‘वयम्’ कथा स्पर्धा २०२० - सर्वांसाठी!

सुट्टी अनुभव स्पर्धेबरोबरच तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी ही कथा-स्पर्धा खास ‘वयम्’ मासिकातर्फे! वाचकांनीच सुचवल्याप्रमाणे ही ‘वयम्’ कथा-स्पर्धा मोठ्यांसाठीही खुली करत आहोत. या चौकोनी पानातील सर्व चित्रं नीट पहा. त्या चित्रांच्या आधारे छानशी गोष्ट रचा आणि 'वयम्' कडे पाठवा. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इमेल, फोन नंबर तसेच वय लिहा, कारण निवड करताना वय लक्षात घ्यावे लागेल! तुमच्या कल्पक कथांची आम्ही वाट पाहत आहोत.
कथा पाठवण्याची अंतिम तारीख - ३० मे २०२०
कथा जास्तीत जास्त ५०० शब्दांपर्यंत असावी.

कथा स्पर्धेचे नियम-

  • १. कथा ही टाइप केलेलीच असावी. हाती लिहून किंवा स्कॅन करून पाठवलेली कथा स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
  • २. टाइप करण्यासाठी वापरलेला फॉन्ट शक्यतो युनिकोडमध्ये असावा.
  • ३. वर्ड फाइल Attach करून किंवा डायरेक्ट मेलमध्ये टाइप करूनच कथा पाठवावी.
  • ४. कथेची शब्दमर्यादा ५०० शब्दांची आहे. त्यापेक्षा जास्त शब्दांची कथा असल्यास ती कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही.
  • ५. कथा पाठवताना तुमचे नाव, पत्ता, इमेल, फोन नंबर तसेच वय लिहायला विसरू नका.
  • ६. कथा टाइप करूनच ahamawamwayam@gmail.com या मेलवर पाठवायची आहे.
  • ७. कथा पाठवण्याची अंतिम तारीख ३० मे २०२० आहे. या तारखेनंतर पाठवलेली कथा स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाही.
  • ८. कथा लिहण्यासाठी जी चित्रांची इमेज पाठवली आहे त्यात कथा स्पर्धा पाठवण्याचा पत्ता दिला आहे, परंतु ही स्पर्धा सर्वांसाठी खुली केल्याने कोणीही कथा हाती लिहून ‘वयम्’च्या पत्त्यावर पाठवायची नाहीये.
  • ९. कथा स्पर्धेमधून १, २, ३ असे क्रमांक काढले जाणार नाहीत. उत्तम अशा निवडक कथा ‘वयम्’च्या अंकामध्ये आणि ‘वयम्’च्या सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्या जातील. निवडक कथांच्या कथाकारांना बक्षीसही दिले जाईल.
  • १०. परीक्षकांचा निर्णय बंधनकारक राहील.

कथा पाठवण्याचा इ-मेल : ahamawamwayam@gmail.com अधिक माहितीसाठी संपर्क- ९१३७१२८९१५ विविध स्पर्धा आणि उपक्रम याविषयी जाणून घेण्यासाठी www.wayam.in या आमच्या वेबसाइटला जरूर भेट द्या.

- ‘वयम्’टीम

आम्ही सोशल मीडिया वर आहोत, आमच्याशी कनेक्ट व्हा !