पुरस्कार

  • महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, यांच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धा २०१३ चा ‘वयम्’ला ‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक’ पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते, म.सा.प.च्या अध्यक्षा माधवी वैद्य, कोषाध्यक्ष सुनील महाजन यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

  • साप्ताहिक उल्हास प्रभात आणि आरोग्य होमिओपॅथिक फार्मसी आयोजित राज्यस्तरीय दिवाळी विशेषांक स्पर्धा २०१४ चा ‘सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ पुरस्कार ‘वयम्’ला प्राप्त झाला.

  • को.म.सा.प कल्याण व समर्थ अॅडव्हटाय्रझर्स यांच्या तर्फे 'वयम्' दिवाळी अंकाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला.

  • श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या १६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बाल दिवाळी अंक म्हणून पुरस्कार मिळाला.

  • पुण्याच्या दिनमार्क पब्लिकेशन्सने प्रथमच घेतलेल्या ‘छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक’ स्पर्धेत 'वयम्' दिवाळी अंकाला कै. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालकुमार दिवाळी अंक ‘वयम्’ २०१६- प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

  • मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई यांच्या वतीने आयोजित ३९व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘वयम्’च्या २०१६च्या दिवाळी अंकास 'साने गुरुजी स्मृती सर्वोत्कृष्ट बालवाङ्मय’ पुरस्कार मिळाला.