
‘वयम्’ गोष्ट रचा कथा स्पर्धा निकाल-
वयम्’ मासिकाच्या जुलै २०२१च्या अंकात 'गोष्ट रचा' स्पर्धा घेण्यात आली होती. या
स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाला. मुलांनी त्यांच्या उत्तम कल्पना मांडत गोष्टी रचल्या. या
स्पर्धेत पाच निवडक विद्यार्थी कथाकारांच्या कथा विजेत्या कथा म्हणून निवडण्यात आल्या
आहेत. त्याबद्दल विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी विद्यार्थ्यांना खूप-खूप शुभेच्छा. सर्व
विजेत्यांच्या कथा एकाच अंकात प्रसिद्ध करणे सोयीचे नसल्याने तीन कथा या अंकात प्रसिद्ध
करत आहोत.
सर्व सहभागींचे आभार आणि विजेत्यांना धन्यवाद!
-शुभदा चौकर
मुख्य संपादक ‘वयम्’ मासिक
एखाद्याचं लेखन वाचून त्यातून बेस्ट फाईव्ह शोधणं हे तसं कठीण काम. त्यातल्या त्यात मुलांनी लिहिलेलं वाचून त्यातून पाच शोधणं त्याहून महाकठीण. सहभागी लेखकांचं लेखन तपासताना दमछाक झाली. खूप सुंदर कल्पना लढवल्या आहेत मुलांनी. काहीजण तात्पर्यात अडकलेले दिसले. मात्र काहींनी मुक्तपणे आपली कल्पकता वापरली. हे फारच भन्नाट होतं. जाम आवडलं. काही जणांनी खूप सुंदर लेखन केलं. आपलं खूप खूप अभिनंदन आणि पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा. -
विजेते आहेत-
- आनंदी अनिरुद्ध जाधव, पाचवी, नाशिक
- दुर्गा गोवर्धन ठाकूर, आठवी, नांदेड
- अनन्या प्रशांत देशपांडे, चौथी, बाणेर-पुणे
- दिविजा शीतोळे, चौथी, पुणे
- तनिष्का संजय सागडे, दहावी, बारामत