खिडकीतला निसर्ग फोटो स्पर्धा!

तुमच्या घरातून, वस्तीतून, आवारातून, गच्चीतून निसर्गातली जी जी गंमत दिसते तिचे फोटो काढा. त्यातला फक्त एक फोटो आम्हांला पाठवा. त्या फोटोखाली त्याचं वर्णन करणारी २ ते ४ वाक्यं लिहा. मात्र, एक अट आहे; या फोटोतून कळलं पाहिजे की, तो तुम्ही तुमच्या घरातून किंवा आवारातून काढलाय. एरवी आपण बाहेर फिरायला गेलो की, निसर्गाचे फोटो काढतो, तसे फोटो अपेक्षित नाहीत. आपल्याला दाखवायचाय घरातून दिसणारा निसर्ग! आपल्या ‘वयम्’ जून २०२१ महिन्याच्या अंकाचं कव्हर किंवा अंकातले काही फोटो नीट बघा, म्हणजे तुम्हांला आयडिया मिळेल. उत्तम फोटो पाठवणाऱ्यांना अंकातून प्रसिद्धी आणि आकर्षक प्रशस्तिपत्रक.

स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी हे करा-

  • १. तुमच्या घरातून, वस्तीतून, आवारातून, गच्चीतून दिसणारा निसर्गाचा कोणताही घटक, कोणतंही रूप कॅमेऱ्यात टिपा.
  • २. त्यातला तुम्हांला आवडेल तो एक फोटो ‘वयम्’कडे पाठवा.
  • ३. त्या फोटोला साजेशी २ ते ४ वाक्ये मराठीत किंवा इंग्रजीत लिहा.
  • ४. हे फोटो व वाक्य ahamawamwayam@gmail.com या इमेलवर JPEG Format मध्ये पाठवा.
  • ५. त्या इमेलमध्ये तुमचं नाव, वय, पत्ता, शाळेचं नाव, इयत्ता, फोन नंबर, इमेल आयडी लिहा
  • ६. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख- ३० जून २०२१.
  • ७. ही स्पर्धा चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

फोटो व वाक्य पाठवण्याचा इ-मेल : ahamawamwayam@gmail.com अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५ विविध स्पर्धा आणि उपक्रम याविषयी जाणून घेण्यासाठी www.wayam.in या आमच्या वेबसाइटला जरूर भेट द्या.

- ‘वयम्’टीम