निवडक गुरुपोर्णिमा पत्रे भाग- 2

‘वयम्’ मासिकाने आयोजित केलेल्या ‘गुरुपौर्णिमा पत्रलेखन' स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेचा निकाल ‘वयम्’ मासिकाच्या वेबसाइटवर जाहीर झाला आहे. विजेत्या ३० पैकी काही प्रातिनिधिक पत्रे शेअर करत आहोत. वाचा हा भाग- २

आदरणीय व प्रिय पुस्तक,

‘ग्रंथ हेच गुरु’ या उक्तीप्रमाणे तू खरच माझा गुरु आहेस. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सगळ्यांनाच कोणी ना कोणी गुरु भेटत असतो. काही गुरु आपल्याला आयुष्यभर मार्गदर्शन करत असतात. त्यापैकी एक महत्वाचा गुरु म्हणजे तू. तुला वाटेल, ही मला गुरु तर म्हणतेय, पण अरेतुरे करतेय. तर त्याचं काय आहे पुस्तका, तू माझा फक्त गुरु नाहीयेस, माझा मित्र, तत्त्वज्ञ आणि वाटाड्याही आहेस.

सुरुवातीला म्हणजे मी सहा-सात वर्षांची असताना ‘पंचतंत्र’, ‘इसापनीती’ अशा रूपांमध्ये तू भेटलास. तेव्हा तू माझ्यासाठी एक मन रमवण्याचा मार्ग होतास. पण तिसरी-चौथीत असताना ‘बोक्या सातबंडे’, ‘फेलुदा’, ‘शेरलॉक होम्स’, ‘कोल्हाट्याचं पोर’ आणि अजून मोठी झाल्यावर ‘लमाण’, ‘झिम्मा’, ‘छावा’, ‘स्मृतिचित्रे’ इत्यादी इत्यादी तुझी बहुरंगी रूपं वाचल्यावर मात्र तुझी मैत्रीण आणि त्याचबरोबर शिष्या झाले.

तू सगळ्यांचं शब्दभांडार समृद्ध करतोस. कधी हसवतोस, कधी रडवतोस. तर कधी अंतर्मुख व्हायला भाग पडतोस. तुझ्याबद्दल बोलत बसले तर एक पुस्तकं लिहून होईल! पण एका गोष्टीची खंत वाटते- सध्या ‘ई-लर्निंग’, ‘ई-बुक्स’ यांचा जमाना चालू आहे. खरं तर पुस्तका, तुझं पुस्तकपण फक्त अक्षरांमध्ये नाहीये. अस्सल वाचकांना छपाईचा फॉन्ट, कागदाचा स्पर्श आणि वास या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. तुझं ‘पुस्तकी’ अस्तित्व लुप्त होण्याआधीच आम्ही तुझे महत्त्व जाणलं पाहिजे. ‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे पुस्तकं वाचताना पुस्तकं उरलीच नाहीत तर? वास्तविक तुला वाचवणं म्हणजे आमचं समृद्ध जीवन वाचवण्यासारखं आहे. असो! आता थांबते. अजून लिहीत राहायला मला आवडेल खरं तर पण तूच बोलवतोयस मला कधीपासून- ‘वाचायला ये म्हणून .....’ चल मग टा-टा!

तुझीच
आभा
आभा शीतल केतन भोसले, नववी, ठाणे

प्रिय करोनास,

पत्रास कारण की....
गेल्या चार महिन्यांपासून तू चीनमधल्या वूहान या शहरातून अमेरिकेसह इतर देशात फिरत फिरत माझ्या भारतात आलास. हळूहळू दिल्लीपासून माझ्या देशातल्या गल्लीपर्यंत आज तू येऊन पोहोचलास, रस्त्यावर वेगाने गरागरा फिरणारी चाके व रस्त्यावर पडणारी पावले हळूहळू पूर्णपणे थांबली. “एखाद्या कोंबडीच्या पिल्लांनी तिच्या पंखाखाली जाऊन बसावे तसे सर्वजण आपापल्या घरात जाऊन बसले. पिलांना पंखाखाली मिळणारी उब व घरात सर्व सदस्य एकत्र आल्यामुळे अगदी आजोबा-पणजोबा पासून नातवंडांपर्यंत भरून गेलेल्या वास्तूमध्ये देखील नात्यातील मायेची उब पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली हे देखील खरंच.....नात्यांमधील जिव्हाळा, प्रेम काय? हे तूच खं-या अर्थाने शिकवलंस.

प्रदूषणमुक्त वातावरण पशु-पक्ष्यांचा पहाटेचा किलबिलाट असे प्रसन्न वातावरण पुन्हा पाहायला मिळाले-तुझ्यामुळेच..., तू सर्वांना स्वत:सोबत इतरांची काळजी घ्यायला शिकवलेस, स्वत:ची व परिसराची स्वच्छता राखायला शिकवले. एकमेकांना सहाय्य करायला शिकवलेस. महागाईच्या या काळात काटकसर करण्यास शिकवले. अन्नपाणी याचे मोल काय हे तूच शिकवलेस. कमी खर्चात उत्सव कसे साजरे करायचे हेही तूच शिकवलेस. नातेवाईकांसारखे शेजारीही’तितकेच महत्वाचे असतात हेही तू शिकवलेस. संत गाडगेबाबा सांगायचे तसं माणसातला देव पाहायला तूच शिकवलेस. तसेच मानवाच्या मुखवट्यामागील लपलेला खोटा चेहरा ओळखायला तूच शिकवलस. कठीण प्रसंगी संयम व धैर्य बाळगायला तूच शिकवलं. सकारात्मक विचारातील ताकद तूच दाखवून दिलीस. मानवाने विज्ञानाच्या जोरावर सुरू केलेली ही घोडदौड तू एका क्षणात थांबवून आजही निसर्ग श्रेष्ठ असल्याचा धडा तू मानवास दिलास.

संघर्ष म्हणजे काय हे तूच शिकवलस ,,, जीवनात येणा-या असंख्य अडचणी संकटाला सामोरे जात पुन्हा एकदा नव्या सकारात्मक विचारांनी नव्या उर्जेने उमेदीने जीवन कसं जगायचं हे परीक्षा घेऊन शिकवणारा तूच माझा गुरु....

तुझाच एक भारतीय नागरिक
प्रीती विजय सावंत, नववी
वैभववाडी जि. सिंधुदुर्ग

To,
Ms.J.K.Rowling

A good day from myself to the world’s most visionary author! I Mugdha Prabhu, am a crazy potterhead who definately has an insane dream of meeting you!

Your Harry Potter books have not only brought wonder to my mundane life but have also taught me to be a better person. You are an epitome of inspiration and you have taught many budding writers around the globe, to paint pictures with words. By introducing Harry, you have shown me values of bravery and sacrifice. Ron’s been like my reflection! Hermione was certainly the brightest witch of her age but she moreover exhibited the qualities of friendship and valoury. After reading the life-story of Evanna Lynch, who is the reel Luna, my body and mind have become much more immune to the tough times! Thank you so much for introducing these characters to us potterheads! You unknowingly have enriched people’s minds with the morals of empathy, friendship, bravery, love and so much more!

Lastly, I would also like to express my gratitude towards you for giving me the confidence to pursue my passion; writing. Aspiring for a dream come true and also wishing you Goodluck for your future.

Yours Truly,
Mugdha Prabhu, 9th
Santakruz, Mumbai

My Dear Sonali Mam,

I hope you are doing well and you are fine. Today I am writing this letter to write my feelings about you.
I like all my teachers but you are my best & favourite teacher among all. You teaches us science very well. You are very kind to us. Also you are very carrying & friendly towards us. You makes us understand the concepts very well with good & new teaching methods. You never fails to clear our doubt. You are very helpful too.

You are very disciplined & punchual person. You makes sure that we complete our homework & project work on time which is very important. You also guide us during all events & activities. If sometimes, we can’t able to understand some topics properly, you explain us again & again with very simple method.

Some of my classmates are not interested in the subject science but because of you gratefull explanation my classmates have liked the science.

Someone has rightly said,”Teachers are the ones who Plant the seeds of knowledge, sprinkle them & patiently nurtures their growth to produce tomarrow’s dreams.” is very true. I am very grateful to have a teacher like you. You are my best teacher forever.

Yours Student,
Anushka Annasaheb Bansode, 6th, Pune

आदरणीय बाबा

साष्टांग नमस्कार,
खरंतर आजचा हा दिवस आपल्या गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. पण आज मला एका सच्च्या मित्राप्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तो मित्र जो कोणत्याही मोबदल्याविना पूर्ण मनापासून आणि निष्ठेपासून मला शिकवतो. तो मित्र जरी वयाने मोठा असला तरी मात्र अगदी सच्चा , तो म्हणजे माझा बाबा. ज्याने मला बोट धरून चालायला शिकवलं व हळूहळू माणूस म्हणून जगायचं कसं ते त्याच्या अनुभवांच्या शिदोरीतून शिकवतोय. रात्र असो की दिवस तो कितीही दमलेला असला तरी माझ्या अभ्यासात कधीच कानाडोळा करत नाही. अगदी मला हसत खेळत शिकवतो. माझा अभ्यास अगदी सोपासा होतो. कठीण प्रकरण मला लगेच कळतात. मला तर वाटते की, तो एक गंमतीदार दुनियेचा जादुगार आहे. तो कधी मला कोणत्याही परीक्षेसाठी बळजबरी करत नाही. पण तुझं Best म्हणजेच 100% दे असं म्हणतो. तो म्हणतो की मी त्याच्या म्हातारपणाची काठी आहे, आणि त्याला मला खूप मोठं झालेलं बघायचंय.

त्यानंतर माझी दुसरी गुरुस्वरूप मैत्रीण आई, ती नेहमी मला समजून घेते. माझ्या प्रत्येक कठीण प्रसंगी माझी पाठीरांखी म्हणून उभी असते. असं म्हणतात आपले पहिले गुरु आई-वडील असतात. आणि हे विधान अगदी खरं आहे. जगाच्या बाबतीत ही व माझ्या बाबतीतही मी देवाची आभारी आहे. माझ्या आयुष्यात हे दोन अमुल्य हिरे दिल्याबद्दल. आई-बाबा तुमचे खूप-खूप आभार.
गुरुविन कोण दाखविल वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम डोंगर घाट
गुरुपौर्णिमा निमित्त तुम्हा दोघांना शब्द सुमनांच्या शुभेच्छा.

तुमची लाडकी
धनश्री अमोल शिंदे (धनू), आठवी, नंदुरबार

प्रिय आईस,

सर्वप्रथम तुला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
होय आई, तूच माझी पहिली गुरु आहेस. तुझं बोट धरूनच मी या दुनियेत पहिलं पाऊल टाकलं आणि जीवनाच्या शाळेतही.

आई मला अजूनही लख्ख आठवतंय की लहानपणी मी रागवायचे,रुसून बसायचे, पण ...पण तू मात्र मला प्रत्येक वेळी प्रेमाने हृदयाशी धरलेस आणि माणुसकीचा पहिला धडा मला शिकवलास.
आई तू एक प्राथमिक शिक्षिका आहेस. तसं पाहिलं तर माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्याची तू गुरु आहेस. पण माझ्यासाठी अनेक जीवनकौशल्ये शिकवणारी माझी गुरु आहेस.

आई तू स्वत: चौफेर वाचन करतेस आणि माझ्यावर वाचनाचे संस्कार घडावेत म्हणून सतत धडपडत असतेस. नेहमी सर्व प्रकारचे वाचन करायला तू मला शिकवलेस, म्हणूनच तू माझी वाचन गुरु आहेस.

आई तू खूप संवेदनशील आहेस. रस्त्यावरून जाणा-या मुक्या प्राण्यांच्या वेदना पाहूनही तुझ्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. मुक्या प्राण्यावर प्रेम करायला आणि झाडाझुडपांवर माया करायला तूच मला शिकवलेस. आई, माझ्या मनातलं एक गुपित तुला सांगू का? वर्तमानपत्रावर नजर टाकली की सध्या समाजात बोकाळलेली राक्षसी वृत्ती सहज दिसते. वंशाला दिवा पाहिजे म्हणून कितीतरी निर्दोष कळ्या जन्माआधीच खुडून टाकल्या जात आहेत. हे सगळं अगदी आसपास घडत असताना तू मात्र मला हे जग पाहण्याची संधी दिलीस. खरं तर सुवर्णसंधी म्हणायला हवी कारण,

सा–यांचा रोष पत्करलास. कोणतीही वैद्यकीय अडचण नसताना मला एकुलती एक ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतलास.

मला स्त्री स्वातंत्र्याचा, स्वाभिमानाचा धडा शिकवलास तू. शेवटी पुन्हा एकदा हेच सांगेन,”आज माझ्या तेव्यक्तिमत्त्वात जे काही चांगले आहे ते सारे तुझे देणे आहे, म्हणूनच तुला मनोमन वंदन करून एवढेच म्हणेन, “आई माझा गुरु, आई कल्पतरू”
“सौख्याचा सागरू, आई माझी.”

फक्त तुझीच,
ईश्वरी हेमंत इथापे, नववी, सातारा

आम्ही सोशल मीडिया वर आहोत, आमच्याशी कनेक्ट व्हा !