गुरुपौर्णिमा पत्रलेखन स्पर्धा निकाल-

नमस्कार. ‘वयम्’ मासिकाने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा पत्रलेखन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वप्रथम शिक्षक, पालक आणि सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. आम्ही पहिला, दुसरा असे क्रमांक न काढता विजेत्या ३० जणांची नावे जाहीर करतोय. नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार-लेखिका सोनाली कोलारकर-सोनार आणि ‘वयम्’च्या मुख्य उपसंपादक क्रांती गोडबोले-पाटील यांनी परीक्षण केले.

परीक्षकांची निरीक्षणे –

 • सुमारे ५०० पत्रे आली. त्यातून निवड करणे फार कठीण होते.
 • महाराष्ट्राच्या अनेक भागांतील मुलांनी भाग घेतला.
 • पत्राचा आशय, त्यातील भावना, स्व-लेखन, मांडण्याची शैली, वयानुरूप समज, शब्दमर्यादा या सर्व गोष्टींचा विचार परीक्षणादरम्यान करण्यात आला.
 • या स्पर्धेसाठी सर्व मुलांनी मनापासून लिहिण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुलांची पत्रे बघून थक्क झालो.
 • बहुतांश मुलांची मांडणी, हस्ताक्षरेही उत्तम होती.
 • मात्र काहींनी पत्रांऐवजी निबंध लिहिले, काहींनी कविता पाठवल्या, काहींनी शब्दमर्यादेच्या बाहेर मोठाली पत्रं लिहिली, काहींनी मोठ्यांची मदत घेऊन पत्रं लिहिली, त्यांनी पत्रलेखन म्हणजे काय ते समजून घेणे गरजेचे आहे.
 • बऱ्याच पालकांनी आणि मुलांनी मात्र या स्पर्धेला एखाद्या निर्णायक परीक्षेचं स्वरूप दिले आणि त्यांचा निकालासाठी वाट बघण्याचा संयम ढासळलेला दिसला. बक्षीस काय आहे अशी सतत विचारणा केली. आम्ही स्पर्धेच्या आवाहनात कुठेही बक्षीस जाहीर केलेले नव्हते, तर निवडक पत्रांना आमच्या सोशल साइटसवर प्रसिद्धी
 • देण्यात येईल, असे लिहिले होते. स्पर्धापत्रक बऱ्याच जणांनी नीट वाचले नाही, हे दिसून आले. अशा स्पर्धा जेव्हा आम्ही जाहीर करतो, तेव्हा मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळणे, त्यांच्या बुद्धीला, विचारशक्तीला व कल्पकतेला चालना देणे, नवीन काही शिकणे, अशा अपेक्षा असतात, हे मोठ्या माणसांनी समजून घ्यावे, ही विनंती.
 • अशा विविध स्पर्धा ‘वयम्’ मासिकाकडून सतत जाहीर होत राहणार आहेत. त्यामुळे, या स्पर्धेत विजेत्यांमध्ये नाव न आलेल्यांनी नाउमेद होऊ नये.
 • हा सर्व रियाज आहे. त्याचा एक भाग म्हणून ‘वयम्’ मासिक मुलांनी जरूर वाचावे. पालकांनीही वाचून घरात चर्चा करावी, हे आवाहन!
 • ‘वयम्’विषयी अधिक जाणून घेण्यासाठी www.wayam.in या आमच्या वेबसाइटला नक्की भेट द्या.

गुरुपौर्णिमा पत्रलेखन स्पर्धा निकाल- विजेते ३०

 • १) सिद्धी वाणी, आठवी, एम. एस. कोठारी अकेडमी, नाशिक
 • २) सोहम घाडीगावकर, सहावी, सरस्वती विद्यामंदिर इंग्रजी माध्यम, दापोली
 • ३) तन्वी चौकेकर, नववी, अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण, सिंधुदुर्ग
 • ४) समृद्धी महाजन, नववी, गांधी विद्यालय, परभणी
 • ५) उत्कर्षा माने, आठवी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, पुणे
 • ६) सौमित्र सबनीस, आठवी, न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, पुणे
 • ७) अनिहा प्रवीण, आठवी, विसडम इंटरनशनल स्कूल, नाशिक
 • ८) आभा गोकर्ण, नववी, आनंद निकेतन, नाशिक
 • ९) तनिष्का फडके, सातवी, L.S.V.D.V Jawala, सोलापूर
 • १०) जान्हवी दांडेकर, सहावी, सरस्वती विद्यामंदिर, ठाणे
 • ११) पश्यना गायकवाड, दहावी, यशवंत विद्यालय, अहमदपूर
 • १२) अदिती जोशी, आठवी, द. ह. प्रशाला, पंढरपूर
 • १३) समृद्धी वेंगुर्लेकर, दहावी, न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, वेंगुर्ला-सिंधुदुर्ग
 • १४) तन्मय महाजन, पाचवी, श्रॉफ हायस्कूल, नंदुरबार
 • १५) परमेश्वरी निकम, पाचवी, ग. रा. पालकर प्राथमिक शाळा, पुणे
 • १६) धनश्री शिंदे, आठवी, विकास हायस्कूल, शहादा, नंदुरबार
 • १७) सार्थ भोसले, पाचवी, शिवाय विद्यालय प्राथमिक शाळा, ठाणे
 • १८) स्वरांगी कुलकर्णी, चौथी, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव
 • १९) आभा शीतल केतन भोसले, नववी, सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे
 • २०) मुग्धा प्रभू, नववी, सेंट तेरेसा कॉन्व्हेंट हायस्कूल, सांताक्रुझ
 • २१) पूर्णेश सुबोध गुमटे, सातवी, रितेश विद्यालय, सोलापूर
 • २२) प्रिती सावंत, नववी, अर्जून रावराणे विद्यालय, वैभववाडी, सिंधुदुर्ग
 • २३) ईशान मोरेश्वर, नववी, पुणे, न्यू इंग्लिश रमणबाग, पुणे
 • २४) गायत्री चेंदवणकर, नववी, न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, वेंगुर्ला-सिंधुदुर्ग
 • २५) स्वरा पाटील, सातवी, चिंतामणी केळकर विद्यालय, चेंढरे, अलिबाग, रायगड
 • २६) अनुष्का बनसोडे, सातवी, कुंजीर पब्लिक स्कूल, पुणे
 • २७) ईश्वरी इथापे, नववी, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा
 • २८) लौकिक भोगले, दहावी, आर. पी. वागदे हायस्कूल, मसुरे, सिंधुदुर्ग
 • २९) पर्णवी वैद्य, नववी, थापाडिया इनोवेशन स्कूल, औरंगाबाद
 • ३०) नयन सुरेश आंधळे, आठवी, मा. रा. सारडा कन्या विद्यामंदिर, नाशिक

आम्ही सोशल मीडिया वर आहोत, आमच्याशी कनेक्ट व्हा !