून ऑनलाइन शिकायला आवडेल, पण सतत तेच नको, असे त्यांना वाटतेय.

थोडक्यात, मोठ्यांनी मुलांवर विश्वास टाकला की ते त्याला जागतात, सतत कार्यरत व विचारशील राहण्यासाठी त्यांच्यातील प्रेरणा टिकेल असे वातावरण त्यांना कायम मिळाले पाहिजे- हे जणू ही मुले सर्व मोठ्या माणसांना सांगू पाहत आहेत.

मुलांच्या अनुभवलेखांतून व्यक्त झालेली त्यांच्या शिकण्याची रेंज किती आहे ते बघूया –

‘वयम्’चे बोधवाक्य आहे- ‘वाचनातून विचार, विचारातून विकास.’ करोनाच्या संकटकाळात विकासित होण्याची संधी स्वतःहून घेणार्‍या सर्व मुलांचे हार्दिक अभिनंदन! सुमारे 100 मुलांचे अनुभवलेख तुम्ही यापूर्वी वाचले आहेत. ही सर्व मुले निवडणे सोपे नव्हते. हे सर्व 100 जण म्हणजे पहिल्या फेरीतील विजेते होते. यातून अंतीम विजेते लेख निवडणे, ही कसोटी होती. या स्पर्धेच्या परीक्षणाचे अवघड काम खूप वेळ देऊन पार पाडण्याचे काम ज्या परीक्षकांनी केले, ते आहेत- स्पीच थेरपिस्ट डॉ. सावनी गोडबोले, शिक्षिका व लेखिका कांचन जोशी, लेखनप्रिय गुणी विद्यार्थिनी दिव्या जगदाळे, ‘वयम्’च्या मुख्य उपसंपादक क्रांती गोडबोले-पाटील व मी स्वतः. दोन्ही फेऱ्यांतील विजेत्यांचे अभिनंदन. अंतिम फेरीतील विजेत्यांचे विशेष अभिनंदन. -शुभदा चौकर
मुख्य संपादक, ‘वयम्’ मासिक

सुट्टी अनुभव स्पर्धेच्या अंतीम फेरीतील विजेते आहेत-

 • 1. प्रिन्स वानखेडे, सातवी, भद्रावती, जि. चंद्रपूर
 • 2. पर्वणी रडके, नववी, दहिसर विद्या मंदिर, मुंबई.
 • 3. कृतिका जाधव, सातवी, जिल्हा परिषद शाळा भरणी नंबर 1, कणकवली, सिंधुदुर्ग
 • 4. चाणक्य तांबे, सातवी, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, जावळी.
 • 5. अनिहा शीला प्रवीण, सातवी, विसडम हाय इंटरनॅशनल स्कूल, नाशिक
 • 6. जान्हवी ओम दांडेकर, पाचवी, सरस्वती शाळा (ठाणे पश्चिम)
 • 7. सई जोशी, दहावी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे
 • 8. आर्य वाटाणे, आठवी, कर्नाटक हायस्कूल, पुणे
 • 9. स्नेह एरंडे, होमस्कूलिंग, पुणे
 • 10. समृध्द्धी महाजन, आठवी, गांधी विद्यालय, परभणी
 • 11. समीहन पांगम, सहावी, डिचोली गोवा
 • 12. सुधन्वा देवधर, सहावी, आनंद निकेतन शाळा, नाशिक
 • 13. आर्या मडव (नववी), आणि वेद मडव (सातवी), जांभवडे इंग्लिश मिडीयम स्कूल.
 • 14. मंजिरी भालेराव, सातवी, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभेफळ, तालुका - औरंगाबाद, जिल्हा - औरंगाबाद
 • 15. ईशान मराठे, सहावी, आनंद निकेतन शाळा, नाशिक
 • 16. नंदन कार्ले, नववी, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर,डोंबिवली(पूर्व)
 • 17. जान्हवी गव्हाणे, दहावी, टायनी एंजल्स स्कूल, नांदेड
 • 18. निहार मुंज, आठवी, भडगाव हायस्कूल, कणकवली, सिंधुदुर्ग
 • 19. संस्कृती शिंदे, दहावी, आनंद निकेतन, नाशिक
 • 20. आदित्य क्षीरसागर, दहावी, पंडितराव आगाशे हायस्कूल, लॉ कॉलेज रोड, पुणे.
 • 21. सोहम कुलकर्णी, नववी, विद्याप्रबोधिनी प्रशाला मराठी माध्यम, नाशिक
 • 22. ओवी चौगुले, दुसरी, आनंदनिकेतन, नाशिक
 • 23. वैष्णवी डांगे, सहावी, कुमुद विद्यामंदिर, मुंबई
 • 24. दीक्षा लोहार, पाचवी, बदलापूर पूर्व.
 • 25. अमायरा कोलते, तिसरी, नवी दिल्ली
 • 26. जिगीषा आणि जीग्निषा, आठवी, शिवाजी इंग्लिश स्कूल, पणदूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
 • 27. रेणुका वाडीकर, सहावी, ज्ञानप्रकाश विद्यानिकेतन, लातूर
 • 28. साईराज नांदूरकर, चौथी, अहमदनगर
 • 29. अपूर्वा कुलकर्णी, दहावी, आय.ई.एस चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली पूर्व.
 • 30. आकांक्षा चिकणे, नंदादीप विद्यालय, गोरेगाव (पू)

आम्ही सोशल मीडिया वर आहोत, आमच्याशी कनेक्ट व्हा !