‘वयम्’ कथा स्पर्धेचा निकाल–

‘वयम्’ मासिकतर्फे घेतलेल्या कथा स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. चार चित्रांचा संच आणि चार ओळींचा समूह यांवरून कथा रचायची होती. नेहमीप्रमाणे मुलांसाठी स्पर्धा जाहीर केली होती, पण काही मोठ्यांनाही या स्पर्धेने मोहात पाडल्याचे त्यांनी कळवले. म्हणून मग ही स्पर्धा लहान-मोठे सर्वांसाठी खुली केली. दोन्ही गट मिळून सुमारे ६० जणांनी कथा पाठवल्या. परीक्षक होते कथालेखक फारूक काझी, चित्रकार अंबिका करंदीकर, विद्यार्थिनी-लेखिका आभा आणि वयम संपादक शुभदा चौकर. परीक्षण करताना आम्हा सर्वांना खूप मजा आली. एकाच चित्रसंचातून किती वेगवेगळ्या कल्पना सुचू शकतात, हे बघून आम्ही अचंबित झालो. विशेषत मुलांच्या कल्पना फारच आगळ्या वाटल्या. मुलांचा गट वयवर्षे २० पर्यंत होता. अर्थात परीक्षण करताना वयानुरूपता प्रामुख्याने पहिली. ‘बेस्ट 5’ काढणे मुश्किल झाले, म्हणून ‘बेस्ट 7’ कथा जाहीर केल्या आहेत. मोठ्यांच्या गटातील काठाही आवडल्या, मात्र अनेक कथा-लेखकांनी मुलांना बोध, तात्पर्य काढून देण्याचा अट्टहास केलाय, असे लक्षात आले. मुलांसमोर आपण कल्पना, विचार असलेली कथा ठेवावी, बोध, तात्पर्य वगैरे त्यांना काढू द्यावे, असे वाटते. दोन्ही गटांतील निवडक कथा आपण एकेक करून डिजिटल माध्यमातून वाचकांपर्यंत पोचवत आहोत. सुरळीतपणे ऑफिस सुरू झाल्यावर विजेत्यांना बक्षिसे दिली जातील. सर्व सहभागींचे आभार आणि विजेत्यांना धन्यवाद! -शुभदा चौकर
मुख्य संपादक ‘वयम्’ मासिक

एखाद्याचं लेखन वाचून त्यातून बेस्ट फाईव्ह शोधणं हे तसं कठीण काम. त्यातल्या त्यात मुलांनी लिहिलेलं वाचून त्यातून पाच शोधणं त्याहून महाकठीण. २० वर्षांखालील सहभागी लेखकांचं लेखन तपासताना दमछाक झाली. खूप सुंदर कल्पना लढवल्या आहेत मुलांनी. काहीजण तात्पर्यात अडकलेले दिसले. मात्र काहींनी मुक्तपणे आपली कल्पकता वापरली. हे फारच भन्नाट होतं. जाम आवडलं. २० वर्षांवरील मोठ्या गटात काही जणांनी खूप सुंदर लेखन केलं. मात्र इथं मुलांना सतत काहीतरी शिकवण्याचा जो भाव जाणवला त्यामुळे कथांची मजा कमी झाल्यासारखी वाटली. आपलं खूप खूप अभिनंदन आणि पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा. -फारूक काझी

अंबिका करंदीकर आणि आभा पटवर्धन यांनीही परीक्षण केले.

विजेते आहेत-

मुलांचा गट- बेस्ट 7

 • श्री दिलीप मोरये- ५वी, दहीसर
 • विद्या वाघ- ७वी, पालघर
 • शर्विल कुलकर्णी, ४थी, (UAE)
 • सलोनी बोजेवार- १३वी, ठाणे
 • सानिका शेवडे- १०वी, पनवेल
 • कृष्णांगी अजय गाठे- ७वी, अमरावती
 • धनश्री शिंदे- ७वी नंदुरबार

मोठयांचा गट– बेस्ट 5

 • सोनाली अनारे, वय ३६, कल्याण
 • मो.मुजाहिद फराज, वय ३३, अमरावती
 • अश्विनी पवार, वय ४०, अमरावती
 • गोपाल खाडे, वाशीम
 • किरण दशमुखे, नाशिक

आम्ही सोशल मीडिया वर आहोत, आमच्याशी कनेक्ट व्हा !